घोडबंदर रोड, ठाणे एरियात चांगले प्री-स्कूल्/डे-केअर सुचवा.

Submitted by मी अश्विनी on 20 December, 2018 - 10:31

आम्ही पुण्यावरून ठाण्याला मुव होत आहोत.
पुण्यात प्री-स्कूल्/डे-केअर ची गरज पडली नाही पण आता ठाण्यात त्याची निकडीने गरज आहे.
चार आणि दोन वर्षांचा मुलगा आणि मुलगीसाठी घोडबंदर रोड, ठाणे एरियात चांगले प्री-स्कूल्/डे-केअर सुचवाल का?
ह्या एरियातल्या प्री-स्कूल्/डे-केअरचा तुमचा वा ओळ्खीतल्यांचा वैयक्तिक अनुभव असेल तर ऊत्तमच.
प्री-स्कूल्/डे-केअर निवडतांना कुठल्या बाबी बघाव्यात ते सुद्धा कळले तर खूपच मदत होईल.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घोडबंदर रोडवर बरेच पर्याय आहेत.
मात्र तुम्ही नेमके कुठे राहणार त्यावर माहिती अवलंबून आहे.
कारण ठाण्याचा हा भाग गेल्या २-४ वर्षांत प्रचंड फोफावलेला आहे.

वाघबिळ चालणार असेल तर पोदार डेकेअर नक्क्की सुचवेन. ही मेन शाळा नव्हे. इथे प्रीस्कुल आणि डेकेअर आहे. अतिशय उत्तम अनुभव आहे. बेसिकली हा एक बंगला आहे त्यामुळे स्वतःचे सेपरेट किचन आहे जिथे मुलांना जाता येत नाही. भरपूर रुम्स आहेत, आवार आहे. त्यामुळे मुलांना मोकळ्या हवेत खेळता येते. फ्लॅट असेल तर ही सुविधा मिळ्त नाही. आणि बाहेरच्या माणसांशी काही संबंध येत नाही. आसपासच्या सगळ्या शाळॅच्या बसेस तिथे येतात. जेवन चांगले असते , मुलांनी काय आणि किती खाल्लंय, झोपेची वेळ हे बोर्ड्वर लिहीलेले असते. या बोर्डचा फोटो आणि अ‍क्टिव्हिटीज् च्या दरम्यान काढ्लेले फोटो आपल्याला व्हॉट्सॅपवर दिवसातुन दोन वेळा पाठवतात. नक्की बघुन या.
हा पत्ता गुगलवर सापडला.
Dev Darshan and DDCHS, Dongripada, Thane West, Thane, Maharashtra 400607, India
Phone: +91 98192 01685

माझा अनुभव काहीसा जुना आणि एक पालक म्हणुन आहे. बाकी माझा त्या डेकेअरशी काही संबंध नाही!!

माहिती साठी आभार.
मला ह्या एरियाची फार कल्पना नाही पण आमचे नवे घर घोडबंदर रोडला लागून हायपर सिटी मॉल जावळ, कासारवडवली भागात आहे.

घोडबंदर रोडला लागून हायपर सिटी मॉल जावळ, कासारवडवली भागात आहे.

>>> कासारवडवली, आनंद नगर या भागांमध्ये काही चांगली डे-केअर आहेत. तुम्ही इकडे येऊन तो भाग बघून मग शोधाशोध करा.

राहण्याची जागा हायपरसिटी (आता बिग बझार) मॉलच्या मागच्या बाजूस असेल तर आनंदनगर भागात येणंजाणं जरासं कटकटीचं ठरू शकतं.

कासारवडवली, आनंदनगर, वाघबीळ, हिरानंदानी इस्टेट हे सगळे भाग अंतर्गत रस्त्यांनी जोडलेले आहेत.