कॉकटेल्स, मॉकटेल्सबाबत आधी काहीच माहिती नव्हती. नोकरीसाठी दिल्लीत आलो आणि जरा शिंगं फुटली खरी पण या सगळ्या 'अक्वायर्ड टेस्ट्स' असल्याने त्यात अनुकरणाचा भाग जास्त होता. कधी कधी माकड-पाचर न्यायानुसार नको ते प्रयोग करून अंगाशी पण आले होते. कुठेसे पाहिले म्हणून बिअर मध्ये 'स्मॉल' जीन घालून बेफाम हाणल्यावर २४ तास सुषुम्नावस्थेत राहिल्याची कटू आठवण सुद्धा होती. दिल्लीत २००० सालाच्या आसपास लाऊंज बारचे नवे पेव फुटले होते. तिथली मंडळी हवेत बाटल्या वगैरे फिरवताना आणि ग्लासातून आग लावताना पाहून हाय क्लास डोंबार्याचे खेळ पाहिल्याचे सुख मिळायचे खरे, पण एकूणात हा आपला प्रांत नाही हे स्वतःशी कबूल करून मी स्वस्थ होतो. तशात टॉम क्रूझचा 'कॉकटेल्स' पहायला मिळाला. त्यानंतर मात्र हे प्रयोग नव्याने आणि जरा सजगपणे करायची ओढ लागली. तोपर्यंत इंटरनेटचा प्रसारही वाढल्याने बरीच माहिती आणि साहित्य सहज उपलब्ध झाले होते. हळू हळू मजा यायला लागली. घरी करून पाहताना निर्मितीचा आनंद मिळतोच पण बाजारात बारा आण्याला मिळणारे ड्रिंक घरी बनवायला चार आणेही लागत नाहीत हा साक्षात्कारही सुखद होता. लाऊंज-पब मधले कर्कश संगीत (?) ऐकण्यापेक्षा घरात आवडत्या पुस्तकाबरोबर अथवा चांगला चित्रपट पहात पहात घेतलेले 'ड्रिंक' शतपटीने 'रीलॅक्स' करते हेही लक्षात आले. यथावकाश लग्न झाल्यावर 'बूंद बूंद का हिसाब' होतोय खरा पण तरीही मी माझे हे रासायनिक प्रयोग - अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक - सुरूच ठेवले आहेत.
तांत्रिकदृष्ट्या कुरास्सो लिक्योर आहे पण मी वापरलेले 'सिरप' आहे आणि त्यात अल्कोहोल नाही तरीही लहान मुलांना शक्यतो देऊ नये.
साहित्यः
ब्लू कुरास्सो : ३० मि.ली. (दोन टे.स्पू.) उच्चार क्युरास्सो, कुरासाव् असाही होऊ शकतो कदाचित .
लिंबाचा रस : १५ मि.ली.
सेवन अप / स्प्राईट
अर्धे लिंबू
४-५ पुदिना पाने
एक चिमूट मीठ आणि साखर
बर्फाचे खडे
सजावटीसाठी लिंबाची चकती
कृती
शेकरमधे कुरासो, लिंबूरस, लिंबाची छोटी फोड, मीठ, साखर, पुदिना घालून ठेचून घ्या (मडल असे विंग्रजीत म्हणतात), नंतर बर्फाचे खडे घालून सर्व रसायन चांगले हलवून मिक्स करा.
लोंग स्टेम ग्लासमधे हे मिश्रण घालून वरून सेवन अप किंवा स्प्राईटने टॉप-अप करा. पाहिजे तर वरून बर्फाचा खडा घाला
ग्लासला लिम्बाची चकती लावून सर्व्ह करा.
ह्याच्यात एक ६ रुपयाला मिळतो
ह्याच्यात एक ६ रुपयाला मिळतो त्या आयस्क्रिम कप मधलं व्हॅनिला आयस्क्रिम घालून बीट करा आणखीन अफाट लागतं
७ अप च्या जागी स्प्राईट,
७ अप च्या जागी स्प्राईट, लिमका पण चालतं. लिमका असेल तर लिंबू नसलं तरी काम होतं![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कविन, दारूत स्प्राईट,
कविन, दारूत स्प्राईट, आईसक्रिम अश्या गोष्टी घालून स्प्राईट्-आईसक्रिमची वाट कशाला लावायची?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ब्लू कुरासाव लिक्योर असते ना?
ब्लू कुरासाव लिक्योर असते ना? मग मॉकटेल कसे?
मंजू, ते मॉक्टेल म्हणतायत. पण
मंजू, ते मॉक्टेल म्हणतायत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण तुझा मुद्दा एकदम करेक्ट.
आधीच स्प्राइट/ सेवन अप गोड असतं, त्यात वर साखर आणि परत आइसक्रिम!
मंजे, ब्ल्यु कोरोस्सो हे जे
मंजे, ब्ल्यु कोरोस्सो हे जे मॅप्रो मधे मिळतं तेच सिरप आहे ना? नसेल तर माझा पास समजा रे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त दिसत आहे
मस्त दिसत आहे
कवे, जगतात ब्लू कुरासाव ही
कवे, जगतात ब्लू कुरासाव ही लिक्योर आहे. आपल्याकडे त्याचे नॉन अल्कोहोलिक प्रकरण मिळते का?
