खड्ड्यातील चिकन
खड्ड्यातील कोंबडी अथवा डब्ब्यातील कोंबडी
Dabba Chicken..
(पाककृती)
साहित्य: (५ कोंबड्यांसाठी)
दालचिनी पावडर : ६ चमचे
वेलची पावडर : १० ते १२ वेलच्यांची
खसखस : २ चमचे
कोथींबीर : ८ ते १० काड्या
आले -एक इंची : अदमासे १० नग
काळीमिरी पावडर : १ चमचा
लसूण : ४ ते ५ आख्खे कळे
वरील सर्व साहित्याचे वाटण करून घ्यावे
आजच्यासारखाच तो बुद्धपौर्णिमेचा दिवस होता. असेच संध्याकाळचे ५ वाजत आले होते. रात्रीची सर्व तयारी करून मी येऊर फाट्यावर असणाऱ्या उपवनच्या त्या वनखात्याच्या ऑफिसमध्ये नुकताच पोचलो होतो. माझ्यासारखे अजून २-४ उत्साही तरुण तिथे बाजूला उभे होते. आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. काही वेळात ऑफिसच्या आतून उप वनअधीक्षक मुंडे साहेब आणि २ गार्ड बाहेर आले. गार्डसकडे बघत ते म्हणाले,"पवार. तुम्ही या दोघांना घेऊन फणसाच्या पाण्यावर जा. पाटील, तुम्ही ह्या तिघांना घेऊन आंब्याच्या पाण्यावर जा. आणि हो सकाळी ७च्या आत परत या. जास्त उशीर नको. सर्व सामान घेतलाय नं" दोघांनी फक्त मान डोलावली.