चल खेळू या...
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
7
चल खेळू या...
डाव मांडून तुझं खुल्या दिलांन, आमंत्रण,
म्हटल, चला खेळू या.
मी तुझ्या बाजुनी खेळणार, म्हटल, वा!
मग पलिकडे कोण? नाही तसं नाही तिकडेही मीच खेळणार;
अं? म्हणजे...
मी तुझ्या बाजुनी खेळणार,
मीच माझ्याही बाजुनी खेळणार.
चल खेळू या?
दान तुझ्यात हातात असणार..
खेळाचे नियम तेही तुझेच
हरकत नसेल माझी
दिवसेंदिवस चालला खेळ तरी चालेल
चल खेळू या...!
तू पाऊस आण, नखशिखांत भिजव
तू उन्ह पाड....लाही लाही करुन सोड
तू शिशीरात पाने गाळ,
तू वादळानी उध्वस्त कर
तू लाटामधे दडव सगळं
आणि विचार मग.... चल खेळू या?
विषय:
प्रकार:
शेअर करा
श्यामली, यालाचं जगणं म्हणावं
श्यामली, यालाचं जगणं म्हणावं का?
छान! गाणं आहे का हे? नसेल तर
छान!
गाणं आहे का हे?
नसेल तर मग "खेळाचे नीयम तेही तुझेच"
इथे 'नियम' हवं...
नचिकेत, बदल केला आहे, गाणं
नचिकेत, बदल केला आहे, गाणं नाहीये रे हे असच
छान लिहिलेस श्यामली. एक
छान लिहिलेस श्यामली. एक सुचवतो.. लांटामधे गिळून टाक सर्व, गिळंकृत कर सर्व, गिळ सर्व असे काही नेमके वाटले असते.
बी, तुझ्या सूचनेबद्दल आभार,
बी, तुझ्या सूचनेबद्दल आभार, पण मला दडव असच म्हणायच असेल तर मी, गिळंकृत कर असं का म्हणाव ना?
प्रतिसादाबद्दल आभार.
फारच आवडल.
फारच आवडल.
फारच छान !!
फारच छान !!