आवाज नावाचे नाटक

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आम्ही शाळेत होतो तेव्हा गॅदरिंग असायचं. शाळेतली मुलं करमणुकीचे कार्यक्रम (गाणं, नाटक, नाच) करायची. वरतून टांगलेले कित्येक वर्षं वापरात असलेले जुने मायक्रोफोन असायचे.

http://www.google.com/imgres?um=1&hl=en&client=firefox-a&tbo=d&rls=org.m...

६ मायक्रोफोनने अख्खा रंगमंच चालायचा. थेटर खूप मोठं असेल तर आठ. समुहगान असेल तर त्याच ठोकळ्या मायक्रोफोनसमोर मुंलमुली उभ्या रहायच्या. भाषण असेल तर हेडमास्तरांच्या समोर तोच एक ठोकळा उभा केला जायचा..
बरं शाळा/कॉलेज सगळी सरकारी. सरकार पगार देणार त्यावर मास्तरांचं पोट भरणार आणि मायक्रोफोन, कर्णे इत्यादी गोष्टी देणग्यांवर अवलंबून. म्हणून वाटतं की त्यावर खूप मोठा खर्च होत नसावा. माझ्या शाळेकडे चिरेबंदी चौथरा आणि त्या भोवती झापं (नारळाच्या विणलेल्या झावळ्या) बांधलेलं थेटर होतं. कॉलेजकडे तर तेही नव्हतं.. तरी...

एकामागोमाग एक नाटकं चालायची. पात्र बदलायची, प्रवेश बदलायचे पण Sound Test नामक प्रकार नसायचा. आपण बोलतो ते प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचतं हा विचारही कधी आला नाही. कुणी कधी मायक्रोफोनसमोर उभं राहून आवाज Test केला नाही, एकदा प्रयोग सुरू झाला की कुणाला बटनांशी झुंजताना पाहिलं नाही. पण थेटरात आवाज पोचत नाही म्हणून प्रेक्षक 'आवाज, आवाज..' म्हणून ओरडतोय हे कधी बघितलं नाही.... ३५/४० वर्षांपूर्वी...

असं म्हणतात की दर पाच वर्षानी Technology इतकी बदलते की नवीन उपकरणं किमतीला अर्धी आणि सुविधांच्या बाबतीत दुप्पट चांगली होतात (Half the price and double the capacity). या न्यायाने आज एक साधा मायक्रोफोन पूर्ण स्टेजला पुरायला हवा. पण ते होत नाही. १०/१५ मायक्रोफोन, sound test, sound Engineers काय काय म्हणून करा. प्रेक्षक आवाज, आवाज म्हणून ओरडताना दिसतो. स्टेजवरचे कलाकार आपला जीव अभिनयात ओतत असतील तरी समोर बसलेल्या प्रेक्षकाला काही ऐकूच येत नाही. आणि हा अनुभव एका-दुसर्‍या नाटकाबद्दल नाही. गेल्या पाच वर्षात बघितलेल्या ९०% नाटकांचा आहे. हे का होतं. कुणी sound वाला सांगेल का मला...?

प्रकार: 

"आवाजी" नट राहिले नाहीत हेच खरे, नारायणरावांचा आवाज कसा, पिटातल्या प्रेक्षकांपर्यत पोहोचायचा, तोही माईकशिवाय Happy

मी साउंड इंजिनियर वगैरे नाही पण मला काही शक्यता वाटतायत ज्या ठार चुकीच्याही असू शकतात....

१. हे माइक्स अति सेन्सिटीव्ह असल्याने त्यांचा इनपुट/ आउटपुट वाढवला तर कर्णकर्कश्श शिट्ट्या ऐकू येऊ शकतात. त्या टाळण्यासाठी तीव्रता गरजेपेक्षा कमी ठेवायची सेफ बेट म्हणून असे केले जात असू शकते.

२. साउंड मॉनिटर्स वेगळ्या सेटींगवर आणि स्पीकर्स वेगळ्या. जेणेकरून नटाला आपला आवाज खणखणीत ऐकू जातोय असे वाटावे किंवा वाढवल्यास कर्कश्श होतोय असे वाटावे.

३. माईक्स आहेत पण थिएटरचे अकूस्टीक्स... त्याचे काय? स्पीकर्सच्या दिशा, भिंतींना वापरलेले मटेरियल, भिंतींमधे आवाज शोषला जाणे/ न जाणे, जागेची उंची-रूंदी आणि स्पीकर्सची संख्या-क्षमता यांचे चुकलेले गणित.

४. सेन्सिटीव्ह माइक्स असल्याने, रेकॉर्डिंग स्टुडिओची सवय असल्याने आवाजाचे प्रोजेक्शन वापरायची नटांना सवय नसणे

५. बिनामाइकच्या स्टेजची सवय असलेला नट अचानक सेन्सिटीव्ह माइक्समुळे गडबडून जाऊन प्रोजेक्शनचे घोळ घालणे

६. देव जाणे Wink

आवाजी नट राह्यले नाहीत याला फार म्हणजे फारच मर्यादित अर्थ आहे. मोठ्ठ्या आवाजात नुसती पल्लेदार वाक्ये म्हटली जाणे यापेक्षा नाटकाची शैली बरीच पुढे गेलीये. सटलिटी, कॉम्प्लिकेटेड इमोशन्स इत्यादींना पूर्वीच्या नाटकांमधे स्थान नव्हते जे आता आहे.