श्री गहिनीनाथ
*************
खेळता गोरक्ष
घडली करणी
उद्भवे गहिनी
मातीमध्ये
भिवून बालके
भूत त्या म्हणून
बसले लपून
तो करभाजन
मच्छिंद्रे जाणून
हृदयी धरुन
प्रेम दिले
घडवून याग
देव संगतीत
गहिनी पंथांत
नाथ केले
गहनीने थोर
निवृत्ती तो केला
ज्ञानेश दिधला
महाराष्ट्रा
नाथपंथाच्या या
गहिनी फांदीला
बहर हा आला
वारकरी
मराठी देश हा
ऋणी गहिनीचा
जिव्हाळा जीवाचा
पुरविला
हा धागा नाथ सांप्रदायाचा इतिहास,साहित्य,स्वरूप, सिद्धांत, पुजापद्धती तसेच नाथपंथाची महत्वाची स्थाने, नाथपंथीयांचं सामाजिक योगदान,आलेले अनुभव यांच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी उघडण्यात आला आहे.
[स्पष्ट सुचना- या धाग्यावर वरील गोष्टींची एलर्जी असलेल्यांनी कृपया येऊ नये हि आग्रहाची हात जोडून विनंती.
]
बुजक्या कानाच्या कानफाटा मी
अलख निरंजन ध्वनी मनी
होम धडाडे सोहम अंतरी
अन देहाच्या वीणेमधुनी
तत्वमसीचा नाद झंकारी
पवनच्या या वावटळीतून
मन उसळते देह सोडून
जाते वरवर स्थिर होवून
निजते घेवून शून्य उशाला
त्या निद्रेत मी नसलेल्या
असते केवळ निळे आकाश
भरून उरतो शुभ्र प्रकाश
स्वप्न हि कुणा कळू लागते
जीवनाचा अट्टाहास
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/