ठेऊनी पाय मुंडक्यावरी
दे फेकूनी सगळे जोखड
न रूळलेली वाट हाकारी
चालणे आहे एक अवघड ॥१॥
न उमगल्या रितींना काय
तू उगाची कवटाळून आहे
धरतात जन कुणाचे पाय
म्हणूनी धरणे व्यर्थ आहे ॥२॥
गंडवितात सिद्धी मार्गावरी
ज्ञानीजन पथ दाखवून गेले
दिसतील तुला जे चमत्कारी
चालताना ते ध्येयं विसरले ॥३॥
तुला मार्ग दाखविला ज्यांनी
बडेजाव ना कधी मिरवीला
तुझे ब्रह्म आहे शोषित जनी
समर्पण हवे फक्त कान्ह्याला ॥४॥
―₹!हुल/२२.९.१७
पहाटेची वेळ होती, दाल सरोवरात वेगवेगळ्या रंगांची मनमोहक कमलदले फुलली होती. त्यांचा मादक गंध आसमंतात दरवळत होता. त्या सुगंधाला भुलून एक भुंग्यांची टोळी बेधुंद होऊन रसपान करू लागली. भृंगूला कळेच ना की ह्या कमळावर बसू की त्या? अखेर त्यानी एकाची निवड केलीच. कोवळ्या पांढऱ्या स्वच्छ पाकळयांवर विराजमान होऊन भृंगराज स्वतःशी गुणगुणू लागले. सूर्याची कोवळी किरणे जाऊन आता जरा ऊन बोचू लागलं होतं. म्हणून मग जरा जंगलात फेरफटका मारायचा बेत ठरला. सगळी भुंग्यांची टोळी सुरूबनात गारव्याच्या शोधात गेली. आपले भृंगराजही मित्रांबरोबर पकडापकडी खेळण्यात दंग झाले.
आळवणी
तुजविण वाटे । असार संसार । व्यर्थ बडिवार । भोवताली ।।
तुज नाठविता । त्रासले हे मन । व्याकुळले प्राण । तुझ्याविना ।।
सुटू पाहे धीर । भाराभार चिंता । घाला अवचिता । पडिला का ।।
नव्हे अाराणूक । तुजविण देवा । धाव रे केशवा । लागवेगी ।।
धाव धाव अाता । वेगे हात देई । येई लवलाही । ह्रदंतरी ।।
सुखावेल जीव । रूप देखताच । अाळी करी साच । बालकाची ।।
सत्यासत्य
लटिका संसार । गुंतवितो फार । सावलीचा भार । तैसे होय ।।
मृगजळी पूर । भय ते जीवास । साच अविनाश । दिसेचिना ।।
कृपाळुवा तुम्ही । सर्व संत जन । दाखवी निधान । सत्य थोर ।।
दूर होता जाण । दुःस्वप्न भीषण । शांति समाधान । लाभे जीवा ।।
घेता अनुभूती । सत्याचीच सदा । गोंधळूक कदा । होईचिना ।।
निवांत निश्चल । होवोनिया मन । श्रीहरी चरण । चिंतीतसे ।।
ॐ तत् सत् ।।
निधान = ठेवा, खजिना
अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे*
झरझर सरत्या..
थेट धडकत्या...
अधुना मधुनी स्फटिक जन्मती अतिताचे^
उत्पत्ती अन् स्थिती, लयाचा रहाट अविरत चालतसे
स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे..
अनंतरंगी, विविध चणींचे..
पोहोरे माळुनी फिरत असे
स्धल-कालाचे ताणे-बाणे तोलुनी धरिती विश्वाला
जटिल नि बहुमित..
अमूर्त, अनवट..
रूप तयांचे गोचर केवळ प्रतिभेला
================================
* अधुनाचे = वर्तमानाचे
^अतिताचे = भूतकाळाचे
खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचं मनात होतं पण विचारांत सुसूत्रता नव्हती. शेवटी आज लिहायचंच असं ठरवलं. लिखाणातील विस्कळीतपणा माफ कराल अशी आशा आहे. नवीन भाग फार लहान होत असल्याने अश्विनी यांच्या सूचनेनुसार मी पुढचे भाग इथेच वाढवत आहे.
"पप्पा!"
"बोल!"
"अंह असा रिप्लाय नाही द्यायचा, वन वर्ड मध्ये."
पप्पा खळखळून हसला. क्वचित पप्पा असा हसायचा.
"बोल माझी माऊ."
"पप्पा वीस वर्षाची आहे मी, माऊ काय म्हणतोय?"
"तू माझी खाऊ माऊ आहेस. बोल ना काय झालंय?"
हा धागा नाथ सांप्रदायाचा इतिहास,साहित्य,स्वरूप, सिद्धांत, पुजापद्धती तसेच नाथपंथाची महत्वाची स्थाने, नाथपंथीयांचं सामाजिक योगदान,आलेले अनुभव यांच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी उघडण्यात आला आहे.
[स्पष्ट सुचना- या धाग्यावर वरील गोष्टींची एलर्जी असलेल्यांनी कृपया येऊ नये हि आग्रहाची हात जोडून विनंती. ]
गुड मॉर्निंग डॉक्टर ग्रे.
गुड मॉर्निंग मिस करी....बरोबर ?.. तुम्हीच मेल पाठवलात ना काल रात्री, सकाळची पहिली अपॉईंटमेंट मिळेल का म्हणून? - सत्तरी पार केलेले, दाट पांढर्या आणि कुरूळ्या केसांचे डॉ.ग्रे त्यांच्या सोनेरी फ्रेमच्या चष्म्यातून त्यांच्या केबिनच्या दारात ऊभ्या डॉ. करींकडे बघत म्हणाले.
हो डॉ. ग्रे मीच पाठवला होता आणि धन्यवाद एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही मला भेटायचे मान्य केलेत.
धगधगे अब्ज सूर्यांचे
हे स्थंडिल निशिदिन जेथे
लवलवत्या चैतन्याचे
का बीज जन्मते तेथे ?
अणुगर्भ उकलुनी बघता
जी अवघड कोडी सुटती
त्या पल्याड पाहू जाता
का शून्य येतसे हाती ?
का अंत असे ज्ञेयाला ?
का ज्ञान तोकडे ठरते?
का सीमा अज्ञेयाची,
अज्ञात प्रदेशी वसते ?