साहित्य :
सॅलड -
१) १ कप पर्ल कुसकुस
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरचीची चटणी किंवा कोथिंबीर पेस्टो - चवीनुसार
४) हरिसा पेस्ट किंवा लाल मिरच्यांचा ठेचा
५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे (ऐच्छिक)
७) काकडीचे पातळ काप
८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)
९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार
१०) मीठ चवीनुसार
टँगी योगर्ट सॉस -
१) ३/४ कप घट्ट दही
२) वाळलेला किंवा ताजा पुदिना
३) लिंबाचा रस चवीनुसार
४) बारीक कुटलेली मिरी व मीठ चवी नुसार
सजावटीकरता -
१) टोस्टेड अक्रोड / बदामाचे काप
२) थोडी पार्स्ले / बेसिल / कोथिंबीर यांची पाने
कृती -
१) २ कप पाणी उकळत ठेवा. त्यात थोडे मीठ व ऑऑ घाला. पाणी उकळले की त्यात पर्ल कुसकुस (इस्राएली कुसकुस) घाला आणि जस्ट शिजेपर्यंत उकळा. शिजलेल्या कुसकुसचा आकार साधारण दुप्पट होईल. कुसकुस चाळणीत ओतून पाणी काढून टाका आणि त्यावर एकदा गार पाणी ओता. नीट निथळून घ्या. कुसकुसचे दाणे मोकळे दिसले पाहिजेत.
२) कुसकुस शिजत असताना दुसरीकडे एका बोलमध्ये ऑलिव्ह ऑईलमध्ये हरिसा पेस्ट, लिंबाचा रस, मीठ एकत्र करा.
३) कॅप्सिकम ओवनमध्ये रोस्ट करा किंवा गॅसवर भाजा. सालं काढून रोस्टेड कॅप्सिकमचे लांब तुकडे करुन घ्या, पालकाची पाने धुऊन ब्लांच* करून घ्या.
४) दुसर्या बोलमध्ये दह्यात चवीला मीठ घालून फेटून घ्या. त्यात चुरडलेला सुकवलेला पुदिना किंवा चिरलेला ताजा पुदिना एकत्र करा. हवं तर थोडी पाप्रिका / काश्मिरी मिरची पावडर घाला. चव घेऊन हवं असल्यास लिंबाचा रस घाला. सॉस फ्रिजमध्ये ठेवून द्या.
५) शिजलेल्या पर्ल कुसकुसचे दोन वाटे करा. एकात हरिसा पेस्ट +१/२ टेस्पून ऑऑ घालून मिक्स करा आणि दुसर्या वाट्यात हिरवी चटणी + १/२ टे स्पून ऑऑ घालून मिक्स करा. यात घालणार असाल तर ड्राइड क्रॅनबेरीचे / बेदाण्याचे तुकडे घाला. चवीनुसार मीठ-मिरी घालून नीट मिक्स करून घ्या.
६) काचेच्या दोन बोल्सना आतून क्लिंग फिल्म (प्लॅस्टिक रॅप) लावून घ्या.
७) बोलमध्ये आधी लाल कुसकुसचे मिश्रण, त्यावर पालकाची पाने, मग हिरवे कुसकुस, कॅप्सिकम स्ट्रिप्स असे थर लावा. मध्ये काकडीचे काप आणि योगर्ट ड्रेसिंगचे थरही लावा. लेअर्स तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे लावा. फक्त नीट कॉन्ट्रास्ट दिसेल असे पाहा. एक लक्षात ठेवा की, बोलमधील खालची बाजू ही स्टॅक उपडा केल्यावर स्टॅकची वरची बाजु असणार आहे.
८) क्लिंग रॅपची टोके जुळवून बोल बंद करा आणि बोल्स थोडा वेळ फ्रिझरमध्ये ठेवा (२०-३० मिनिटे).
९) सर्व्ह करताना बोलमधून हलकेच क्लिंग रॅपसकट स्टॅक बाहेर काढा आणि स्टॅक प्लेटवर उपडा करा.
