श्यामली यांचे रंगीबेरंगी पान

कवडसा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा. स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो देखणा कवडसा. थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती. माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं. उन्हं डोक्यावर आली की हा इथून थोडं सरकून पुढल्या घरात मग अंगणात मग फाटकाच्याबाहेर असं करत करत दिसेनासा व्हायचा.
कधी कधी रात्रीच पण करमायचं नाही बहुदा त्याला,चांदण्यांचं हसू घेऊन यायचा बऱ्याचदा.तेव्हा तर काय भरपूर रिकामा वेळ असायचा छान गप्पा व्हायच्या. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगायचा मीही बोलायचे काहीबाही.

प्रकार: 

अर्चना

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

विषय: 
प्रकार: 

जीटीजी :)

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आहे गेल्या वर्षीची पण काहिहि बदल न करता तशिच्या तशी परत .....सारख जीटीजी ऐकून ऐकून परत एकदा पोस्टावी वाटली.
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/127142.html?1189519094

औंदा तरी जीटीजी करूया की रं

तीन चार तरी टाळकी जमूया की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं॥

एनजेकरांनी बगा लै गाजवला फड
झक्किंनी म्हन सोय केली फक्कड
आर आपन बी गाजावाजा करू या की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं॥१॥

बंगळुरातली पोरं बी लै हुशार
केला की वो जीटीजी जरी व्हती चार
आता माज बी जरा तुमी ऐका की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं ॥२॥

सिएकरांनी लै येळा घातला घाट
कित्यांदा जीटीजी ची लागली वाट

विषय: 

कवितेस

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सोडायचा नव्हताच हात,
आधी नाईलाज म्हणून आले होते आस-याला,
मग सवय झाली,
मग व्यसन,
पण आताशा तूही दुरावत चाललीयेस
मला तर विसरच पडत चाललाय,
कारणाचा शोध घेतीये,
पटेल असं सापडलं नाहीये अजूनही,
सध्या जे सुचेल ते कारण पटवून घेणं चाललंय
असो,
भेटुच परत कधी तरी..

विषय: 
प्रकार: 

जायके का सफर-औरंगाबाद

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आता आम्हा सगळ्या औरंगाबादकरांचा लाडका म्हणजे भोलेशंकर चाटवाला. खरंतर सहजासहजी सापडेल किंवा पोचता येईल अश्या ठिकाणी अजिबात नाहीये पण याच्याकडच्या पदार्थांची चव एकदा एखाद्यानी घेतली तर सहजा सहजी दुसरीकडे भेळ,दहिपुरी इत्यादी पदार्थ खायला जाणार नाही याची फुल्ल ग्यारंटी . याच्याकडची भेळ म्हणजे आहाहा.......

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - श्यामली यांचे रंगीबेरंगी पान