एक मन ( माप ) सोडून , द्धिधा मनाने ( दोन मापे ) आणलात .
हे तुमचे मन की , बसवण्णांचे संशयी मन ?
ही गोष्ट मारय्यप्रिय अमलेश्वरलिंगास पसंत न पडणारे नैवेद्य .
तेथेच ओतून या , मारय्या .
कायक थांबले आहे , जा हो माझ्या मालका .
भाव शुद्ध होऊन महाशरणांच्या अंगणात चुकून पडलेला तांदूळ आणून , निश्र्चितपणे करावे मारय्यप्रिय अमलेश्वरलिंगास लवकर जा हो , मारय्या .
आयुध देऊ शकतील , परी शौर्य देऊ शकतील का हो , मारय्या ?
कामिनी देऊ शकतील , परी समागम करु शकतील का हो , मारय्या ?
चोरी करण्या आलेल्या चोरास गरीब म्हणून घ्या असे का हो , मारय्या ?
मनाची परीक्षा करुन भक्ती कसास लावावी म्हणणाऱ्याने , आमच्यामधील गुण न पाहिले , मारय्या .
फासावर चढायच्या वेळी पुन:मरणास भीत बसावे का ?
मारय्यप्रिय अमलेश्वरलिंगा , तूच जाणिशी .
वेद थरथरले, शास्त्रे बाजूला हटली !
तर्कही अतर्क्य होऊन मूक झाले !
आगमही हाटून दूर सरले !
कारण आमच्या कुडलसंगमदेवाने
मादार चेन्नय्याच्या घरी भोजन केले .
हर ज्यांचा आदिपुरुष, पुरातन ज्यांचा परिवार,
त्या घरात जन्मलेल्या मातंगाचा पुत्र मी आहे.
माझ्या पित्याने जातीचे सुतक नष्ट केले आहे.
मातंगाचा पुत्र मी आहे, सर्पभूषण कुडलसंगमदेवा,
चेन्नय्या माझ्या आजोबांच्या आजोबांचे वडील आहेत.
भक्तीचे दारिद्र मजपाशी देवा:
कक्कय्याच्या घरी केली भक्तीची याचना,
चेन्नय्यांचे घरी केली भक्तीची याचना,
दासय्याच्या घरी केली भक्तीची याचना,
एकत्र येऊन देवा सर्व पुरातन शरणांनी
वाढली भक्तीभिक्षा जर ,
कुडलसंगमदेवा, माझे भिक्षापात्र ते भरेल.
भक्तच समर्थ आहेत, त्यांना असमर्थ म्हणता येईल ?
कोठे चेन्न ? कोठे चोळ ?
चेन्नासोबत जेवला शिव ! अहा देवा !
चेन्ना , चोळाच्या घरी चाकर होता.
कुडलसंगमदेव भक्तीलोलुप आहे.
ज्ञानास झाले हो मारक विस्मरण,
विस्मरणास झाली हो मारक माया,
मायेस झाले मारक कर्म ,
कर्मास झाली मारक तनु,
तनुस मारक संसार,
याचे विस्मरण होण्याची जाणीव,
ज्ञानास दिले तोलून आणि
घेतले मी गुरुच्या हस्ते इष्टलिंग.
माझ्या ज्ञानास करुन इष्टलिंगाठायी
सुस्थीर निज प्राणलिंगी केले मज
तुमच्या शरण बसवण्णांनी
हे कलिदेवरदेवा.
षटस्थल ज्ञान हाची महायोग | भक्ताचा अनुराग सर्वकाळ ||
शिवावीन अन्य दुजा नाही देव | भक्तस्थळी भाव हेची शुद्ध ||
महेश्वरा ऐसा असे दुजे स्थळ | देखिली सकळ शिवरूपी ||
लिंगार्पित सर्व प्रसादची होती |
हेची दृढ चित्ती प्रसादिका ||
लिंग तोची प्राण प्राण तोची लिंग | असे तो अभंग प्राणलिंग ||
त्रिकाळ पूजन ज्ञानलिंगाठायी | शरणस्थळी पाही भक्त तैसा ||
सहावे स्थळ ऐक्यभावे श्रेष्ठ | शिवरूपी दृष्टलीरे शिवा ||
म्हणे मन्मथ बसवभक्तादिका ! सर्वश्रेष्ठ देखा षटस्थल!!
- संतशिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली
लिंग न म्हणे, लिंगैक्य न म्हणे,
संग न म्हणे, समरस न म्हणे,
'झाले' न म्हणे, 'नाही होणार' न म्हणे,
'तू' न म्हणे, 'मी' न म्हणे,
चेन्नमल्लिकार्जूना,
लिंगैक्य झाल्यानंतर काहीच न म्हणे.
शेट्टी म्हणतील शिरीयाळाला?
धोबी म्हणतील माचय्याला?
ढोर म्हणतील कक्कैयानां?
चांभार म्हणतील चनैय्याला ?
मी ब्राम्हण आहे म्हटले तर
कुडलसंगम देव हसेल
माझे आई बाप विप्र कुलातील म्हणता?
छे....छे....नाही तसे नाही
माझा बाप चांभार चन्नय्या
आजा माझा ढोर कक्कय्या
काका माझा चेन्नय्या
भाऊ माझा किन्नर बोमय्या
मला का समजून घेत नाही
कुडलसंगमदेवा
शूद्र, शूद्र म्हणून दूर रहा म्हणती, तो कसा शूद्र ?
स्वतःचे शुद्रत्व स्वतः न जाणता
समोरच्याचेच शुद्रत्व शोधणाऱ्या भ्रष्टांना काय म्हणावे ?
महादानी कुडलचेन्नसंगमदेवा.
उत्तम कुळात जन्मलो असे
नामुष्कीचे ओझे मजवर लादू नका हो.
कक्कय्या नाही वाढणार शेषप्रसाद,
दसरय्या नाही वाढणार ताक,
सामान्य चेन्नय्या मज नाही देणार मान.
श्रेष्ठ, महिमाशाली
कुडलसंगमदेवा, अरे देवा, अरे देवा.
वडील आमचे मादार चेन्नय्या,
आजोबा आमचे डोहर कक्कय्या,
चुलते आमचे चिक्कय्या पहा,
दादा आमचे किन्नरी बोमय्या.
मज का बरे तुम्ही जाणत नाही, कुडलसंगमदेवा.
( वचन, बसवसमिती, बसवण्णा, वचन क्र १४.)
आज-उद्या नका म्हणू ,आजचा दिवसच शिवशरण म्हणणाऱ्यास, आजचा दिवसच हरशरण म्हणणाऱ्यास, आजचा दिवस शुभ कुडलसंगास न चुकता समरणाऱ्यास.
वडिल आमचे मादार चेन्नय्या, आजोबा आमचे डोहर कक्कया, चुलते आमचे चिक्कय्या पहा, दादा आमचे किन्नरी बोमय्या, मज का बरे जाणत नाही तुम्ही कूडलसंगमदेवा.
उत्तम कुळात जन्मले असे
नामुष्कीचे ओझे मजवर लादू नका हो.
कक्कया नाही वाढणार शेषप्रसाद,
दसऱया मज नाही पाजणार ताक,
सन्मान्य चेन्नय्या मज नाही देणार मान,
श्रेष्ठ महिमाशाली कूडलसंगमदेवा, अरे देवा,अरे देवा.
डाव्या हाती तलवार, उजव्या हाती मांस, तोंडी असे सुरापात्र, तरीही गळ्यात लिंग असता,
त्यासी म्हणे मी लिंग, त्यासी म्हणे मी संग,
कूडलसंगमदेवा, त्यासी म्हणे मी जंगम.
डाव्या पायाने लाथाडल्यास उजवा पाय धरेन, उजव्या पायाने लाथाडल्यास डावा पाय धरेन, रक्षण करा, रक्षण करा, तू माझी हो चूक माझी होई, क्षमस्व तात, कूडलसंगमदेव, हा तुमचे बिचारे पोर मी.
बैलासम चाकर होऊन, सेवक होऊन कधी राहीन, तुमच्या शरणांच्या घरचा, कूडलसंगमदेवा, लिंगजंगमाचा दास होईन !
