देव,धर्मादी संकल्पना- एंटरटेनमेंट विथ लाईफटाईम वॅलिडीटी

Submitted by अक्कलशून्य on 12 December, 2017 - 04:09

देव आणि धर्म नावाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे.यावर बर्याच थेअरीज आहेत.पैकी उत्क्रांतीवादानुसार देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.पण ही पण एक थेअरी आहे,याला सर्वानुमते आधार नाही.
मग मनुष्याने मानसिक स्वास्थ देऊ शकणार्या पण बौद्धिक दिवाळखोरीकडे नेणार्या देवधर्मादी संकल्पना का विकसित केल्या असाव्यात?.एका क्षमतेच्या बदल्यात दुसरी क्षमता सोडून देणे हे होतच असते (trade off).पण देवधर्मादी गोष्टींनी असे काय दिले असावे जे फार गरजेचे होते?मला असे वाटते की देवधर्मादी संकल्पनांनी मनुष्याला भरपुर मनोरंजन दिले असावे.मी या निष्कर्षावर बर्याच वर्षांपुर्वी आलो होतो.२००२ साली स्पायडरमॅन हा सुपरहीरोपट बघायला गेलो असताना माझ्या मनात या देवधर्मादी गोष्टींच्या मनोरंजन मुल्याचा विषय आला.म्हणजे बघा,सुपरहीरो किंवा फिक्शन वर आधारीत नॉवेल वाचताना किंवा चित्रपट बघताना आपण लॉजिक रिजनिंग वगैरे सगळ्याचीच बोळवण करुन ते एंजॉय करतो.याचे कारण यागोष्टींना असलेले मनोरंजन मुल्य! देवधर्मादी गोष्टींचा विचार केल्यास आपल्याला चक्क त्यात सुपरहीरोज सापडतात आणि फिक्शन तर या गोष्टींचा बेसच आहे.आजपर्यंत लिहलेल्या कोणत्याही व्यावसायिक फिक्शनपेक्षा कैकपट अधिक मनोरंजन मुल्य या देवधर्मादी संकल्पनांचं आहे.आणि या संकल्पना लहानपणी मेंदूत पद्धतशीरपणे सोडल्या जातात ,मग सुरु होतो स्वमनोरंजनाचा लाईफटाईम गेम.यातून सुटका नसते.
काही दिवसांपुर्वी मदरश्यांवर एक डॉक्युमेंट्री बघत असताना या स्वमनोरंजनाचा चमत्कार पहायला मिळाला.कुराणातले आयते का काय ते म्हणत असताना त्या लहानग्या मुस्लिम मुलांना प्रचंड उन्माद चढलेला दिसत होता.आवाज टिपेला पोचुन जो तो त्या स्वमनोरंजनाचा आनंद घेत होता.नंतर मदरश्यातला शिक्षक काही धार्मिक गोष्टी सांगत असताना मुलांचे उन्मादी चित्कार मला सुपरहीरो मुव्ही बघताना थिएटरात होणार्या चित्कारापेक्षा फार वेगळे वाटले नाहीत.असाच अनुभव लहानपणी गणेशोत्सवात बर्याचदा घेतला आहे.गणपतीसमोर वेगवेगळ्या आरत्या म्हणताना अगदी डॉक्टर इंजिनिअर प्राध्यापक यांना आलेला युफोरीया बघितला आहे.गौरी गणपती,मंगळागौर अथर्वशिर्षपठण ,धर्मग्रंथपठण काय अन काय करताना स्त्री पुरुषादिंना होत असलेला आनंद,उन्माद युफोरीया हे अभ्यासाचेच विषय आहेत. धार्मिक ग्रंथ वाचताना काहिंना ऑर्गॅझमही येत असल्याचे काही ठिकाणी वाचले होते.कुठेतरी जामोप्यांनी युफोरीया इंडेक्स विषयी लिहले आहे तसा युफोरीया इंडेक्स या देवधर्मादी संकल्पनांच्या बाबतीत नक्कीच काढला पाहीजे.
तर जगातला सगळ्यात मोठा फिक्शनल सुपरहीरो म्हणजे देव ,मग तो अल्लाह असो वा ब्रह्मा विष्णु महेश.यांच्या एकसे एक स्टोर्या ऐकत आयुष्यभराचे मनोरंजन करुन घेणे म्हणजे धर्म पाळणे ही व्याख्या माझ्या पुरती मला मान्य झाली आहे.आपले काय मत आहे या लाइफटाइम एंटरटेनमेंट विथ लाइफटाईम व्हॅलीडीटी विषयी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला. मनुष्याने संयत वर्तन ठेवावे ह्यासाठी कदाचित भय म्हणून निर्माण केलेल्या संकल्पना पुढे मनुष्यापेक्षाही व पराकोटीच्या महत्वाच्या ठरणे आणि त्यातून माणसाचे जीवन दुर्दैवीरीत्या प्रभावित होणे हा एक सांस्कृतीक महाघोटाळा आहे. सर्वच धर्म व देव किंवा धर्मप्रमुख हे आजमितीला हास्यास्पद आणि मनोरंजन मूल्य उत्तम असलेले ठरले आहेत. लेखात एकदोनच धर्मांची नांवे नोंदवलेली दिसत आहेत. प्रत्यक्षात हा लेख जगातील प्रत्येक धर्माला तितकाच लागू होईल असा आहे.

