Submitted by पुरंदरे शशांक on 18 March, 2018 - 00:42
हरी किर्ती गुढी
हरीनाम सार । हरी संकीर्तन । हरी गुणगान । संत गाती ।।
हरी महिमान । संतांसी प्रमाण । हरी हे निधान । संतजना ।।
गुढी उभारोनी । हरी महात्म्याची । मिरविती साची । हरीभक्ती ।।
हरिविणे जिणे । व्यर्थ वाटे संती । नित्य रमताती । हरीनामी ।।
प्रेमे जाऊ आम्ही । संतांसी शरण । तेणे हरी जाण । संतुष्टेल ।।
प्रेम भक्तीभाव । सुख समाधान । लाभे कृपादान । अनायासे ।।
हरी किर्ती गुढी । उभारू आनंदे । तेणे विश्व कोंदे । निजानंदी ।।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!!!
छान!!!
निजानंदाची प्रासादिक गुढी!
निजानंदाची प्रासादिक गुढी!
निजानंदाची प्रासादिक गुढी!
निजानंदाची प्रासादिक गुढी!
सुंदर!
सुंदर!
हे तुम्ही स्वतः लिहिले असेल
हे तुम्ही स्वतः लिहिले असेल तर साष्टांग दंडवतच _/\_
सुरेख!
सुरेख!