भले म्हणवीत पाच दिवस जगलात तरी पुरे,
भले म्हणवीत चार दिवस जगला तरी पुरे,
भले म्हणवीत तीन दिवस जगला तरी पुरे,
भले म्हणवीत दोन दिवस जगला तरी पुरे,
जीवितं शिवभक्तांना वर पंचदिनांनि च ।
नाजकल्पसहस्रानि भक्तीहीनस्य शांकरि ।।
म्हणून, कुडलसंगमदेवाच्या शरणांच्या वचनांनुसार
भले म्हणवीत एक दिवस जगलात तरी पुरे ना..
आयुष्यातून बाकी आहे, प्रलय नाहीच,
या विचाराने धन पुरून ठेवतात,
आयुष्य संपून प्रलय आल्यास त्या धनाचा उपभोग घेणारे कोणीच नसणार,
जमीन खोदून धन काढून ठेवू नका,
जमीन गिळंकृत केलेले बाहेर टाकेल काय ? डोळ्यांनी पाहून जमिनीत पुरून उपाशी जाऊ नका.
कुडलसंगम देवाच्या शरणांच्या सेवेत त्वरित खर्च करा.
जिकडे पहावे तिकडे बसवरुपी वेल दिसे उचलुन पाहता ईष्टलिंगास भक्तीरुप रस दिसे
बसवण्णांमुळे आयत-स्वायत- सन्निहित असे बसवण्णांमुळेच गुरू-लिंग-जंगम असे
पादोदक-प्रसाद बसवण्णांमुळे असे सर्व जाणणाऱ्यानो तुम्हीच सांगा-तुम्हीच ऐका हो
बसवा-बसवा-बसवा म्हणल्याविना स्नान करती तयांची भक्तीशून्यच असे कलिदेवरदेवा तुम्हीच पहा हो
सर्वज्ञ
बसवेश्वराने मला जे उपदेशिले कालज्ञान भस्म लावून ते लोकांत सांगेन शिशु माना मला सर्वज्ञ
दुर्गा -मारिका-चंडी यांच्या अभद्र शक्ती
मार्गी न येती सद्गुणांच्या
सद्गुरूच्या आज्ञेने- सर्वज्ञ
लिंगाला नाही अंत, लिंग नाही असे स्थान कोणते
लिंगात जग सामावले आणि
लिंगशिवाय आहे कोण ? -सर्वज्ञ.
गुरु, लिंग, जंगम, हर कृपा रूप असे
करून निश्चय वागेल भक्तास परम पद पावेल- सर्वज्ञ
शरण सती होऊन, वरलिंग पती करून
मरण पावेल तेथे तेथे शिवशरण
परत जन्मेल का ?- सर्वज्ञ
शरीर मन भाव, गुरु लिंग जंगमास
मरण, आदी अर्पिता शरणास
परत जन्म आहे का ? - सर्वज्ञ
इष्टलिंगात मन, घट्ट करोनि न ठेवता
कष्ट भ्रमात बुडेल मग, त्यासी, कर्माचेच
इष्टफळ मिळे- सर्वज्ञ
किती प्रकारच्या आरत्या एकत्र ओवळून काय फळ
प्रितीविना शिवपूजा, ओसाड गावची- गत, जळाल्यापरी- सर्वज्ञ
लिंगपूजा करोनि जंगमाला वाढल्याने
लिंगपूजेने क्षेम दाट होऊन तो लिंग भंग पावत नाही.- सर्वज्ञ
लिंगाला दाखवीत नैवेद्यनंतर गिळणारा तू ऐक,
लिंग जेवणार नाही, हे जाणून अरे माकडा,
जंगमास वाढ- सर्वज्ञ
एक नाही देव तेव्हा का दोन आहेत
एक सर्वज्ञ कर्ता तूच सर्व जगाला
एक एक देव- सर्वज्ञ
जंगमाला न फसविणारा, लिंगपूजा न सोडणारा,
संगती भक्तांची, परस्त्रीचा ना मोह त्यासी
भंगच नाही सुखास-सर्वज्ञ
कावळा दाणा बघून काव करून बोलावी सोयऱ्यांना
कावळा आणि कोंबड्यापरी जेवणार नाही त्यांचे जीणे
कावळ्यापेक्षा वाईट - सर्वज्ञ
तनू गुरुस, मन लिंगास
धन जंगमास, अर्पिणाऱ्या निष्कपट भक्तांस
अनघ पद आहे - सर्वज्ञ
लिंग मंदिरात छान, गंगेचा काठ छान
लिंगवंतांचे वचन छान, शरणांचा संगच छान - सर्वज्ञ
बसवेश्वर म्हणता पाप असे नाश पावेल हो
जसा दवबिंदू पानावरी,उन्हाने
पुसून गेल्यापरी - सर्वज्ञ
भक्तीला दोन अक्षर, मुक्तीला दोन अक्षर
भक्तीने मुक्ती मिळवायची असेल तर
सदा भक्तीने षडाक्षर म्हणा.- सर्वज्ञ
अणू रेणू वंदनीय, जणू बीज प्रणव
अणूत एक अणू जाणिता महंत
त्रिनेत्र तोच- सर्वज्
बसवपीठ उभारती, बसवमुद्रा मिरविती,
तयांची नाणी पाडिती, शोभयमाने,
तेव्हा भूलोक वश्य न होती ? सर्वज्ञ.
