फुले
निसर्गातले भाग्यक्षण...
निसर्गातले भाग्यक्षण .....
पहाटेसच जाग आली. मुख्य फाटकाचे कुलुप उघडण्यासाठी दिवा लावला आणि अंगणात पाऊल टाकताच लक्षात आलं कि दिव्याची आज अजिबात गरज नाहीये - किंबहुना दिवा नसण्यातच आज खूप मजा आहे. दिवा बंद करुन अंगणात येऊन पाहिलं तर आकाश अगदी निरभ्र. चांदोबा बिचारे चेहरा मुडपून आकाशात स्थिरावलेले - बहुतेक वद्य अष्टमी-नवमी असणार आज. चांदोबासारखा नटसम्राटच मवाळल्याने बाकीचे तारे -तारका आज भाव खात होते - मृगशीर्ष, व्याध नेमके डोक्यावर चमकताना दिसत होते. कृत्तिकेचा तारकापुंजही नीट ओळखू येत होता, वृषभ राशीचा तो मोठासा तारा पण उठून दिसत होता.
मन करा रे प्रसन्न
गुडमॉर्निंग फुले.
सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. सर्व माबोकरांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.
1) शेडींगचा गुलाब
'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट
'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
कचर्यातून फुलवा बगीचा व करा नंदनवन - अर्थात जैविक बगीचा (बायो कल्चर)
वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा
सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच..
निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते..
कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले...
आणखी काय लागते..!
गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता..
यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली..
टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला..
अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते !
ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली..
पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..
बाग माझी फुललेली
आज सकाळ झाली तीच सुगंधीत होऊन
मोठी फुले इथे पहा https://www.facebook.com/media/set/?set=a.581404981884328.1073741830.100...