'फॅमिली ड्रामा' - गप्पा श्री. अजित भुरे यांच्याशी...
मानवी नातेसंबंधांचा थांग लागणं कठीण. ही नाती कायमच नाटककारांना भुरळ घालत आली आहेत.
वेगवेगळे विषय हाताळणार्या मराठी रंगभूमीवर दाखल झालेलं नवंकोरं नाटक 'फॅमिली ड्रामा' मानवी नात्यांना केंद्रस्थानी ठेवूनच काहीतरी सांगू पाहतं. आजच्या काळातल्या करमरकर कुटुंबाची ही कथा. जरासं विस्कटलेलं असं हे कुटुंब. 'खेळ नात्यांचा' ही दूरचित्रवाणी मालिका या घरातल्या गृहिणीचं सर्वस्व, तर कुटुंबप्रमुखाचा आपल्या मुलाशी फारसा संवाद नाही. मग एक दिवस हे चित्र पालटेल, असं वाटायला लावणारी एक घटना घडते.