नंतर बसवण्णा अगोदर लिंग असे खोटे बोलणे मला ऐकवत नाही. नंतर लिंग अगोदर बसवण्णा.
महात्मा बसवण्णांनीच इष्टलिंग निर्माण केले. तसेच महात्मा बसवण्णांनीच जंगम निर्माण केले. प्रसाद ही बसवण्णांचीच देणगी आहे. कुडलचेन्नसंगमनाथा, या तीन गोष्टी बसवण्णांमुळेच निर्माण झाल्या.
(वचनदीप्ती, चेन्नबसवेश्वर वचन क्र: ८४७.)
आकार निराकार झाला तुमचा बसवण्णा
प्राण नि:प्राण झाला तुमचा बसवण्णा
लिंग जंगमांचे ऐक्य समर्पित झाले बसवण्णा
निःशब्द वेद्द झालात बसवण्णा
कलिदेवरदेवाच्या हृदयात प्रवेश करुनी
देवांचा देव झालात तुम्ही संगनबसवण्णा.
धोबी- धोबी म्हणतात धोबी कोण हे कोणीच जाणत नाही.
माझ्या मलत्रयाने बरबटलेल्या मनाचा मळ
घेऊन आपल्या घरी वाहून घेऊन गेला.
हाताने मळ निघत नाही म्हणून आपल्या पायाने
तुडवून खूप ओढून- ताणून धुवून काढले.
आपले निर्मळ वस्त्र मला दिले.
ते दिलेले निर्मळ वस्त्र पांघरून घेतल्याने
धोबी माचीपित्याच्या कृपेने मी जगतो
कुडलसंगमनाथा. (ब. व. १३०७)
आयुष्य आहे, प्रलय नाही म्हणूनी अर्थ साठविता,
आयुष्य संपून प्रलय आल्यास नसे येई अर्थ भोगता
ठेवू नका जमीन खोदून, थुंकेल का जमीन गिळून ?
न भोगता जाऊ नको डोळ्याने पाहून, मातीत ठेवून
ठेवल्यास तुझ्या बायकोसाठी, करणी वेगळी बायकोची
मेल्यावर तू , दुसऱ्याबरोबर राहणार ती
मूर्खपणा नको करु दुसऱ्यासाठी राखण्याचा
झिजवावे अर्थ सत्वर कुडलसंगमदेवाच्या शरणांसाठी.
तुम्हांस न जाणल्याकारणेच हाती गवत !
तुम्हांस न भजल्याकारणेच फासाचा दोर गळ्यात !
पिळणे ते कशास ? धुणे ते कशास !
डुंबता डुंबता नाक धरावे कशास !
कुडलसंगाच्या शरणांमधील
डोहर कक्कय्या कोणत्या नदीत डुंबून आले ?
- बसवण्णा
बगळ्यापरी जलाशयतटी राहून,
करतात ध्यान नाक पकडून.
केस मोकळे सोडून ओठात पुटपुटतात,
नि डोळे मिटून बोटे मोजतात.
दुर्वांची जुडी घेऊन उंचावतात हात,
कुडलसंगास न जाणताच धावा करतात.
