स्धल-कालाचे ताणे-बाणे

Submitted by अनन्त्_यात्री on 25 August, 2017 - 12:00

अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे*
झरझर सरत्या..
थेट धडकत्या...
अधुना मधुनी स्फटिक जन्मती अतिताचे^

उत्पत्ती अन् स्थिती, लयाचा रहाट अविरत चालतसे
स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे..
अनंतरंगी, विविध चणींचे..
पोहोरे माळुनी फिरत असे

स्धल-कालाचे ताणे-बाणे तोलुनी धरिती विश्वाला
जटिल नि बहुमित..
अमूर्त, अनवट..
रूप तयांचे गोचर केवळ प्रतिभेला
================================
* अधुनाचे = वर्तमानाचे
^अतिताचे = भूतकाळाचे

Group content visibility: 
Use group defaults