दुबई-शारजाह- गटग
दुबई-शारजाह गटग
आज-करु उद्या करु म्हणून गेले अनेक महिने पुढे पुढे जाणारा दुबई गटग, एके दिवशी वर्षा आणि मी फेसबुकवर एकेमेकींना भेटल्यामुळे अचानक शुक्रवारी म्हणजे ११ जूनला करायच ठरलं लगेचच फोनाफोनीही झाली. वर्षानी शृतीला, राधिकाला, मुकुंदकाकांना फोन केले ....पण...पण नेमक वर्षा आणि कंपनीला ११ तारखेच्या शुक्रवारी संध्याकाळी एका बर्थडे पार्टीला जायचं असल्यामुळे त्याच दिवशी दुपारी करु या असं ठरवण्यात आलं. पुढील चर्चा मेलवर करु या असा श्रीमंतांचा हुकूम आला. मग पुढील चर्चा मेल वर चालली होती, कोणी काय आणायच? कोणी कोणाला आणायच? याचीही ठरवा-ठरवी झाली.
सगळ्यात लांब मी आणि मुकुंदकाका रहात असल्यामुळे मी मुकुंदकाकांना सोबत घेऊन जाऊ शकेन असं कळवल होत. (ऐनवेळी त्यांच येणं रहीत झालं ) याहीवेळा बनुताईला प्रत्यक्ष ऐकायची संधी गेली.
तर....पुढे; मग गिरीशना फोन करायची जबाबदारी आपसुकच माझ्यावर आली , मी फोन केला वेळ सांगितली त्यांना काय काय आणायचय तेही हळूच सांगून टाकलं ( गिरिश म्हणाले असतील काय लोक आहेत पहिल्यांदाच भेटतोय तरी टीटीएमएम करतायत लोक) पण नियम म्हणजे नियम सांगितलच त्यांनाही ज्युस आणायला.
सगळं काही व्यवस्थीत ठरलेलं, गुरुवार दुपार......फोन वाजला, "हॅलो, अग मी बोलत्ये, श्रुती, ऐक ना! काय झालय माहीती का?( मी म्हटल झालं, आता ही मागच्यावेळसारखी येत नाही म्हणत्ये की काय? )
तर... वर्षा ज्यांच्याकडे जाणार होती ना त्यांना तिने कळवलय ती येऊ शकत नाही म्हणून; आपण सगळे संध्याकाळीच भेटतोय. मी हुश्श्य! केलं' म्हटल हं, हरकत नाही, आम्ही मोकळे आहोत येऊ शकतो.
शुक्रवार, दुपारी चार वाजता गिरीशना फोन करुन सांगितल की आम्ही त्यांना घ्यायला साधारण पावणे सहा ते सहाच्या दरम्यान हॉटेलजवळ येऊ.....निघालो वेळेवर आणि आता हा एक्झीट घेतला की हॉटेल शांग्रीलाचा बोर्ड दिसणार....पण आमचा एक्झीट चुकला होता आणि आम्ही पुन्हा गोल गोल फिरत भलत्याच रस्त्याला लागलो होतो.
शेवटी एकदाचे हॉटेल शांग्रीला सापडलं, गिरीश भेटले, गाडीत बसले आणि आम्ही शारजाहकडे जायला निघालो.
वर्षाच्या घरी पोचल्यावर, दोन मुलं (हो मुलंच आम्हा सगळ्यांसमोर अगदीच लहान दिसले बिचारे ) बसलेली दिसली त्यातला एक सुमेध असेल असा अंदाज लावला दुसरा कोण कळेना. (सुमेधचा मित्र महेश होता हे बरच नंतर कळलं)
एवढ्यात जेके आणि राधीका विथ गुलाबजाम डबा आणि ज्युनिअर असे आले...आता ह्याला ज्युनीअर म्हणत्ये कारण नाव आठवत नाहिये. तसं बघायला गेलं तर सुमेध...महेश आणि हा असा ग्रूप झाला असता.
योग सारिका आणि लिटील चँप दीया आधीच आलेले होते; कोणीच तिच्या वयाच नसल्यामुळे दीया थोडंस छळत होती बहुतेक सगळ्यांना.
सगळे जमले होते पण कार्याध्यक्षीणबाईंचा पत्ता नव्हता वाटल मारली टांग हिने परत. पण तेवढ्यात वर्षाच्या फोनवर ती पोचत्ये म्हणून निरोप ऐकला.