प्रत्यक्षात हा लेख जगातील प्रत्येक धर्माला तितकाच लागू होईल असा आहे.
नवीन Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2017 -
>>
हो ,पण आपल्या देशात हिंदू मुस्लिम एवढेच मुख्य आहेत म्हणून त्यांचे दाखले.

देव व धर्माचा अतिरेक होतोय अथवा कोणताही अतिरेक वाईटच परंतू त्याचा संदर्भ मनोरंजनाशी लावून त्याला बालिशपणाची किनार दाखवणे व देवधर्म मानणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी वगैरे टिंगलटवाळी हे तर सध्याच्या नास्तिकपणाच्या फॅशनचे उत्तम उदाहरण आहे.
वैयक्तीकरित्या तरी मी स्वतः निसर्गातला देव मानणारा आस्तिक असल्याने मला तरी हा लेख झेपला नाही.

हे काय अस्तं ओ?
संत्र सोला.>>> Rofl हेच कळत नसेल तर कशाला फुकाचा आव आणताय शहाणपणाचा... तसंही तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे... नावाला जागताय की अगदी..!!!
इथे एखाद्याने स्वतःचे मत मांडल्यावर 'संत्र सोला' वगैरे बाश्कळ विधाने म्हणजे मीच कसा शहाणा आहे याचेच उदाहरण आहे. बाकी वैयक्तीक टीकेत वेळ घालवण्याइतका फुकटचा वेळ नसल्याने तुम लगे रहो..!! Happy

या निमित्ताने नेहमीच्या काथ्याकुटाचा चित्रपट डोळ्यासमोरून एका क्षणात तरळून गेला... आणि एक प्रश्न उभा राहिला....

देव मानणारे लोक सामान्यपणे मानण्याची अनेक कारणे देतात, त्यातले एक महत्त्वाचे कारण की त्यामुळे आशा, विश्वास राहतो, आपल्यासोबत आपल्यापाठी कोणीतरी आहे यामुळे धीर येतो... परत सर्व जगात एकच देव आहे असेही म्हणतात.

मग जर असेच आहे तर लोक आपण मानत असलेल्या देवालाच का धरून बसतात?

नानाकळा, तुम्ही ज्या टाइपच्या लोकांविषयी लिहिलेय ते लोक एकाच देवाला धरून ठेवत नाहीत. ते महालक्ष्मीला जातात आणि जवळ आहे म्हणून हाजीअलीकडेही डोके टेकवून येतात. त्यांना कुठलाही देव चालतो. त्यांना कुठेतरी जाऊन डोके टेकवायचे असते, बस.

एकच देव पकडून ठेवणारे वेगळे. देव विषयावर त्यांचे मत काहीही असो, समोरच्याने त्या मताचा आदर केलाच पाहिजे यावर ते ठाम असतात.

@अजब,माझी अक्कल शून्य असूनही मला देवधर्मादी गोष्टीतला फोलपणा समजू शकतो,तुम्हालाही कळेल,प्रयत्न करा.
बरं ते "निसर्गातला देव " हा काय प्रकार असतो नक्की.?तुम्ही याची काही सायंटीफिकली व्हॅलीड व्याख्या सांगितलीत तर मी माझे मत बदलायला तयार आहे.