कावळा दाणा बघून काव करून बोलावी सोयऱ्यांना
कावळा आणि कोंबड्यापरी जेवणार नाही त्यांचे जीणे
कावळ्यापेक्षा वाईट - सर्वज्ञ
तनू गुरुस, मन लिंगास
धन जंगमास, अर्पिणाऱ्या निष्कपट भक्तांस
अनघ पद आहे - सर्वज्ञ
लिंग मंदिरात छान, गंगेचा काठ छान
लिंगवंतांचे वचन छान, शरणांचा संगच छान - सर्वज्ञ
बसवेश्वर म्हणता पाप असे नाश पावेल हो
जसा दवबिंदू पानावरी,उन्हाने
पुसून गेल्यापरी - सर्वज्ञ
भक्तीला दोन अक्षर, मुक्तीला दोन अक्षर
भक्तीने मुक्ती मिळवायची असेल तर
सदा भक्तीने षडाक्षर म्हणा.- सर्वज्ञ
अणू रेणू वंदनीय, जणू बीज प्रणव
अणूत एक अणू जाणिता महंत
त्रिनेत्र तोच- सर्वज्ञ.
दुर्गाम्मा पोचम्मा करून त्या मूर्ती गळ्यात बांधिती ताईत,
ते कर्ज होता मूर्ती टाकिती विकून, ठेवुनी गहाण भरती पोट
विकला जाणारा नव्हे माझा देव, कुडलसंगमदेवासम अन्य नाही !
श्री मत्सजन शुध्द शिवाचारी होवून,
अष्टावरण अंग होवून,पंचाचार प्राण होवून,
बसवेश्वर देवांच्या परंपरेचे म्हणवून,
बोलून चालून भत्क म्हणवून,पुरातन म्हणवून,
अशा भत्कास हे तिन्ही लोक समान नव्हेत म्हणावे,
त्या भक्तास शिवाचे आसनच केलास होण्यापरी पहा.
हा शिवाचाराचा मार्ग न अनुसरता रात्र,दिवस,अनंत सूतक,पातकांच्यामध्ये बुडून जावून मतिभ्रष्ट होवून पंचांग म्हणून भुंकणार्या
भ्रष्ट मातंगांचे बोलणे तेथेच असू दे.
पंचांग विचारलेल्या दक्षब्रह्ममाचे शिर का गेले?
पंचांग विचारलेले पांडव देशभ्रष्ट का झाले?
पंचांग विचारलेल्या श्री रामाची बायको रावणाच्या बंदिवासात का गेली?
पंचांग विचारलेल्या इंद्राचे शरीर योनी मंडल का झाले?
पंचांग विचारलेल्या व्दारकापति शहराच्या नारायणाच्या बायका महारामांगासी वश होवून का गेल्या?
पंचांग विचारलेल्या सरस्वतीचे नाक का गेले?
पंचांग विचारलेला काम जळून भस्म का झाला?
पंचांग विचारलेले ब्रम्ह,विष्णू,इंद्र प्रथम
करून तेहतीस कोटी देवता तारकासूराकडून पीडाग्रस्थ झाले असता शिवाकडे जावून दया याचना का केली? अंधळा,लंगडा,दात पडलेला ओळखता न येणाऱ्याचे बल विचारता येत नाही.शुभदिन,शुभमुहूर्त,शुभवेळ,शुभघटिका,व्यतिपात,अशूभवार म्हणून संकल्प करून भुंकणार्याचे बोलणे ऐकवत नाही. गुरूची आज्ञा ओलांडून गेल्यास सूतक प्रसूत झाल्यास ,सूतक विटाळ झाल्यास सूतक,असे म्हणून संकल्पना करता. तुमचे घर सूतक झाल्यास तुमच्या गुरूने दिलेले लिंग काय कामाचे? विभूती काय कामाची? रुद्राक्ष काय कामाचे? मंत्र काय कामाचे? पादोदक प्रसाद काय कामाचे? तुमचा शिवाचार कोठे गेला? तुम्ही काय झाला सांगा हो?माहीत नसल्यास ऐका .तुमचे लिंग पीतलिंग;तुम्ही सर्व भूतप्राणी.तुमच्या घरातील पदार्थ सर्व मघांनी भरलेले अशुद्ध किल्मीष वाटतात. हे पाहून लाज न वाटता,पुन्हा पुन्हा शुभमुहूर्त विचारून लग्न झालेल्या अनेक लोकांच्या बायका विधवा होवून गेल्याचे दृश्य पाहून पंचांग विचारलेल्यांना कुत्र्याची विष्ठा डुकराने पळवून खाल्या परी झाले पहा. निस्संग निराळ निजलिंग प्रभू.