१०) सॅलड स्टॅक्सवर टोस्टेड अक्रोड / बदामाचे काप घालून योगर्ट ड्रेसिंग / हिरवी/लाल चटणी सोबत द्या. या सोबत पिटा ब्रेडच्या चिप्स छान लागतील.
अधिक टिपा:
१) पर्ल कुसकुस पास्त्याचाच प्रकार आहे. मिडिटरेनिअन कुकिंगमध्ये याचा जास्त वापर होतो.
२) वापरलेल्या सगळ्या पदार्थांत पाण्याचा अंश कमीत कमी असेल अशी खात्री करून घ्या. अन्यथा स्टॅकला पाणी सुटून नीट उभा रहाणार नाही.
३) कॅप्सिकम रोस्ट करताना थोडे तेल लावा. बाहेरचे साल काळे झाले की कॅप्सिकम प्लॅस्टिकच्या पिशवीत घाला आणि पिशवी बंद करा. ५-१० मिनिटांनी कॅप्सिकम बाहेर काढून वरचे जळके साल काढून टाका. कॅप्सिकम कापून आतल्या बिया आणि गर काढून टाका आणि कॅप्सिकमच्या लांब स्ट्रिप्स कापा.
४) यात आवडीनुसार रोस्टेड भाज्या घालता येतील.
५) कांदा, लसूणदेखील वापरता येइल.
६) ऑऑ नसेल तर चटण्यांमध्ये वास नसलेले दुसरे तेल घालून बघा. किंवा चिली फ्लेवर्ड / लेमन फ्लेवर्ड ऑईल चालेल.
७) योगर्ट ड्रेसिंगसाठी दही घट्ट हवे.
बदलायचे पदार्थ :
पर्ल कुसकुस
हरिसा / लाल मिरचीचा ठेचा
दही
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ही नक्की लाजोची रेसेपी.
ही नक्की लाजोची रेसेपी.
अग्गोबै ! फार अवघड
अग्गोबै !
फार अवघड
आहा.. काय रेसिपी आहे.
आहा.. काय रेसिपी आहे. मस्त.
कुसकुसच्या जागी आपला दल्लिया वापरता येईल. दह्याच्या जागी मेयोनिज. ठेच्याचे काय करता येईल देव जाणे. कोणीतरी करा आणि स्पर्धेत पाठवा.
बाकी आमची डोकी इतकीच चालायची. खरी सुगरण तीच जी ह्यापेक्षा अगदी वेगळा विचार करेल आणि यापेक्षाही सवाई पाकृ पेश करेल.
यावेळी सगळ्या स्पर्धा मस्त आहेत. पाकृ स्पर्धा तर बेस्टच. पण यावेळेस पाकृ मध्ये पाकृपेक्षा प्रेझेंटेशनला जास्त शाबासकी मिळणार आहे. ज्याचा फोटो दिलखेचक, सर्वाधिक नयनसुख देणारा, त्याला मार्क मिळणार आहेत.
बाबो ! काय सुंदर दिसतंय !! मी
बाबो ! काय सुंदर दिसतंय !!
मी ह्या असल्या रेसिपी कधी मी घरात करत नाही
आणि हे असल काही घरातल्या किचन मध्ये करता येत असा सुगावा सुद्धा घरातल्यांना लागू देत नाही.
सुरेखच आहे!! साधना ताई, तरी
सुरेखच आहे!!
साधना ताई, तरी चांगले सुचवले तुम्ही. मी तर पर्ल कुसकुस ऐवजी ब्रेड, दही ऐवजी केचप आणि हारिसा ऐवजी बटर असे करून सुटसुटीत सँडविच करून खाणार
मस्तय!
मस्तय!