त्यांना कुठलाही देव चालतो. त्यांना कुठेतरी जाऊन डोके टेकवायचे असते, बस.
>> असे लोक माझ्यासाठी आदरणीय आहेत. वादच नाही.

देव विषयावर त्यांचे मत काहीही असो, समोरच्याने त्या मताचा आदर केलाच पाहिजे यावर ते ठाम असतात.
>> मताचा आदर करणे म्हणजे त्याविरोधात कुणी मत व्यक्तच नये असे काही असते का? अतिशुद्ध श्रद्धेच्या ज्योतीवर जी कालानुरुपाने भाकड नियम, कर्मकांडांची काजळी, अनावश्यक अंधविश्वास चढत जाऊन त्या मूळ श्रद्धेचा उजेड मंद होत असेल तर ती काजळी हटवायला विरोधी मताची काडी वापरली जात असेल तर ती काजळी हटवायला नसून ज्योत विझवायलाच आहे असे समजणे आस्तिक लोक सोडतील तो सुदिन...

त्यातले एक महत्त्वाचे कारण की त्यामुळे आशा, विश्वास राहतो, आपल्यासोबत आपल्यापाठी कोणीतरी आहे यामुळे धीर येतो... परत सर्व जगात एकच देव आहे असेही म्हणतात.>> सही पकडे है! अगदी हाच व्ह्यू आहे माझाही. मी जेव्हा देव असे म्हणतो तेव्हा ती निसर्गातील एक शक्ती असते, जी सर्व चांगल्या वाईट गोष्टींची निर्माती आहे. मी नदीला, सूर्याला, अन्नाला नमस्कार करतो (आता ते क्रुतज्ञतेने असेल अथवा सो कॉल्ड ब्रेनवॉश असेल), त्यात हिंदू, मुस्लीम अथवा कोणताही विचार असणे अथवा नसणे काही फरक पडत नाही. आता अशा प्रकारचे काही नसणे असे म्हटले तरी काही बिघडत नाही. परंतू सध्या तरी न मानणार्या लोकांची मानणार्यांना तुच्छ लेखायचीच मानसिकता दिसते.

रुढार्थाने तुम्ही देव मानणार्‍यातले नाही. तुम्ही कृतज्ञभाव असलेले. प्रत्येक मनुष्यातही देव पाहत असाल तर आणखीच ग्रेट. त्यापेक्षाही प्रत्येक मनुष्याला, प्राण्याला, सृष्टीच्या कणाकणाला स्वतःचेच एक्स्टेन्डेड रुप मानत असाल तर सबसे बेस्ट. दॅट्स द अल्टिमेट कॉन्शसनेस. द ट्रु फीलींग ऑफ गॉड.

परंतू सध्या तरी न मानणार्या लोकांची मानणार्यांना तुच्छ लेखायचीच मानसिकता दिसते.
>> असे काही नाही. मानणार्‍यांना न मानणारे तुच्छ लेखतातच असे सरसकटीकरण ही परत एक अंधश्रद्धा आहे. जसे धर्मात कट्टर आणि लिबरल बघतो तसेच नास्तिकातही असनारच. कट्टर आणि लिबरल हा मनुष्यस्वभाव आहे. आस्तिक-नास्तिक-धार्मिक-निधर्मी असल्याने तो तसा होत नसतो.

बरं ते "निसर्गातला देव " हा काय प्रकार असतो नक्की.?तुम्ही याची काही सायंटीफिकली व्हॅलीड व्याख्या सांगितलीत तर मी माझे मत बदलायला तयार आहे.>> माफ करा पण सायंटिफिकली व्हॅलीड व्याख्या खरंच मला माहीत नाही. मी माझ्या देव या संकल्पनेतल्या भावना सांगीतल्या. त्या कुणाला पटाव्यात व त्याप्रमाणे त्यांनी वागावे अशी तर अजिबातच अपेक्षा नाही. तुमच्या मतांचाही नितांत आदरच आहे. प्रत्येकाला आपल्याला योग्य वाटणार्या गोष्टी फॉलो करायचे स्वातंत्र्य आहेच व असावेच. चुभूदेघे.. Happy

जसे धर्मात कट्टर आणि लिबरल बघतो तसेच नास्तिकातही असनारच. कट्टर आणि लिबरल हा मनुष्यस्वभाव आहे. आस्तिक-नास्तिक-धार्मिक-निधर्मी असल्याने तो तसा होत नसतो.>> धन्यवाद नाना, कदाचित मला भेटलेले बरेचसे नास्तिक लोक फक्त एकांगी टीका व टिंगलटवाळी करणारेच भेटल्याने असेल कदाचित, पण तुमच्या वरील प्रतिसादाचा उपयोग माझा द्रुष्टीकोन बदलायला नक्कीच होईल.