शृती आली(एकदाची) आणि साहजिकच आमची सगळ्यांची कलकल सुरु झाली . कार्यक्रम ठरवल्याप्रमाणे कविता वाचन सुरु करायला हवं होतं वेळ चालला होता आणि शृती काहीच बोलायला तयार नव्हती...मीच आपलं तिच्या मागे लागून आता सुरु करु या ग! म्हणत कविता वाचूनपण टाकली माझ्यानंतर वर्षा मग सुमेध, गिरिश, आपआपल्या तर शृतीनी, प्रकाश काळेल यांची योध्दा वाचली आणि धूंद रविची एक
विशाल आणि कौतुक यांच्या कविता (प्रत्येकाची एक) वाचल्या अश्या कविता वाचल्या. राधीकानी सुद्धा एक सुंदर कविता वाचली. (राधीकाचं सादरीकरण खूप आवडलं मला.)
गिरीश, कविता घेऊन आले नव्हते....त्यांच्या कित्येक सुंदर कविता ऐकायला आवडल्या असत्या पुढच्या वेळेला फाईल/लॅप-टॉप सहीत यायला हवं. हुकमावरून! तरी त्यांनी काही तुझ्या कवितांमधल्या काही ओळी ऐकवल्या.....कोणतीही कविता प्रत्यक्ष कविच्या तोंडून ऐकायला मजा येते.... मस्त वाटल.
वर्षानी ऐकवलेल्या तिच्या कविता प्रेमबन आणि दुसरी अजून एक त्याही ऐकायला मजा आली, वर्षाच्या आईची कविता ग्रेट. आई आणि वडील असा दोघांकडचा लिखाणाचा वारसा आहे वर्षा तुला, लिहीत रहा ग!
हे काव्यवाचन प्रकरण सुरु करायच्या आधीच माझ्या लेकीला भूक लागल्यानी मी वर्षाला खायला काय केलयसं/आणलयस ते देऊ या का विचारलं ...आणि तिने तिच्या मेडला साबुदाणेवडे तळायची ऑर्डर सोडली. ते वडे एवढे मस्त झालेले की ते खाण्याच्या आणि ज्युसच्या नादात रॅगींग राहिलचं तरी सुमेधकडे बोट दाखवत हा योग म्हणून योगनी शृतीला ओळख करुन दिलीच. (मुरलेला मायबोलीकर हे! असा बर सोडेल )
शृती थोडीशी गडबडली पण सारिकाशी आत बोलण झाल्यामुळे तिने योगला लगेचच ओळखल.
आठ ते साडे दहा तर कविता वाचनच चाललं होतं, मग गाण्यासाठी मांडामांड सुरु झाली....माईक वगैरे लावून झाले...आणि वर्षाच्या लेकानी एका माईकचा आणि दीयानी दुस-या माईकचा ताबा घेतला.
आदित्यनी रॉक यू एकदम जमके म्हटल दुसरही म्हणत होता पण आईनी दम दिल्यावर बिचा-यानी माईक अनिलच्या हातात देऊन टाकला....इकडे दुस-या माईक वर दीया मॅडम नी सारे के सारे गम को लेकर, आणि लकडी की काठी उरकुन घेतलं....तिला रिमझीम गिरे सावन सगळ कसं पाठ आहे? आणि एवढं ताला-सुरात कसं गाते? कसली समज आहे गाण्याची...जस्ट ग्रेट.
लक्षात राहिलेली काही गाणी....
अनीलनी गायलेली सगळीच गाणी अप्रतिम.
योग सारिका, सलामेइश्क, मजा आ गया
वर्षा. आज जाने की जिद ना करो
सुमेध, मेरे रंग मे....
श्रुती तू पण चांगल गाऊ शकतेस पुढच्या वेळी गाण अक्ख हवं
गिरिश कडून पण पुढल्या वेळी अक्ख गाणं हवं
सगळ्यात आवडल्या त्या मोहननी गायलेल्या गझल्स.
मंडळी गाणी संपवायला तयारच नव्हती घड्याळाचा काटा बाराच्या पुढे चाललेला.....कितीतरी वेळा जेवायला चला सांगितल्यावर एकेकानी जेवण घ्यायला सुरवात केली.
