'मेतकुट जमलं!' हा लेख हॉटेल सुरु करतानाचे अनुभव आणि सुरु झाल्यावर पहिल्या काही दिवसांमधले अनुभव यावर आधारित होता. 'अंतर्नाद' मासिकाचे संपादक श्री भानू काळे यांनी हा प्रवास जवळून पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या आग्रहाने तो लेख मी 'अंतर्नाद' साठी लिहिला होता. खालील लेख लोकसत्ता च्या आरती कदम यांनी हॉटेल सुरु झाल्यावर साधारण दोन वर्षांनी माझ्याकडून लिहून घेतला. चतुरंग पुरवणीत हा लेख यापूर्वी म्हणजे २०१७ जानेवारीत येऊन गेलाय. 'मायबोली' च्या वाचकांसाठी पुनश्च देत आहे...
ठाण्यामधे मुलीला गायनाचा तास्/क्लास सुरु करायचा आहे..
तिचं वयं ५ पुर्ण आहे..
आवाज चांगला आहे..नाजुक आहे.. तिला आवड निर्माण होईल का ते पहायच आहे..
कोणाला माहिती आहेत का क्लासेस ठाण्यामधे?
तिने आधी असं काही केलं नाहिये .. ही पहिली वेळ अशा क्लास ला जायची..
मदत हवी...
सात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...
ठाणे शहर म्हणजे तलावांचे शहर
या आमच्या तलावांच्या शहरातील सगळ्यांच आवडत ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव उर्फ तलाव पाळी.
रात्रीच्या अंधारात कृत्रिम दिव्यांच्या लखलखाटात येथील नजारा टिपण्याचा हा छोटासा प्रयत्न ...
प्रकाशचित्र १
प्रकाशचित्र २
रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास! पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.