मस्त आहे रेस्पी शेवटच्या
मस्त आहे रेस्पी
शेवटच्या फोटोवरून मलातरी हे काम दिनेशदांचं वाटतंय. दिनेशदा आश्ट्रेलियात गेले का लाजो आंगोल्यात आहे
ते लाल फूलाफूलाचा बेस ओळखीचा
ते लाल फूलाफूलाचा बेस ओळखीचा वाटतोय
आणि ती स्वल्पविरामासारखी दही घालायची ईश्टायल .
पण लाजोच वाटतेय , तीच अशा कॉम्प्लिकेटेड रेसिपीज बनवते .
शेवटच्या फोटोवरून मलातरी हे काम दिनेशदांचं वाटतंय.>>>> वाटतय खरं .
पण पूर्ण रेसिपी नीट वाचा बरं -
त पर्ल कुसकुस (इस्राएली कुसकुस) घाला आणि जस्ट शिजेपर्यंत उकळा. शिजलेल्या कुसकुसचा आकार साधारण दुप्पट होईल. >>> या नंतर, कुसकुसच्या ईतर कुठल्याही देशाच्या नागरिकत्वाबद्दल किन्वा गुणधर्माबद्दल माहिती दिलेली नाही. ते प्रकरण तिथेच आटोपते घेण्यात आले आहे .
दुसरीकडे एका बोलमध्ये ऑलिव्ह ऑईलमध्ये हरिसा पेस्ट, लिंबाचा रस, मीठ एकत्र करा >> या नंतरही , "इथे" मिळणार्या हरिसा सब्स्टिट्युट बद्दल कोणतीही विशेश टिप्पणी नाही.
"इथेल्या" हिरव्या मिरच्या किती तिखट किन्वा कमी तिखट असल्यामुळे किती प्रमाणात वापरल्या त्याबद्दलही काही उल्लेख आढळत नाही
जर ही रेसिपि तशिच्या तशी असेल तर हे दिनेश्दा नसण्याची शक्यता बळावते. संयोजकानी काटछाट केली असेल तर माहित नाही .
( दिनेश्दा , प्लीज हां , एक डाव माफी . तुमची स्टाईल फार माहित झाली आहे म्हणून म्हटले )
शेवटच्या फोटोची स्टाईल
शेवटच्या फोटोची स्टाईल दिनेशदांची आहे पण रेसीपी लाजोतैचीच वाटतेय
पा.कॄ.कार ओळखण्याचा सगळ्यांना
पा.कॄ.कार ओळखण्याचा सगळ्यांना छंदच जडलाय, मजा येतेय वाचायला सगळ्यांचे गेस वर्क.
सुरेख आहे रेस्पी benchtop
सुरेख आहे रेस्पी
benchtop बघून तरी लाजोच वाटतेय
लाजो लाजो लाजो फक्त लाजोच!!!
लाजो लाजो लाजो फक्त लाजोच!!!
सुर्रेख ,चवदार रेसिपी!!!
ऑर्डर ऑर्डर!! अरे स्पर्धा
ऑर्डर ऑर्डर!! अरे स्पर्धा कुठली .. अभ्यास काय चाल्लायं! ताळमेळचं नाही
लाजो है यह. बाकी, प्लेटात
लाजो है यह.
बाकी, प्लेटात ठेवलेले वॉलनट्स हे बहुतेक "ही रेसिपी करण्यासाठी डबल मेंदूची आवश्यकता आहे" याचे प्रतीक असणार (मी कुठला पिक्चर नुकताच पाहिलाय!!!!!)
प्लेटात ठेवलेले वॉलनट्स हे
प्लेटात ठेवलेले वॉलनट्स हे बहुतेक "ही रेसिपी करण्यासाठी डबल मेंदूची आवश्यकता आहे" याचे प्रतीक असणार >> ज्जेबात नंदिनी.
मला तर रेसिपिच्या नावावरुनच
मला तर रेसिपिच्या नावावरुनच लाजोतै ची असेल अस वाटल.मस्त रेसिपि.
काय सुंदर रेसिपी आहे.... आणि
काय सुंदर रेसिपी आहे....
