ज्येष्ठ साहित्यीक, नाटककार , पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.
त्याना विनम्र श्रद्धांजली.
बृहन महाराष्ट्रमंडळातर्फे Talent Transfer योजनेखाली यावर्षी एकांकिका स्पर्धा घेतल्या गेल्या. न्यूजर्सीच्या Theartrix या संस्थेने सादर केलेल्या 'मनोमीलन' या एकांकिकेला पहिलं पारितोषिक मिळालं, आणि त्या एकांकिकेच्या दिग्दर्शिका 'सौ. विदुला मुणगेकर' यांनाही दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. न्यूजर्सीमध्ये येण्यापूर्वी विदुला भारतात नाट्यचित्रपट कार्यरत होत्या. व्यवसायाने Occupational Therapist पण मनाने नाटकात वावरणार्या या कलाकाराला भेटायचं ठरवलं.
मी: तुमच्या नाट्यप्रवासाची सुरूवात कशी झाली? म्हणजे लहानपणची आवड....