बरेचसे नास्तिक लोक फक्त एकांगी टीका व टिंगलटवाळी करणारे

>> हे असे लोक विचारांमुळे एकलकोंडे असल्याने थोडे चिडचिडे झालेले असतात हो. त्यांनाही समजून घ्या. अशी टिंगलटवाळी करण्यात धार्मिक-आस्तिकही मागे नाहीत. शाकाहारींमध्ये कट्टर शाकाहारी (हे बाय डिफॉल्ट धार्मिक आणि आस्तिक असतातच) हे मांसाहारींची भयंकर निंदानालस्ती व टिंगलटवाळी करतात. तेव्हा अंतिम हेच की मनुष्यस्वभाव आहे, व्यक्त करायला वेगवेगळी साधने वापरतात. आपण थोडे ओपन एन्डेड राहावे, मनस्ताप होत नाही. (अर्थात तुमचा होतो असं म्हणत नाहीये, माझा अनुभव शेअर करतोय, मी दोन्हीकडून ढोलकी वाजवू शकतो म्हणून सुखी आहे Wink )

नाना,
ह्या धाग्यावरचे तुमचे सर्वच प्रतिसाद आवडले.

नाना,
ह्या धाग्यावरचे तुमचे सर्वच प्रतिसाद आवडले.>> +१

नानाकळा, तुम्ही ज्या टाइपच्या लोकांविषयी लिहिलेय ते लोक एकाच देवाला धरून ठेवत नाहीत. ते महालक्ष्मीला जातात आणि जवळ आहे म्हणून हाजीअलीकडेही डोके टेकवून येतात. त्यांना कुठलाही देव चालतो. त्यांना कुठेतरी जाऊन डोके टेकवायचे असते, बस.

>> सीएस च्या रिझल्ट च्या आधी आमचा ग्रुप दादरला सिद्धीविनायकला जाताना डाव्या हाताला जे मोठे चर्च आहे तिथे जाऊन मग पुढे सिद्धीविनायकला जाऊन तिथून महालक्ष्मी आणि मग हाजीअलीला जायचा ते आठवले. हे आम्ही प्रत्येक रिझल्टच्या आधी करायचो. नक्की कोणत्या देवाच्या कृपेने पास झालो हे त्या देवांनाच माहीत Lol

