किती भोळी रखुमाई...
सावळ्या गं विठ्ठलाच्या
हाती हात कसा दिला
रूक्मिणी तू नाजुकशी
वर रांगडा वरला ?
धावे जनाईच्या मागे
शेण्या उचलीत गेला
कबिराला बोले थांब
शेला विणाया बैसला
सुखे विष पिऊनिया
मीरेपाठी उभा ठेला
किर्तनात करी साथ
नाम्याहाती खाई काला
नाही याला काळवेळ
भक्तकाजि रमलेला
मुलखाची भोळी बाई
वर असा निवडला ?
माय भक्तांलागी तूंचि
खोटेनाटे तुज सांगे
नाही युगत कळली
भाळलीस याच्यामागे
हरी किर्ती गुढी
हरीनाम सार । हरी संकीर्तन । हरी गुणगान । संत गाती ।।
हरी महिमान । संतांसी प्रमाण । हरी हे निधान । संतजना ।।
गुढी उभारोनी । हरी महात्म्याची । मिरविती साची । हरीभक्ती ।।
हरिविणे जिणे । व्यर्थ वाटे संती । नित्य रमताती । हरीनामी ।।
प्रेमे जाऊ आम्ही । संतांसी शरण । तेणे हरी जाण । संतुष्टेल ।।
प्रेम भक्तीभाव । सुख समाधान । लाभे कृपादान । अनायासे ।।
हरी किर्ती गुढी । उभारू आनंदे । तेणे विश्व कोंदे । निजानंदी ।।
तू चि गा विठ्ठल....
गाथेमाजि स्वये । ठायी ठायी देखा । नित्य पाठीराखा । दीनबंधू ।।
शब्दाशब्दांतून । जागवी साधका । हात देसी निका (चांगला, सुयोग्य ) । भाविकांसी ।।
सगुण निर्गुण । आम्हा विलक्षण । दाविसी तू खूण । नेमकीचि ।।
वैराग्याचे फळ । भक्ति भाव प्रेम । दान अनुपम । काय वर्णू ।।
वैकुंठीचा राणा । अवतरे शब्दी । सकळही सिद्धी । पावलीसे । (प्राप्त झाली) ।।
नसे थोर काही । आम्हालागी अन्य । मायबाप धन्य । तूंचि आम्हा ।।
तूंचि गा विठ्ठल । प्रेमचि केवळ । सोयरा सकळ । जिवलग ।।
एक मन ( माप ) सोडून , द्धिधा मनाने ( दोन मापे ) आणलात .
हे तुमचे मन की , बसवण्णांचे संशयी मन ?
ही गोष्ट मारय्यप्रिय अमलेश्वरलिंगास पसंत न पडणारे नैवेद्य .
तेथेच ओतून या , मारय्या .
कायक थांबले आहे , जा हो माझ्या मालका .
भाव शुद्ध होऊन महाशरणांच्या अंगणात चुकून पडलेला तांदूळ आणून , निश्र्चितपणे करावे मारय्यप्रिय अमलेश्वरलिंगास लवकर जा हो , मारय्या .
सहज समाधी
आकाशींचे अभ्र । जातसे विरुनी । सहजे गगनी । आपेआप ।।
तैसेचि मानस । व्हावे की विलिन । तुजठायी पूर्ण । परमेशा ।।
वेगळेपणाने । भोगी जीवदशा । नको जगदीशा । संकोच हा ।।
तुजसवे होता । तत्वता तद्रूप । सहजे चिद्रूप । होईन की ।।
ऐसा एकपणे । भोगिता स्वानंद । निमेल ते द्वंद्व । मी तूं ऐसे ।।
सहज समाधी । लाभता निश्चळ । आनंद कल्लोळ । अंतर्बाह्य ।।
हीच एक आस । जागवी सतत । अन्य ते चित्तात । नको देवा ।।
जीवनात येणार्या बर्याचशा छोट्या-मोठ्या किचकट समस्या सोडवण्यासाठी तर्क (logic) या विचारपध्दतीचा उपयोग होतो.पण प्रत्येक व्यक्ती याचा उत्तम प्रकारे उपयोग करुन घेण्याइतपत हुशार असेलच नाही.पण उत्तमपैकी तार्किक विचार करता येणं ही काही जन्मजात देणगी नव्हे.बर्यापैकी अचूक तर्क कसा करायचा हे व्यवस्थित समजल्यास,थोडा अभ्यास केल्यास,सराव केल्यास यात बर्यापैकी प्रगती होऊ शकेल.अनेक समस्या सहज सुटू शकतील.समस्यांनी चिंताग्रस्त होऊन हतबल होण्याऐवजी आणि भावनेच्या भरात काहीवेळा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान होण्याऐवजी तर्काने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलंच!
.
.
मनोवृत्ती उधळल्या अणुपासून
चौखुर विस्तारल्या ब्रह्मांडापर्यन्त
एकोस्मि बहुस्याम अमीबा म्हणे
पिपीलिका सामर्थ्य अचंबित सर्वथा
अनेकांतून एकत्व साधतो अचूक
स्वार्म इंटिलिजन्स शास्त्र म्हणे
कूटप्रश्नांचे तार्किक तत्पर विचार
निरीक्षण परीक्षण अवघा निसर्ग
श्रेष्ठ चौऱ्यांशीमध्ये मानव म्हणे
उत्पत्तीचे मूळ नुमगता ज्ञान
आत्मप्रौढि आकाशी भारंभार
वायसाचा हंस झाला म्हणे
― अंबज्ञ
.
.
वाहून चालले संचिताचे किनारे
शिड़े सुटलेली अन् भरले वारे
मन हलके अलगद झाले
दुःख सांडता मोकळे सारे
ओझे प्रारब्धाचे वाहण्यासाठी
प्रत्येकाचे गलबत येथे निराळे
वारा वादळ अन् लाटा उसळणे
खेळ खेळती ब्रह्म सावळे
काळ वेग आणि दिशा यंत्रे
मग कप्तानाचे महत्व कसले
नशीबाचे पड़ता उलटे फासे
वादळच स्वतः भोवऱ्यात फसलेले
देव आणि धर्म नावाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे.यावर बर्याच थेअरीज आहेत.पैकी उत्क्रांतीवादानुसार देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.पण ही पण एक थेअरी आहे,याला सर्वानुमते आधार नाही.
.
.