कवडसा
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
10
कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा. स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो देखणा कवडसा. थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती. माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं. उन्हं डोक्यावर आली की हा इथून थोडं सरकून पुढल्या घरात मग अंगणात मग फाटकाच्याबाहेर असं करत करत दिसेनासा व्हायचा.
कधी कधी रात्रीच पण करमायचं नाही बहुदा त्याला,चांदण्यांचं हसू घेऊन यायचा बऱ्याचदा.तेव्हा तर काय भरपूर रिकामा वेळ असायचा छान गप्पा व्हायच्या. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगायचा मीही बोलायचे काहीबाही.
घराची डागडुजी झाली, कुठे कुठे पडलेल्या फटी वगैरे बुजवल्या गेल्या, रंगबिंग देऊन झाला... मस्त वाटतंय नवं नवं...
कवडसा तेवढा हरवलाय मात्र!
विषय:
प्रकार:
शेअर करा
शामली
शामली ..सुंदर..:)
नवा रंग दिलास तरी आणि फटी बुजवल्यातरी त्या कायमस्वरूपी नसतात येइल कवडसा परत...:)
श्यामली,
श्यामली, खूप छान लिहीलंयत...
हे वाचून आठवण झाली... लहान असताना असे कवडसे तळहातावर पकडण्याचा प्रयत्न करायचो आम्ही...
खरंय, आताच्या घरात असे कवडसे येत नाहीत, मोठ्ठाल्ल्या फ्रेन्च विन्डोजमधून खूप ऊन येतं. ते आवरायला त्याहून मोठे पडदे...
गद्य ? हे तर
गद्य ? हे तर काव्यच आहे
छानच लिहीलय
मलाही लहानपणीची आठवण झाली .. बरेच कवडसे हरवलेत आता...
सुधीर
सुंदर...
धन्यवाद
खुप छान
खुप छान लिहिलय... आवडलं. खरच लहानपणीच्या कवडश्यांची आठवण झाली. गावच्या घरात अंथरुणात पडल्यावर कौलारू छपरातल्या काचेच्या भिंगातून डोकावणारा चांदोबा आठवला.
आमच्या सध्याच्या अपार्टमेंटच्या दरवाजातून एक कवडसा येतो. अगदी सप्तरंगी..
>>गावच्या
>>गावच्या घरात अंथरुणात पडल्यावर कौलारू छपरातल्या काचेच्या भिंगातून डोकावणारा चांदोबा आठवला.
अगदी! आजोळच्या घरच्या स्वयंपाक घरातही सकाळच्या वेळेस असे कवडसे पडायचे जमिनीवर. आणि खिडकीतून येणारे सूर्यकिरण...
चुलीपाशी काय काय निगुतीनं बनवणारी आजी.. खूप आठवणी आल्या..
धन्यवाद
धन्यवाद लोक्स
माझ्या कवडश्यानी ब-याच जणांना कवडसे आठवले म्हणायचं 
कौलांमधून येणारा कवडसा बघायला
कौलांमधून येणारा कवडसा बघायला आता गावी जावेसे वाटतंय...
सुरेख लिहिलंय. मागे एका
सुरेख लिहिलंय. मागे एका विकेंडला एका डोगंराळ भागातल्या गावाला भेट दिली. दोन दिवस तिथेच मुक्काम ठोकला होता. अश्याच एका सकाळी पापण्यांवर हा कवडसा हळूवार रेंगाळला होता. शेणा मातीच्या भिंती आणि सारवण असल्याने धुलीकणांच्या गमती जमती खूप सुरेख दिसत होत्या त्या कवडश्यामधे.