मेन्यु असा होता,
ज्युस- गिरिश
स्टार्टरः साबुदाणा वडा- वर्षा
मिक्स व्हेज ( बाय सारिका सौ. योग)
व्हेज भुना(हॉटेल कामत)
पोळ्या- श्यामली/शृती
बुंदी रायतं-श्यामली
टॉमेटो राईस- वर्षा
गुलाबजाम_ राधिका
कामतच्या व्हेज भूना तसच पडलं होतं सगळ्यांनी सारिकानी आणलेल्या भाजीवर ताव मारला(पोरांनीसुद्धा)
टॉमेटो राईस सही झालेला (डब्ब्यातपण भरून मिळाला. सगळ्यानाच खूप आवडला.
गुलाबजाम का नाही आणले म्हणून माझी खरडपट्टी झाली
हे सगळं आवरून अगदी आता निघायलाच ह्वं म्हटल्यावर आम्ही रात्री दीड्च्या सुमारास घरी जायला निघालो, वाटेत गिरिशना सोडून घरी पोचलो तर सव्वा दोन झाले होते.
धमाल जीटीजी झाला, मजा आली,मंडळींची लवकरच पुढचा ठरवा अशी फर्माईश आलीये
गुलाबजाम खाल्ल्यावर पानाची प्रचंड आठवण झाली
पुढच्या वेळी मुकुंदकाका, अनिता आणि अजून दुबईकर असतील अशी आशा आहे.
फोटो सगळ्यांना मेल केले आहेत
मायबोली गटग.... एक कायम
मायबोली गटग.... एक कायम स्मरणात राहील अशी संध्याकाळ. कविता वाचन, वाद-विवाद, गाण्याची सुरेख मेहफिल आणि धुंद करणारी मायबोलीकरांची संगत.. वाह वा!! खुपच मजा आली.
आदित्य (माझा मुलगा वय वर्षे ८) , दिया (योग ची कन्या.. वय वर्षे १.५) आणि श्यामलीचा मुलगा कौशल (इयत्ता ९ वी) ह्यांनी देखिल गाणी म्हणण्यात सहभाग घेतला व मेहेफिलीची रंगत वाढविली. आदित्य ने मायकल जॅक्सनची We will rock you आणि Beat It अशी rock songs गायली. दियाने आपल्या बोबड्या आवाजात 'सारे के सारे गमोंको लेकर गाते चले' हे गाणे इतके cute पणे गायले. आणि कौशलने 'मल्हार वाडी मोतियानी आली भरुन' हे गाणे छान गायले.
सर्वात कौतुक करायचे ते म्हणजे मोहन, अनिल व प्रमोद ह्यांचे, अमराठी असुनही त्यांनी आमचे कविता वाचन निमुटपणे सहन केले.
बाकी सारे श्यामलीए लिहीलेच आहे.
मुख्य म्हणजे सर्वांचीच एकमेकांशी इतकी सुंदर तार जोडली गेली, जसे काही आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासुन ओळखत आहोत. Thanks to Maayboli.
अरे वा! छान जमलेत वृत्तांत..
अरे वा! छान जमलेत वृत्तांत.. पुढील वेळेस माझ्या कविता लिहून आणीन हो..
दीया: २ वर्षे, ३ महिने.
सुमेध, महेश, पुढील गटग ला येत रहा. ओळख वाढेल अजून..
केसकरांकडे पुढील गटग करूयात पण ज्यांन्ना जमेल त्यांना या विकांताला- योग धाबा?
नेहेमीचेच- गप्पा, गाणी, बाजा, जेवण.. श्यामली साठी खास तबला पेटी ठेवुया..
अरे तुझ्या कवितेबद्दल लिहायच
अरे तुझ्या कवितेबद्दल लिहायच राहिलंच
योगनी ऐनवेळेला मायबोली वरून स्वतःचीच एक कविता पटपट लिहून त्याचं वाचन केलं अर्थात कविता उत्तमच होती, पण एक कविता काफी नही है!
वर्षा आणि अनिल दोघांनी त्यांच घर गटगसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे अनेक आभार
प्रमोद कानडी-मराठी आहे ग!माझ्या कविता न कळण्याएवढ मराठी कळत त्याला
शामले मस्तच वृ ग, आता पुण्यात
शामले मस्तच वृ ग,
आता पुण्यात येशील तेव्हा मैफिल जमवायलाच हवी , भाकरी भरीता सकट
जमवू या की! पण कविता आणि गाणी
जमवू या की! पण कविता आणि गाणी आणि मग मी असं पॅकेज आहे चालणारे का तुम्हाला
दुबईकरांना पिडून झालंय...