मॅप्रोचे ब्लू कुरासाव नाही
मॅप्रोचे ब्लू कुरासाव नाही बघितले. पण त्यांचे 'सिट्रस (सायट्रस) ब्लू' म्हणून एक उत्पादन आहे ते चालायला हरकत नाही यात असे वाटतय. ते नॉन अल्कॉहॉलीक असते.
तांत्रिकदृष्ट्या कुरास्सो
तांत्रिकदृष्ट्या कुरास्सो लिकर आहे पण एवढ्या छोट्या मात्रेत चढत वगैरे अजिबात नाही <<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मान्य पण मग लहान मुलांसाठी नको असे मेन्शन करा.
बादवे लिकर नाही हो लिक्योर.
लिकर = Liquor हे सर्वच दारवांना म्हणले जाते
लिक्योर = Liqueur हे स्पेसिफिकली फ्लेवर्ड(आणि साखर किंवा कुठलेतरी स्वीटनर घातलेल्या) डिस्टील्ड अल्कोहोलिक बेव्हरेजेसना म्हणले जाते.
माफ करा पण फार प्रिय विषय आहे त्यामुळे स्पेसिफाय केले.
अरे देवा!! मॅप्रोचे सिट्रस
अरे देवा!!
मॅप्रोचे सिट्रस ब्लू क्रश आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यातही आंबट-गोड प्रकरणात स्प्राईट आणि आईसक्रिम कशाला घालायचं हा प्रश्न आहेच. प्लेन साखरविरहित सोडा वापरा आणि मॉकटेलची चव खुलवा
धन्यवाद नीधप आणि इतर सर्व.
धन्यवाद नीधप आणि इतर सर्व. योग्य ते बदल केले आहेत.
एक कॉकटेल्स का धागा होज्जाय?
एक कॉकटेल्स का धागा होज्जाय?
जरूर, व्हाय नॉट ?
जरूर, व्हाय नॉट ?
अॅडमिनना विचारलेय. परवानगी
अॅडमिनना विचारलेय. परवानगी मिळाली तर टाकेन काही.
इकडे अरभाटाच्या दोन-तीन कृती
इकडे अरभाटाच्या दोन-तीन कृती आहेत कॉकटेलच्या.
blue curacao cordial navach
blue curacao cordial navach panchganichya malas fruits cha product ahe. mi tyabaddal boltey.tyachy sitevar aahe mahiti
एक कॉकटेल्स का धागा
एक कॉकटेल्स का धागा होज्जाय?
>>> हो ज्जाय.
कविता, तू मॅप्रो म्हणालीस
कविता, तू मॅप्रो म्हणालीस म्हणून आम्ही मॅप्रोचे प्रॉडक्ट शोधले
असो!
गुड.. मग मी पण टाकते.
गुड.. मग मी पण टाकते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजूडी कविता, माला या
मंजूडी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कविता, माला या मॅप्रो? येक पे ही रयना जी!
त्या सिट्रस ब्लूची चव आवडली (आणि जरा वेगळी वाटली) म्हणून पाचगणीवरून येताना गिफ्टायला त्याच्या काही बाटल्या आणल्या होत्या. त्या दिलेल्या बहुतेकांनी त्याच्या निळ्या रंगाला नाके मुरडली होती. 'तरी मी सांगत होते....' हा जगप्रसिद्ध डायलॉग मला त्यानंतर वारंवार ऐकवण्यात आला होता. तेंव्हा त्या सिट्रस ब्लूचा विसर पडणे नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधव बरं ते मालाच आहे. मी
माधव
बरं ते मालाच आहे. मी आयस्क्रीम घालून बाहेरहीप्यायलय घरीही केलय आणि पाहुण्यांनाही पाजलय. परत प्यायला तयार झाले म्हणजे चव फसली नसावीच ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त दिसतय हे रंग छानच
मस्त दिसतय हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रंग छानच 'चढलाय'
धन्यवाद लाजो
धन्यवाद लाजो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाय क्लास डोंबारी हे
हाय क्लास डोंबारी
हे भारीये.
कॄतीच्या आधीची प्रस्तावना नेहमीच आवडते.
मॉकटेल्स/कॉकटेल्स माझेही प्रचंड फेव्हरिट. हे नक्की करून पिण्यात येईल.
एक कॉकटेल्स का धागा होज्जाय?
एक कॉकटेल्स का धागा होज्जाय? >>> नक्कीच.
झाला ऑलरेडी काढून.
झाला ऑलरेडी काढून.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मालाजचे ब्लु कोराक्को मिळते
मालाजचे ब्लु कोराक्को मिळते की. त्यात नसते लिकर. त्यामुळे त्याचे बनवले तर मॉकटेलच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग निळाईचा मग अप्रतिमच.
रंग निळाईचा मग अप्रतिमच.