Submitted by पुरंदरे शशांक on 13 March, 2018 - 03:48
तू चि गा विठ्ठल....
गाथेमाजि स्वये । ठायी ठायी देखा । नित्य पाठीराखा । दीनबंधू ।।
शब्दाशब्दांतून । जागवी साधका । हात देसी निका (चांगला, सुयोग्य ) । भाविकांसी ।।
सगुण निर्गुण । आम्हा विलक्षण । दाविसी तू खूण । नेमकीचि ।।
वैराग्याचे फळ । भक्ति भाव प्रेम । दान अनुपम । काय वर्णू ।।
वैकुंठीचा राणा । अवतरे शब्दी । सकळही सिद्धी । पावलीसे । (प्राप्त झाली) ।।
नसे थोर काही । आम्हालागी अन्य । मायबाप धन्य । तूंचि आम्हा ।।
तूंचि गा विठ्ठल । प्रेमचि केवळ । सोयरा सकळ । जिवलग ।।
राखावे पायांशी । जन्मोजन्मांतरी । आळी (हट्ट) साच (खरी) करी । लेकुराची ।।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय प्रासादिक
अतिशय प्रासादिक
मला वाटले ....
वैकुंठीचा राणा । अवतरे गृही | दावू का पंढरी | पावलासी | |
खूप सुंदर रचना!
खूप सुंदर रचना!
विठ्ठल ! विठ्ठल ! _______/\________
सुंदर रचना!
सुंदर रचना!
सुंदर आणि प्रासादिक !
सुंदर आणि प्रासादिक रचना !