आदित्यनी रॉक यू एकदम जमके
आदित्यनी रॉक यू एकदम जमके म्हटल दुसरही म्हणत होता पण आईनी दम दिल्यावर बिचा-यानी माईक अनिलच्या हातात देऊन टाकला....
अहो मी नव्हतोच आलो .....
पण लवकरच याव लागेल ..अस वाटतयं...
पण कविता आणि गाणी आणि मग मी
पण कविता आणि गाणी आणि मग मी असं पॅकेज आहे चालणारे का तुम्हाला >>>> हो$$$$$
डिस्काऊंट मिळेल का पण पॅकेज वर
पण कविता आणि गाणी आणि मग मी
पण कविता आणि गाणी आणि मग मी असं पॅकेज आहे चालणारे का तुम्हाला > नऽऽह्ही
स्मिते, तुम्हाला मग सौंच्या कविता ऐकाव्या लागतील.
स्मिते, तुम्हाला मग सौंच्या
स्मिते, तुम्हाला मग सौंच्या कविता ऐकाव्या लागतील. >>>> चालेल तु अळीमिळी गुपचिळी कर म्हणजे झाल
दुबई मध्ये पुणेकर घुसले
दुबई मध्ये पुणेकर घुसले वाटतं....
हं दिसतय असं, कुठे गेले
हं दिसतय असं, कुठे गेले दुबईवाले? अर्थात पुणेवाले you all are most welcome on this page. !!!
व्रुत्तांत अन मेन्यू मस्त.
व्रुत्तांत अन मेन्यू मस्त.
मस्त वृत्तांत आणि
मस्त वृत्तांत आणि स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स मेन्यूदेखील
श्यामले हा वृत्तांत म्हणजे
श्यामले हा वृत्तांत म्हणजे माझं रॅगिंग आहे!
मी धुंद रवी, प्रकाश , विशाल आणि कौतुक यांच्या कविता (प्रत्येकाची एक) वाचल्या हे थोडं करेक्शन.
आदित्यला सॉरी. मी त्याचं रॉक यु कसं विसरले?
आदित्यनी रॉक यू एकदम जमके
आदित्यनी रॉक यू एकदम जमके म्हटल दुसरही म्हणत होता पण आईनी दम दिल्यावर बिचा-यानी माईक अनिलच्या हातात देऊन टाकला>>> अगं दम दिला नसता तर आपल्याला गायलाच नसतं मिळालं ना!! आदित्यची full 2 rock concert च झाली असती मग त्यादिवशी.
आपुनको के गाने भी तो झेलेनेवाले कौन मिलता फिर?
वा वा मस्त ! कवितावाचन वगैरे
वा वा मस्त ! कवितावाचन वगैरे म्हणजे...धमाssल केलेली दीसतेय लोकांनी !
अमराठी जनांचे खास कौतुक ! मेन्यु मस्त होता....फक्त स्टार्टर मध्ये शाबुदाण्याचे वडे, हे बात कुछ हजम नहीं हुयी !
छान वृत्तांत.. गटगला कविता
छान वृत्तांत..
गटगला कविता वाचन म्हणजे फारच गं. आणि वि. झालं की..
पु.ग.शु...
श्यामली, छान आहे वृत्तांत.
श्यामली, छान आहे वृत्तांत.
स्मिता, दीप्या, फिकर नॉट आपण
स्मिता, दीप्या, फिकर नॉट आपण पण जोरदार गटग करु आणि असाच जोरदार वृत्तांत पोस्टू मग मेन्यु बघून असंच कोणीतरी इथे येऊन हे घुसले का इथे ते घुसले का इथे म्हणतील :दीवा:
शृती, सॉरी सॉरी बदल केलाय ग!
गाणी सगळ्यांनीच झकास म्हटली पण योग आणि अनिल दोघांची किशोरच्या गाण्यांची जुगलबंदी चालली होती...गेल्या वेळेलाही मजा आली होती यंदाही धमाल आली.
आपण एखादा प्रोग्रॅमच करु या की काय अस वाटायला लागलय मला अतिशय गंभीरपण लिहिलंय...मी सूत्रधार म्हणून काम करेन गाणी कविता आणि चर्चा असा.
