कवितेस

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सोडायचा नव्हताच हात,
आधी नाईलाज म्हणून आले होते आस-याला,
मग सवय झाली,
मग व्यसन,
पण आताशा तूही दुरावत चाललीयेस
मला तर विसरच पडत चाललाय,
कारणाचा शोध घेतीये,
पटेल असं सापडलं नाहीये अजूनही,
सध्या जे सुचेल ते कारण पटवून घेणं चाललंय
असो,
भेटुच परत कधी तरी..

विषय: 
प्रकार: 

मग व्यसन,
........
भेटुच परत कधी तरी..

मस्त जमल्ये. व्वा.

कालच सांगितल तुला, जमलीये म्हणून Happy सुरेखच Happy
अजून येउदेत

तुमचे प्रतिसाद वाचून .
लिहून जरा बरं वाटतय खरंच , धन्यवाद सुधीर, शैलजा Happy

जास्त मागे लागू नकोस तिच्या.. जितकी मागे लागशील तितकी दूर पळून जाईल..

थोडे दिवस ढुंकूनही पाहू नकोस मग बघ कशी तुझ्या मागे मागे करेल ती Happy

visit http://milindchhatre.blogspot.com

खरय तेच बघु या कधी उगवतोय तो दिवस

पण हे लिहितानाच भेटली ना ती? Happy

तु आणि तुझी कविता...दोघी सख्या ना...रुसवे फुगवे चालायचेच! आज तर ती आलिच ना. पुन्हा आली की कळव आम्हाला :-))

पल्ले, कळव म्हणजे काय ,त्याशिवाय पर्याय नाहीच

अमोल, आत्ता भेटली हे मात्र खरं Happy
तुम्हा दोघांचेही मन:पूर्वक आभार

अच्छा .......तो ये बात है.....!!
तुमची दोघींची भेट लवकरात लवकर होवो Happy
आमचाही तोच आहे रोना Sad