"रुचकर मेजवानी"-पाककृती स्पर्धा-१ (मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.)

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

cooking show banner 2.jpg

*****
नमस्कार मंडळी.
आपला गणेश उत्सव मजेत सुरू आहे. डेकोरेशन पासून ते आरती पर्यंत, सगळीकडे मस्त तयारी झाली आहे. केवढी ही तयारी आणि धावपळ. बापरे ! थकला असाल ना? पोटातील कावळे काय म्हणतात?

"सुग्रासी दर्शने जाहला जठराग्नी प्रबळ
वदनी कवळ ... बोलावयासी थांब हा पळभर " !!

आपली खाद्य संस्कृती अगदी जगप्रसिद्ध आहे. वडापाव पासून ते पुरणपोळी पर्यंत, अश्या 'रुचकर मेजवानीचा' दरवळ घरोघरी पसरलेला असतोच. आपण या आधी हे सिद्ध केलं आहे, 'की वेगवेगळ्या पदार्थांची अदलाबदली , भांड्यांची अदलाबदली करून रेसिपीज तयार करण्यात आपण किती एक्सपर्ट आहोत.
या वेळेस देखील आम्ही घेऊन आलो आहोत गणेश उत्सव पाककृती स्पर्धा-' रुचकर मेजवानी'. तर चला, करुया काही सोप्या आणि फनटास्टीक रेसिपीज.
आपली पाककृती स्पर्धा 'रुचकर मेजवानी ' या मध्ये, या वर्षी आपण, साधीसोपी पण, थोडीशी वेगळी थीम ठेवली आहे. पुढील तीन पैकी आपल्या सोयीनुसार, कोणत्याही प्रकारची निवड करून, आपण रेसिपी करायची आहे.

पाककृती क्रमांक १ : रॉक & रोल: वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स.
थोडीशी रॉकिंग थोडीशी शॉकिंग, रोल्सची रेसिपी बनवून इथे पोस्ट करायची आहे.
नियम- पालेभाज्या हा मुख्य घटक वापरून तयार केलेल्या 'गोड आणि तिखट' रेसिपी.

स्पर्धेचे नियम :
१) एक आयडी एका विषयाची कितीही प्रवेशिका देऊ शकेल.
२) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
३) 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
४) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
५) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"रुचकर मेजवानी - {रॉक & रोल} - {तुम्ही केलेल्या पदार्थाचे नाव} - {तुमचा आयडी}"
६) प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
७) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
८) पाककृती शाकाहारी असावी आणि अल्कोहोलचा वापर नसावा. मुळ घटक अनिवार्य आहे. बाकीचे घटक तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता.
९) पाककृती स्व:त तयार केलेली असावी. आणि पूर्वप्रकाशित नसावी.
१०)'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही प्रेमळ विनंती.
११) प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील. (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ)
१२). या स्पर्धेचे परीक्षण संयोजक मंडळ करणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

पाककृती क्रमांक २ साठी इथे क्लिक करा.
https://www.maayboli.com/node/71304

पाककृती क्रमांक ३ साठी इथे क्लिक करा.
https://www.maayboli.com/node/71306

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
! गणपती बाप्पा मोरया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक अतिशय क्रिएटिव्ह विषय दिलेत. आणि सोपे पण आहेत. नक्की भाग घेणार.
जाहीरातबाजी अजुन थोडी कराल का? स्पर्धा आहेत हे दिसलच नाही कारण गणपती ग्रुप मध्ये नव्हते. हे धागे सार्वजनिक करता येतील का जेणेकरून नविन विदाऊट आयडी लोकांना कळतील .भाग घेतांना ग्रुप चे सदस्यत्व घ्यावे लागेल. यामुळ नविन सदस्य पण मिळतील मायबोलीला.
जे लोक ह्या ग्रुपचे सदस्य नाहीत तेही भाग घेतील.
बरेचदा इतके घाईत असतो कि ठरावीक धागे बघितले जातात.

जाहीरातबाजी अजुन थोडी कराल का?
हे धागे सार्वजनिक करता येतील का जेणेकरून नविन विदाऊट आयडी लोकांना कळतील . - सीमा
- नक्कीच जाहिरात केली जाईल.
- आणि धागे सार्वजनिक करता येतील, की नाही, हे admin शी चर्चा केल्यानंतर, तुम्हाला प्रतीसाद देऊन ईथे कळवण्यात येईल.
- आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.