आणि ती कोणी केलि आहे हे गेसेस अजुन भारी
"रेसिपी कोणाची आहे ओळखा" अशी एक उपस्पर्धा पण आहे का या पाककृती स्पर्धेसोबत
देवा, शेरलॉक होम्सच्या
देवा, शेरलॉक होम्सच्या मावश्या शोभतील सगळ्या
आले आले , एक संशयित आले .
आले आले , एक संशयित आले .
लाजोच ! असल खतरनाक भारी तीच
लाजोच ! असल खतरनाक भारी तीच करू जाणे
लाजोचीच आहे ही रेसेपी. दिनेश
लाजोचीच आहे ही रेसेपी. दिनेश च्या ओट्याचा /टेबलटॉपचा रंग वेगळा आहे. वरच्या फोटोतल्यासारखा ग्रानाइटचा ओटा/टेबलटॉप लाजोच्या रेसेपींमध्ये आधी दिसला आहे. ती काळी डिश पण तिच्या रेसेपींमध्ये १-२ वेळा दिसलीये. स्वल्पविरामाच्या आकारात सॉस घालायची स्टाईल पण तिने आधी वापरली होती.
रेसेपी नाव, करण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत सगळं तिचंच आहे.
अल्पना!! :हातपाय गळालेला
अल्पना!! :हातपाय गळालेला बाहुबली:
अरे या रेसिपीचे जनक
अरे या रेसिपीचे जनक ओळाखण्याच्या भानगडीत रेसिपी करायचे विसरु नका बुवा... इथे आम्ही डोळे लावून बसलोय, कधी स्पर्धा सुरू होतेय आणि कधी रेसिपी दिसताहेत त्यासाठी..
अल्पना इज राईट. मी लाजोचा ओटा बघुन आले लगेच, सेम टू सेम. बाकी लाजोची रेसिपी ओळखब्यासाठी ओट्यापर्यंत जायची गरज नव्हतीच. रेसिपीतली पदार्थ सजवायची खटपट पाहुनच ओळखले होते मी.
कसले हुषार आहेत सगळे माबोकर.
कसले हुषार आहेत सगळे माबोकर.
रेसिपी कुणाची कसे पर्टापट ओळ्खत आहेत.
दिनेश च्या ओट्याचा /टेबलटॉपचा
दिनेश च्या ओट्याचा /टेबलटॉपचा रंग वेगळा आहे. वरच्या फोटोतल्यासारखा ग्रानाइटचा ओटा/टेबलटॉप लाजोच्या रेसेपींमध्ये आधी दिसला आहे. ती काळी डिश पण तिच्या रेसेपींमध्ये १-२ वेळा दिसलीये. स्वल्पविरामाच्या आकारात सॉस घालायची स्टाईल पण तिने आधी वापरली होती. >>:खोखो: अल्पना, तुला मायबोलीवरील शेरलॉकीण होम्सचा किताब देण्यात येत आहे
प्रेझेंटेशन आणि फोटो मस्तच.
प्रेझेंटेशन आणि फोटो मस्तच. एकदम हेल्दी रेसिपी. चवीलाही मस्तच असणार.
मलाही लाजोचीच वाटतेय ही रेसिपी.
प्रवेशिका येऊ द्यात लवकर!
प्रवेशिका येऊ द्यात लवकर!
इथे दही बदलायचे आहे तर टँगी
इथे दही बदलायचे आहे तर टँगी 'योगर्ट' सॉस कसे तयार होणार?
अख्खे योगर्ट सॉस बदलले तर चालेल का? तसंच, ऑऑच्या ऐवजी घरात उपलब्ध असेल ते तेल/ तूप/बटर/ लोणी घातले तर चालेल का?
दही आणि योगर्ट सॉस ची गंमत
दही आणि योगर्ट सॉस ची गंमत लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद मंजूडी. योगर्ट सॉस बदली केला तर चालेल. अॉलिव्ह अॉईल सहजी उपलब्ध असते त्यामुळे ते बदलू नका.
Pages