जोशी, जरा दुबईकरांना संधी द्या आतिथ्य करायची, मी, अनिता राहिलो आहोत अजून.
आज वर्षाच्या रॉकस्टारचा वाढदिवस आहे त्याला खूप खूप शुभेच्छा!
अभिप्राय देणा-या सगळ्या दोस्तांना मनःपूर्वक धन्यवाद.
क्या बात है !!! खरच खुप मझा
क्या बात है !!! खरच खुप मझा आला... !!!
मला दुबईत येऊन आठ्-दहा दिवसही झाले नसतील अन ही दिवाळी अनुभवायला मिळाली... सगळे इतके पटकन मिसळुन गेले की वाटलच नाही की पहील्यांदा भेटतोय म्हणुन... मायबोली जिंदाबाद !!!
श्यामली अन प्रमोदला माझ हॉटेल शोधतांना झालेली फिरफिर अन मी दिलेला त्रास कायम स्मरणात राहील... देविकाचा ( श्यामली-प्रमोदच कन्यारत्न) आवाज ऐकुनच ही पोरगी कमालीची गाणार अस वाटल्..तिच गाणही मला ऐकायचय पुढल्यावेळी कौशलन मैफीलीची सुरुवात केली तेंव्हाच कळल की आज मैफील जिवघेणी होणार म्हणुन...
कवितावाचन बहारदार या शब्दात मोडण्यासारखा झाल... श्यामली स्वतः टॉप फॉर्मात होत्या.. त्यांची वडीलांसाठी / डेडीकेट केलेली गज़ल एकदम जानलेवा !!! अन करावकेमुक्त गाणं - फर्मास !!! मझा आ गया !!!
क्षृती अन मोहन या जोडप्यानं एक एलीगन्स आणला... मला क्ष्रुतीचा सेंन्स ऑफ ह्युमरही खुप आवड्ला...तिनं विशाल्-कौतुक्-प्रकाश अन रविच्या कविता इत्क्या ठेक्यात म्हटल्या की आता या चौघांनी तिला रॉयल्टी द्यायला हवी... जोक्स अपार्ट पण यातनं दिसल की मायबोलीवर लिखाणावर प्रेम करणारी दिलदार मंडळी आहे.. ज्या पॅशननी या कविता तिनं सादर केल्या त्यात तुम्ही चौघांनीही खुप कमावल राजेहो... चिअर्स टू दॅट !!!
मोहनच्या गज़ला जमल्या.. भाव खाऊन गेल्या !!! अंबरीश (क्ष्रुती-मोहनचे चिरंजीव)दिया (योग्-सारीकाच कन्यारत्न) अन वर्षा-अनिलचा रॉकस्टार म्हणजे आईस्क्रीमवरची चेरी झाले होते...!!!
केसकर दांपत्य आपल्या भार्दस्तपणातला लाघवीपणा जसा जपतात तस सगळ्यांना यायला हव... माझ्या शालेय शिक्षणाबद्दलची मत ऐकुन निदान सौ केसकर - ज्या स्वतः ज्ञानदानाच काम करतात- मला पुन्हा त्यांच्याकडे येऊ देतील की नाही याबद्दल शंका आहे
सुमेध-मयुर फार गुणी मुलं वाटलीत... पुढ्ल्या वेळेस ती आणिक खुलतील अस वाटत
योग-सारीकाच्या ड्युएट गाण्यांनी तर कमाल केली - तन्मयतेन गाणी म्हटली दोघांनी.. ग्रेट टायमिंग... सारीकाचा गळा खुप गोड आहे ( योग सॉरी यार... पण शी वाज बेटर.. )
शेवटी मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे : वर्षा-अनिल हे गुणी जोडपं अन त्यांनी ज्या सहजतेन सगळ मॅनेज केल त्याबद्दल त्यांचे आभार मानणं पुरेस नाही!!! अनिल गाणी सुरु होताच एकदम खुलला ज्याला आपण अॅनिमेटेड म्हणतो तस काहीस... अनिलनं किशोरची काही मस्त गाणी म्हटलीत..( पण वर्षानं "यही वो जगाह है.. जहां हम मिले थे.." हे गाणं पुर्ण न गायल्याबद्दल काही मार्क्स कट ) त्यांच्या पिल्लाचा आज वाढदिवस आहे -- त्याला मोठ्ठा हॅप्पी बर्थ डे !!!
