उद्या वॅलेंटाईन डे आहे. मला सुट्टी आहे. काय करू? तुमचा प्लान काय आहे?
काल ऑफिसमध्ये अचानक समजले की आमच्या ग्लोबर सर्वर वगैरेचा काही प्रॉब्लेम झाल्याने नेटवर्क शटडाऊन होत येत्या शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे. आज ती सुट्टी कन्फर्मही झाली. आणि योगायोगाने उद्या संत वॅलेंटाईन डे असल्याने ऑफिसमध्ये एकाच वेळी आनंदाची लहर पसरली तर चिंतेचे वादळ उठले. अविवाहीत मंडळी खुश झाली. पण आम्ही लटकलो. नेहमीसारखा ऊद्याचा दिवस उजाडला असता. डबा घेऊन कामावर गेलो असतो. चंद्र मावळेपर्यंत तिथेच राहिलो असतो. संत वॅलेंटाईन यांचे श्राद्ध उरकूनच घरी परतलो असतो.