सर्वप्रथम तुम्ही देव हे काल्पनिक आहे कि ईश्वर हे काल्पनिक आहे हे स्पष्ट करा. दोन्हींमध्ये फरक आहे.
दुसरं म्हणजे, तुम्ही 'लॉजिक' हा शब्द वापरला आहे, ज्यावरून तुम्हाला असे सुचवायचे आहे कि फक्त तुम्हीच सर्व गोष्टींच्या कारणाचा विचार करू शकता, पण ज्याप्रमाणे तुम्ही या विषयाचा संबंध मनोरंजनासारख्या illogical गोष्टीशी लावत आहेत त्याच्यावरून तुम्ही स्वतः किती तर्कशुद्ध विचार करता याचा अंदाज येतो. ईश्वराचा संबंध हा मनोरंजनासारख्या तुच्छ गोष्टीशी नसून तो फार मोठ्या ब्रह्मांडपातळीवरील गोष्टीशी आहे जी समजण्यास अजून माझी, तुमची बुद्धी सक्षम नाही. जर एवढं सोपं उत्तर या सर्व प्रश्नांचं असत तर आजपर्यंत पृथ्वीवर खूप मोठी क्रांती झाली असती, एवढं लॉजिक तुमच्या सारख्या महान 'अक्कलशून्य'ला लावता नाही आलं याचं आश्चर्य वाटतं. जर तुम्हाला खरंच या गोष्टींबाबत आदराने जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आतापर्यंतचे सर्व पुराण, वेद, उपनिषदे, दासबोध, सर्व प्रकारच्या गीता (भग्वद्गीतेसहित) वाचून काढा तरच तुम्हाला याचे उत्तर मिळेल.
पण मला असे नाही वाटत कि तुम्ही कुठली धार्मिक ग्रंथ वाचली अथवा नुसती चाळली देखील असावी. फक्त मायबोलीवर attention मिळावं म्हणून तुम्ही हि फडतूस पोस्ट तयार केली आहे ज्यावरून तुम्ही फक्त spider-man पाहून आला होतात हे कळते. उद्या कृपा करून theory of relativity चा पण संबंध मनोरंजनाशी लावून आणू नका म्हणजे झालं.
भगवद्गीतेत स्वतः भगवान स्वतःची व्याख्या सांगतात आणि त्याच बरोबर हेही सांगतात कि मला कुणीही तर्काने जाणून घेऊ शकत नाही आणि मला समजून घेण्याच्या भावना किंवा जाणीवा (Senses) या मनुष्याच्या भौतिक शरीरात नाही पण मनाने तो दृढनिश्चय करून त्या अवगत करू शकतो.
मग मला हे सांगा, ज्या गोष्टी आपण अजूनही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही पण अजून वैज्ञानिकही त्या सरळ सरळ नाकारण्याचं धाडस करत नाही, अजून आपल्याला या पृथ्वीवरचीच सगळी रहस्ये उलगडली नाही, त्या अज्ञात ब्रह्मांडाची तर गोष्टच सोडा, त्या गोष्टी तुम्ही नाकारण्याइतपत तुम्ही ब्रह्मांड दर्शन केले आहे काय? तसेच तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आधुनिक विज्ञान आणि उत्क्रांतीचे धडे हे आपल्याला सर्वप्रथम ईश्वरानेच पुराणांमध्ये दिलेले सापडतात, उदा., विष्णू पुराणामध्ये दशावतारावरून आपल्याला evolution theory कळते, वराह पुराणावरून आपल्याला आधीपासूनच पृथ्वी गोल होती हे समजते, भागवत पुराणांवरून आपल्याला theory of multiversity समजते. विज्ञान आणि अध्यात्म यात काहीही फरक नाही हे आपल्याला परमेश्वराच्याच शिकवणीमुळे समजते, अध्यात्माचे विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान!

धर्म नावाची कोणतीही कल्पना नव्हती हे मीही मानतो, कारण जर भविष्य पुराण वाचले तर स्वतः भगवान विष्णू हेच येशू ख्रिस्तांचा, मुहम्मदाचा अवतार घेऊन पृथ्वीवर आले होते हे कळते. याचा अर्थ 'आता हिंदू धर्म superior आहे' असं नाही, या गोष्टीवरून सिद्ध हे होते कि एकच ईश्वर ऊर्जा पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रांतात अवतार घेऊन आली होती आणि तिनेच जगातल्या इतर मनुष्यांना सत्कार्य करण्याचे शिकवले. तसेच यामुळे आपल्याला परिचित असलेला उपनिषदांमध्ये सांगितलेला 'वसुधैव कुटुम्बकम्' हा मंत्रही सिद्ध होतो कारण जर पृथ्वीवरील माणसे एकाच ऊर्जेपासून तयार आणि विकसित झाली असतील तर ती म्हणजे एक मोठं कुटुंबच आहे. त्यात धर्मांच्या, जातीच्या, अगदी देशांच्याही भिंतींना काही अर्थ नाही.

तुम्हाला खरंच या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर अभ्यास करा कारण एक तर्कनिष्ठ माणूस तसेच करेल, बडबड तर लहान मुलांना सुद्धा करता येते. मला तुमच्या या माहिती नसताना बरळण्याची चीड आली कारण तुम्ही तर्काच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाता मारता आणि तुम्हीच त्याच्यावर काळिमा फासता आहात. दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेच आहे कि जो मनुष्य त्याला माहित नसलेल्या विषयावर अभ्यास न करता टीका टिप्पणी करतो तोही एक मूर्खच होय!
'अक्कलशून्य'पणा हा फक्त user id पुरताच मर्यादित राहू द्या.

>>काय महेशराव आजकाल दिखते नही आप.?
माबोवर येणे झाले नाही खरे बर्‍याच काळात,
गेले एक दोन दिवसांपासुन डोकावून पहात आहे.