Submitted by तुमचा अभिषेक on 9 August, 2013 - 12:04
सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच..
निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते..
कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले...
आणखी काय लागते..!
गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता..
यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली..
टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला..
अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते !
ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली..
पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..
डोळ्यात काहीतरी तरळले आणि तिच्याही नकळत दोन अश्रू कोसळले..
तिची अन तिच्या पोरांच्या, आजच्या जेवणाची सोय झाली होती !
- तुमचा अभिषेक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या शतशब्दकथेला मिळालेला
पहिल्या शतशब्दकथेला मिळालेला प्रतिसाद दुसरी लिहिण्याचा हुरुप देण्यास पुरेसा होता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता हिच्यावर मिळणारे प्रामाणिक प्रतिसाद सल्ले अन सूचना तिसरीच्या वेळी नक्कीच कामाला येतील..
छान लिहीलयं... शेवट अनपेक्षित
छान लिहीलयं... शेवट अनपेक्षित![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आवडली...... तिचा आणि गुलाबाचा
आवडली...... तिचा आणि गुलाबाचा संबंध थोडासा अजुन ठळक करता आला असता का?
आवडली
आवडली
नितांतसुंदर लिहिलियस ही कथा
नितांतसुंदर लिहिलियस ही कथा अभिषेक!
ही पण जमली....
ही पण जमली....
ही सुध्दा आवडली.
ही सुध्दा आवडली. धक्कातंत्र असते का शतशब्दकथेत शेवटी?
थोडे तपशील वगळता ही कथा जमली
थोडे तपशील वगळता ही कथा जमली आहे.
'त्या'चं नाव न लिहून चाललं असतं. आणखी परीणामकारक वाटलं असतं असं मला वाटतं.
शतशब्दकथेचा शेवट धक्कायुक्त, अनपेक्षितच असा असायला हवा असं काही नाही.
आवडली. शेवट एकदम अनपेक्षित
आवडली. शेवट एकदम अनपेक्षित
आवडेश
आवडेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटी कथेने जबरीच टर्न
शेवटी कथेने जबरीच टर्न घेतला..
छान जमलीये .
शुभेच्छा!!
सर्व लोक्स __ धन्यवाद रिया
सर्व लोक्स __ धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिया __ तुला जे म्हणायचे ते थोडेसे समजल्यासारखे वाटतेय, मात्र तरीही नक्की कसला संबंध तुला अभिप्रेत आहे, तिच्या पुर्वायुष्याचा काही का?
मंजूडी __ आणि मी नेमका उलटा विचार केला, म्हणजे आधी मी "त्या" चे नाव लिहिलेच नव्हते.. पण मग नंतर त्याला नाव आणि ते देखील खास `राहुल' द्यावेसे वाटले..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि हो, धक्कातंत्र असलेच पाहिजे असे काही नाही, कथेला १०० शब्दांचे बंधन आहे, प्रयोगाला किंवा कल्पनांना नाही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाही, मला समजलीये कथा
नाही, मला समजलीये कथा बरोबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण ती त्या गुलाबाचं काय करणार हा प्रश्न मला माझ्या मित्राने विचारला ( हा प्रश्नच यायला नको होता अस मला वाटतय )
यात तुझी चुक काहीच नाही पण साहित्यिक जाण शुन्य असणार्यालाही साहित्य कळलं पाहिजे असं मला वाटतं
काय लिहिलय.... व्वा ... एकदम
काय लिहिलय.... व्वा ... एकदम आवडलं. असं काही सुचत नाही यार आम्हाला...
त्यामुळे जलनयुक्त अभिनंदन ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर ...
सुंदर ...
विदे, किशोर मुंढे __ धन्यवाद
विदे, किशोर मुंढे __ धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिया __ काय बोलू यावर आता.. गुलाबाची भाजी किंवा गुलकंद तर नाही ना करणार ती.. विकणारच ना.. उगाच साहित्यिक जाण सारखे मोठाले शब्द आणू नकोस यात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे मी म्हणलं ना मला कळालं
अरे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी म्हणलं ना मला कळालं
मीत्याला समजुनही सांगितलं
पण तुझी याआधीची कथा समजुन सांगावी लागली नाही
तसं काहीसं होईला हवं होतं का अस मी तुलाविचारतेय
मी काहीही सल्ले देत नाहीये
जे मला येतच नाही त्यात मी सल्ले काय देणार?
एका नॉन वाचकाचा (ज्याला वाचनाची आवड नाही, मी वाचुन दाखवलं तेच ऐकलं जातं) अभिप्राय सांगितला
अत्यंत सुंदर कथा. १००
अत्यंत सुंदर कथा. १०० शब्दांत असे लाखो करोडो भाव अचूक बसवायचे म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे.
मस्तच जमली आहे कथा
मस्तच जमली आहे कथा ....भन्नात्ट ........एक्दम डोल्यासमोर उभे राहीले चित्र......
मस्तच. शेवट खरच
मस्तच. शेवट खरच अनपेक्षीत.
मला उगाचच वाटले होते की शेवटी तो बदला घेतो असे काही असेल म्हणून.
मस्तच , आवडली कथा . मला उगाचच
मस्तच , आवडली कथा .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला उगाचच वाटले होते की शेवटी तो बदला घेतो असे काही असेल म्हणून. > क्राईम पट्रोल पाहण्याचा परीणाम.
हो सामी खरच
हो सामी खरच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिया __ भापो इतर सर्व __
रिया __ भापो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इतर सर्व __ धन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही सुद्धा आवडली आता तिसरीच्या
ही सुद्धा आवडली आता तिसरीच्या प्रतीक्षेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख.. आवडलीच!! १०० शब्दांत
सुरेख.. आवडलीच!!
१०० शब्दांत मांडणं ...खरोखर कौतुकास्पद!
तिसर्या कथेच्या प्रतिक्षेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटचा ट्विस्ट भन्नाटच राव,
शेवटचा ट्विस्ट भन्नाटच राव, अगदी तोलूनमापून १०० शब्द टाकलेत..
नितांत सुंदर. कोणाचं काय तर
नितांत सुंदर. कोणाचं काय तर कोणाचं काय.
धन्यवाद सामो.. रिक्षा
धन्यवाद सामो.. रिक्षा फिरवल्याचा फायदा तरी झाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी शंभर नंबरी शशक..
अगदी शंभर नंबरी शशक..
सुंदर!!
सुंदर!!
Pages