वर्षाच गाण ...अन त्या ज्या पॅशनन ते सादर करतात ते बघण्यासारख आहे... सादरीकरणातली नजाकत अन वर तयार गळा ... अहाहा... एकदम मजा आला !!!
एकुण लई मजा आली राव... अगदी कवितेत सांगायच तर एव्हढच म्हणीन की ...
" उन-सावलीच्या गोष्टी लिहुन खुप झाल्या
पावसाच्या कविता लिहुन खुप झाल्या
जे पावसाच ओलेतं हातात आल ते तुम्ही वाचताहात
अन जे हातात आल नाही ते खरखुरं बरसून गेलं !!!!!"
चिअर्स !!!
गिरीश
क्या बात है! याला म्हणतात
क्या बात है! याला म्हणतात हाडाचा कवि....सगळ्या गोश्टीत कविता बघणारा, मस्त लिहिलयत गिरिश....
फिरण्याचा त्रास-बिस काही नाही झाला, फक्त दुबई मॉलला जायचा रस्ता माहित झाला
<<<तिनं विशाल्-कौतुक्-प्रकाश
<<<तिनं विशाल्-कौतुक्-प्रकाश अन रविच्या कविता इत्क्या ठेक्यात म्हटल्या की आता या चौघांनी तिला रॉयल्टी द्यायला हवी... जोक्स अपार्ट पण यातनं दिसल की मायबोलीवर लिखाणावर प्रेम करणारी दिलदार मंडळी आहे.. ज्या पॅशननी या कविता तिनं सादर केल्या त्यात तुम्ही चौघांनीही खुप कमावल राजेहो... चिअर्स टू दॅट !!!>>>>
भरुन पावलं देवानु !
कुलकर्णी शेठ, क्या बात है!
कुलकर्णी शेठ,
क्या बात है! सारीकाला तुमचा अभिप्राय कळवतो... (सॉरी कशाला बॉस, दोन्हीकडून जीत मेरी ही है)
होय श्यामली च्या मुलांची गाणी पुढील वेळी ऐकायची(च) आहेत.
योग अहो तुमच्या दुबईत
योग अहो तुमच्या दुबईत गेलेल्या भारतियांपैकी निम्मे पुणेकरच असतील
बादवे तुम्ही ही मुळ पुणेकर दिसता
असो, वर्षा -नायर आणि शामली माझ्या शाळु आणी कॉलेजाळू मैत्रीणी आहेत.
शामले , अगदी अगदी, पण आपल्याला कोणी घुसले तरी चालेल पण
शामले तुझ्या पॅकेज मधे
शामले तुझ्या पॅकेज मधे पुढच्यावेळी देविकाचच गाण ठेवायला पाहिजे
वा ! वा ! मस्त.
वा ! वा ! मस्त.
>बादवे तुम्ही ही मुळ पुणेकर
>बादवे तुम्ही ही मुळ पुणेकर दिसता
मी मूळ ठाणेकर.. पुणेकर होवू घातलाय्...अजून मुहूर्त नाही लागलेला, झालो की प्रथम तुम्हाला कळवतो/कळेलच
करा करा गटग करा :जळणारी
करा करा गटग करा :जळणारी भावली:
गिरीश, वृतांतल्या शेवटल्या ओळी भारी! असे हे मायबोलीकर्सच आहेत आयुष्यात म्हणून, नायतर काय मजा? होकिनै श्यामलीताई (खरच कार्यक्रम करा, वृतांत्/विडीओ यायलाच हवा बरं)
चिन्नु हैद्राबादेत आहेत की
चिन्नु हैद्राबादेत आहेत की लोक कर गोळा सगळ्यांना आणि वाच कविता हाय काय नाय काय
हो, पुढच्या गटग लगेच होणार असं दिसत्य मग बघू या काय होतय ते.
होय श्यामली च्या मुलांची गाणी पुढील वेळी ऐकायची(च) आहेत.>>>कौशल गातोच कुठेही, पण मॅडमचा मूड असला तरच गातात बघू आत्तापासून पटवायला सुरवात करते आता
वाह व्वा! गिरीशजी क्या बात
वाह व्वा! गिरीशजी क्या बात है! तुम्ही जे प्रत्येकाचे नेमके गुण टिपले आणि त्याचे नेमके वर्णन केले आहे त्याबद्दल तुम्हाला सलाम. खरे कलावंत आणि हाडाचे कवी आहात.
Pages