Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 December, 2019 - 12:48
श्री गहिनीनाथ
*************
खेळता गोरक्ष
घडली करणी
उद्भवे गहिनी
मातीमध्ये
भिवून बालके
भूत त्या म्हणून
बसले लपून
तो करभाजन
मच्छिंद्रे जाणून
हृदयी धरुन
प्रेम दिले
घडवून याग
देव संगतीत
गहिनी पंथांत
नाथ केले
गहनीने थोर
निवृत्ती तो केला
ज्ञानेश दिधला
महाराष्ट्रा
नाथपंथाच्या या
गहिनी फांदीला
बहर हा आला
वारकरी
मराठी देश हा
ऋणी गहिनीचा
जिव्हाळा जीवाचा
पुरविला
विक्रांत गहिनी
पदास नमतो
पायधुळ घेतो
माथ्यावरी
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लहानपणी नवनाथ ग्रंथातल्या कथा
लहानपणी नवनाथ ग्रंथातल्या कथा आजोबा सांगत असायचे.. ते आठवले.
Wah.. Sunder
Wah.. Sunder
जाणून मच्छिंद्र
जाणून मच्छिंद्र
दुर्मिल म्हणून>>>
दुर्मिल म्हणजे ??
दृमिल !!
आणि हा तर करभंजन ना ?
घडवून याग का योग ?
घडवून याग का योग ?
खरं आहे की श्री निवृृृृृृत्तिनाथ, श्री ज्ञानेश्वरमहाराज यांनी योगाला भक्तीची जोड देऊन वारकरी पंथ निर्माण केला...
रचना सुरेखच...
____/\___
घडवून याग का योग>>>
घडवून याग का योग>>>
शशांकजी, याग !
आनंद. खुप धन्यवाद , चुकले
आनंद. खुप धन्यवाद , चुकले होते
मन्या मिनल शशांक धन्यवाद
अतिशय सुंदर!! या शुक्रवारी
अतिशय सुंदर!! या शुक्रवारी म्हणजे २८ जानेवारीस, निवृत्तीनाथ यात्रा आहे. निवृत्तीनाथांच्या गुरुंचे गहिनीनाथांचे व स्वतः निवृत्तीनाथांचे स्मरण झाले!!