(निरालंब प्रभुदेवर सं.व.सं.७-१२४३)
नवऱ्याच्या उष्टयाला लाजणारी ,
प्रियकराचा विडा खाणारी,गुरूचा उपदेश घेवून,
अनिती देवतांचा नैवेघ खाणारे महार तुम्ही ऐका.
अंडज,उत्पत्ती सर्व देवापासून झाले.
मैलार,बीर,भैरव,धूळ,केत वगैरे
क्षुल्लक दैवांना पूजून,भत्क म्हणवून घेणाऱ्या चंडी,
दुर्गा सारख्या कुत्र्यांना पाहून मनविटले म्हणाला, आमचा अंबिगरचौडय्या निजशरणनु
(अंबिगरचौडय्या सं.व.सं १-१३०)
कोटी सुख आल्यास बसवण्णास स्मरेन ,
कोटी दु:ख आल्यास बसवण्णास स्मरेन ,
लिंगार्चना करीत असता बसवण्णास स्मरेन ,
जंगमार्चना करीत असता बसवण्णास स्मरेन ,
पादोदक - प्रसाद स्वीकारताना बसवण्णास स्मरेन ,
बसवण्णाचे स्मरन न केल्यास, भक्ती नाही म्हणुनी ,
मी 'बसवा , बसवा' म्हणत आहे पहा कलिदेवरदेवाच्या देवा.
शरणांना मृत्यू नाही, शरण मृत्यू जाणत नाहीत,
मृत्यू त्यांना आवश्यक वाटत नाही.
लिंगात उदय झालेल्या निजैक्यांना
त्या लिंगाविना दुसरीकडे राहता येत नाही.
कुडलसंगमदेवाचे शरण
निजलिंगाच्या देहामध्ये शिरुन आत जाता
उपमा देणारे दिसत नाहीत.
' शरण सती, लिंग पती ' म्हणून वर्णन करून,
लाघवी बोलणारी दृष्ट स्त्री नव्हे मी.
मी तुज पसंत करुन मोहित झालेली पतिव्रता.
होय-नाही म्हणण्यास उदाहरण देऊन
सांगते ऐक पतिराया.
लोकांची वर्दळ नसलेल्या महाघोरारण्यामध्ये
जात असता, त्यावेळी सैल अंबाड्याची,
सुरेख अशी, लांब भुवयांची,
खूप शहाणी, कमलनेत्री, कमलपत्रमुखी,
स्मितवदना, छान स्त्री, लाल ओठांची सुंदरी,
बाकदार बाहुंची नायिका,
भरीव स्तनांची मस्त युवती,
सिंहकटीची रुबाबदार स्त्री,
घागरीसारख्या नितंबांची,
केळीच्या झाडासारख्या मांड्या असलेली,
शंखाप्रमाणे गळा असलेली,
मंदगामिनी पायांची,
अशी सुंदर, सुकोमल, लतांगी,
सर्व दागिने घातलेली,
नवीन पातळ रेशमी कपडे परिधान केलेली,
सुगंधी द्रव्यांचे लेपन केलेली स्त्री,
मज घट्ट आलिंगन देऊन,
मोहित होऊन, नाजूक प्रेम करत,
कामातुर झालेल्या भक्ताने माझे हात
पकडून आपल्याशी मिलन होण्यासाठी
विनवणी करायच्या वेळी वाघाने पकडलेल्या
गाईसम मी थरथर कापत असे हे परमात्मा,
तुझ्या सतीचे हात पकडून रक्षण करा हो.
असे न करता, त्या मायाविनीस मी किंचित
जरी मोहित झालो तरी जन्मोजन्मी
डुक्करांच्या नरकात ढकल.
मज न ढकलल्यास तुज तुझी शपथ;
तुमच्या अर्धांगिनीची शपथ;
तुमच्या बसवादि प्रमथांची शपथ.
ही माझी अगदी केविलवाणी विनवणी
म्हणजे तुमची कृपाच,
घनलिंगिय मोहद चेन्नमल्लिकार्जुना.
म्रत्यूचे नाही भान , जगण्याचा अभिमान , ठेविले पुरून संपत्ती धन .
पाही धन धान्य , दोन्ही डोळे भरून , ठेविले साचवून कुणा कारण ?
कळले ना मरण , येता शेवट क्षण , उपभोगावे कोण तुझे धन ?
ठेविले जे धन पत्नीसाठी जपून , ऐसे खुळेपण करू नये .
नाही ठेवी नाते , तुला उचलताची , होई ती इतरांची धनासवे .
कूडलसंगमदेवा ! शरणांच्या सेवेत , वेचावे आनंदात धनधान्य .
कोणतेही बी मातीत पडल्यास अंकुर , टोक , मागे पुढे असे का ?
तू विसरल्यास अन् मी जाणिल्यास दोघास वेगळे शरीर असे का ?
मुळ नष्ट झाल्यास अंकुरणे थांबे .
मिलनास सतीपती असे नाव देती , परी ज्ञानास वेगळे शरीर असे का ?
वेगळे पाऊल टाकू नकोस , मारय्यप्रिय अमलेश्वरलिगं जाणिण्यास्तव .
आशा राजाला असे , परी , शिवभक्तांस असे का हो ?
रोष यमदूतांस असे , परी अजात शरणांस असे का हो ?
एवढ्या जादा तांदळाची आशा तुम्हास का ?
ईश्वर मान्य न करी . मारय्यप्रिय अमलेश्वरलिगांपासून दूर , मारय्या .
पाच नाहीसे झाल्याविना जगामध्ये कोणासही गरीबी नाही असे नाही .
पाच असल्यावर साऱ्या जीवनास चैतन्य येईल .
मारय्यप्रिय अमलेश्वरलिगं आसल्यावर धनमनसंपन्न होती .
आयुध देऊ शकतील , परी शौर्य देऊ शकतील का हो , मारय्या ?
कामिनी देऊ शकतील , परी समागम करु शकतील का हो , मारय्या ?
चोरी करण्या आलेल्या चोरास गरीब म्हणून घ्या असे का हो , मारय्या ?
मनाची परीक्षा करुन भक्ती कसास लावावी म्हणणाऱ्याने , आमच्यामधील गुण न पाहिले , मारय्या .
फासावर चढायच्या वेळी पुन:मरणास भीत बसावे का ?
मारय्यप्रिय अमलेश्वरलिंगा , तूच जाणिशी .
गर्वाने केलेली भक्ती म्हणजे , पैशाची नासाडी .
आचरण नसलेले बोलणे म्हणजे , अंतरंगास हानी .
न देताच त्यागी म्हणविणे म्हणजे , डोक्यावर केस नसलेला श्रंगार .
द्रढ नसलेली भक्ती म्हणजे , तळ फुटलेल्या मडक्यात निर्मळ पाणी भरल्यागत .
मारय्यप्रिय अमलेश्वरलिंगाप्रत न पोहोचणारी भक्ती .
पुजा केल्यावर पुण्याचे ध्येय स्पष्ट दिसून येई .
स्वीक्रत कार्य केल्यावर महाप्रथांचे वचन-भाग्य लाभतसे .
स्वीक्रत कार्य न करता केलेली भक्ती , उजाड गावाच्या वेशीत काठी लावल्यागत .
कार्य करताना द्धिधा भाव नष्ट होऊन करु शकल्यास , तेच मारय्यप्रिय अमलेश्वरलिंगाशी मिलन .
गुरु म्हणू का , गुरु एक माणूस .
लिंग म्हणू का , लिंग एक दगड .
जंगम म्हणू का , जंगम आत्मा असे .
पादोदक म्हणू का , पादोदक केवळ पाणी .
प्रसाद म्हणू का , प्रसाद म्हणजे अन्न .
असे म्हटल्याकारणे ,
कांचन , कामिनी , जमीन हे त्रिविध धरल्यामुळे , गुरु म्हणजे माणूस .
अष्टविधार्चन , षोडशोपचारामध्ये सापडल्यामुळे , लिंग म्हणजे दगड .
आशापाशामध्ये अडकल्यामुळे , जंगम म्हणजे आत्मा .
वेषधारी होऊन कांचनासाठी हात पसरणाऱ्यांपाशी , पादोदक , प्रसाद स्वीकारल्यास , चिखलामध्ये रुतलेल्या जनावरागत होई पहा , अमुगेश्वरा .
सदाचारच स्वर्ग , अनाचारच नरक .
सत्य बोलणे हाच देवलोक !
असत्य बोलणे हाच म्रत्युलोक !!
आचारच स्वर्ग !
अनाचारच असे नरक !!
सदैव करावी सज्जन संगती !
नको नको संगती दुर्जनांची !!
असो सर्प कोणताही , विष त्याचे एक !
म्हणुनिया देख नको , कूडलसंगमदेवा !!
चालणे छान ,बोलणे छान,जेथे पाहावे तेथे छान,प्रमथांमध्ये छान,पुरातनांमध्येही छान.
अंबिलीची चव पाहून,रुचकर असे म्हणोनी,
कुडलसंगमदेवास पाहिजे म्हणून राखून ठेविली आमुच्या चेन्नय्याने.
भले म्हणवीत पाच दिवस जगलात तरी पुरे,
भले म्हणवीत चार दिवस जगला तरी पुरे,
भले म्हणवीत तीन दिवस जगला तरी पुरे,
भले म्हणवीत दोन दिवस जगला तरी पुरे,
जीवितं शिवभक्तांना वर पंचदिनांनि च ।
नाजकल्पसहस्रानि भक्तीहीनस्य शांकरि ।।
म्हणून, कुडलसंगमदेवाच्या शरणांच्या वचनांनुसार
भले म्हणवीत एक दिवस जगलात तरी पुरे ना..
लोखंड परिसाच्या संगात असता
लोखंडाचे सोने झाले नाही तर तो परिस कसला?
घरातील अंधार दूर झाला नाही तर ती ज्योत कसली?
कुडलसंगमदेवाची मनापासून पुजा करता तरी
कर्म तुटले नाही तर ती पुजा कसली?
-(ब व.८०१)
भक्तियुक्त वाणी मधुर बोलेन,
बोलेन तसाच देवा मी वागेन,
बोलै तैसा चाले असे वर्तन ठेवीन.
जोखण्यासाठी तराजू ठेवावा तुमच्याच हाती.
चुकलो,माकलो जवाएवढेही,
बुडवोनी मला निघुन जावे कुडलसंगय्या.
जलधारा नव्हे मज्जन,बिल्वार्चन नव्हे पुजन,
धुप नव्हे परिमळ,तबक नव्हे आरती,
पाकपदार्थ नव्हे नैवेद्यार्पण.
ते कसे म्हणाल तर,
सज्जनताच मज्जन,सदाचारच बिल्व नि पुष्प,
अष्टमद जाळणेच धुप,नयनच स्वयं ज्योती,
संतृप्तीच नैवेद्य पहा,गुहेश्वरा.
बसवा, बसवा हे शब्द लोपले,
सर्वांचा आधार बसवरुपी खांब मोडला,
बसवांच्या कार्याची हानी झाली,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना.
(वचन क्र. ५९७.)
हत्यारे चालविणारे सगळे भोसकू शकतात काय ?
युद्धाची साधना करणारी तरुण मुले
युद्ध करु शकतात काय ?
प्रसिद्धीसाठी कष्ट करणारे सगळे
सदभक्त ठरतात काय ?
हे सगळे चंदेश्वरलिंगाला आवडत नाहीत.
प्रभू , तू हवे तर ऐक, वा ऐकू नको रे,
तुज गायिल्याविना मी न राहू शके रे.
प्रभू , तू हवे तर पहा, वा पाहू नको रे,
तुज पाहुनि हर्षिल्याविना मज न राहवे रे.
प्रभू, तुज हवे तर आवडो, वा नावडो रे,
तुज आलिंगिल्याविना मी न राहू शके रे.
प्रभू, तुज हवे तर प्रसन्न हो, वा होऊ नको रे,
तुज पूजिल्याविना मजला न राहवे रे.
चेन्नमल्लिकार्जुनराया, तव पूजन- अर्चनी
हर्षन्मादात मी डोलत राहीन रे !!
शूद्र, शूद्र म्हणून दूर रहा म्हणती,
तो कसा शूद्र ?
स्वताःचे शुद्रत्व स्वतः न जाणता
समोरच्याचे शुद्रत्व शोधणाऱ्या भ्रष्टांना काय म्हणावे,
महादानी कुडलचेन्नसंगमदेवा !
( वचन, बसवसमिती, चेन्नबसवण्णा, वचन क्र: ९४१.)