नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिन्दी नाटक "बेड के नीचे रहनेवाली.." मोहित टाकळकरचे direction .
सुदर्शनला प्रयोग होत आहेत.जमले तर नक्कि बघा.जाहिरात जरी लहान मुलान्साठी अशी केले असली तरी परी,चेटकीण,असे काही नाही आहे. ९ or १०+ (ह्यात मोठेही आले) वयोगटासठी जास्त योग्य आहे,अर्थात त्याहुन लहान मुलेही enjoy करू शकतील, कारण अधुनमधुन गाणी नाच सगळे आहे.
पुर्ण कथा सान्गणे टाळते (कारण मला नीट सान्गता येइल की नाही ह्याबद्दल शन्का आहे), बघण्यात मजा आहे.
अगदीच वरवर सान्गायचे झाले तर teenage मधे entry करणार्‍या मुलीचे भावविश्व असेच कहीतरी सान्गता येइल

अजिबात काही सांगू नकोस.. पहाणंच मस्ट आहे. मस्त नाटक आहे

कुणी मन्नो मरजानी हे हिमानीचे नाटक पाहिले आहे का?

अरे वा, बेड के नीचे रहने वाली ची चर्चा चालूय! सही! त्यात माझ्या मैत्रीणीचा भाऊ काम करतो.. आलोक राजवाडे.. Happy

वर गमभनची चर्चा चालु होती!! मी अभिमानाने सान्गु इच्छिते की, हे सगळे कलाकार आमच्या रुईयाचे विद्यार्थी आहेत. आणि त्यातिल २-३ पात्रे माझे विद्यार्थी आहेत. :अभिमानी बाहुली:

दिनेश, Happy

    काल मस्त पावसाळी वातावरणात सकाळी पेपर उघडून पाहीला आणि 'गमभन' ची जाहीरात दिसली. लगेच कोथरूडच्या मैत्रिणीला तिकिटं काढायला सांगितली...
    नाटक खरोखरी खूप सुंदर वठवलं आहे, अभिनय सर्वांचाच उत्तम आहे. पण जोश्यापेक्षाही सुर्‍या मला सर्वात जास्त भावला, पाठोपाठ शिरोडकर. ती म्हणजे अक्षरश: शाळकरी मुलगी दिसते, वेणीला हात लावत, मागेपुढे पहात संवाद म्हणणं, मनातली चलबिचल चेहर्‍यावर दाखवणं तिला झकास जमून गेलंय... जोश्याची भूमिका करणारा मुलगा स्टेजवर काही सहजगत्या वावरत नव्हता... एखाद्या adult नाटकात भूमिका करतोय असंच वाटलं. फावड्या प्रत्येक एंट्रीला मला सिद्धार्थ जाधवची आठवण देऊन गेला... जर या ४ मेजर पात्रांचा सिक्वेन्स लावायचा ठरवला तर अभिनय क्र. १, सुर्‍या, २ शिरोडकर, ३ फावड्या, ४ चित्र्या, ५ बेंद्रे बाई, ६ मुकुंदाचे वडील.... बाकी सर्व मागेपुढे, आणि मामाची भुमिका करणारा... शेवट.... बाकिच्या पात्रांचे संवाद सहज आणि स्वाभाविक तर याचे मुद्दम पाठ करून आल्यासारखे... Sad
    हेमंत महाजन यांनी घटनाक्रम, त्यांची मांडणी, त्यानुसार संवादांची रचना... सगळं अगदी चपखल बसवलंय... तरिही नाटक संपल्यावर.. ३/४ टाळकी, "नाटकाला काही पुस्तकाची सर नाही बुवा..." असं म्हणताना आढळली.. मला त्यांना जोरात ओरडून सांगावसं वाटलं अहो ते नाटक आहे, ३ तासात काय काय दाखवणार? शेवटी नाटक आणि पुस्तक यात काहीतरी फरक असतोच की. आणि तसंही पुस्तकातल्या सर्वच गोष्टी नाटकात दाखवणं तसं मुश्किल आहे. पुस्तकाची आणि नाटकाची मजा ज्या त्या ठिकाणी... नाही म्हटलं तरिही लिखाणावरून सादरीकरण करताना काही बंधनं पाळावीच लागतात. जसं की दिनेशनी वर लिहीलंय की नाटकात बर्‍याच गाळलेल्या जागा आहेत, ज्यांनी पुस्तक वाचलंय तेच सुजाण प्रेक्षक फक्त त्या भरू शकतात. जर का सगळ्या गोष्टींचा समावेश नाटकात केला तर लोक पुस्तकं वाचणारच नाहीत..... असो.....
    वेशभूषा तशी मला ठिक वाटली, पण मंदिराचं एक दृश्य सोडलं तर... बाकी सगळी ठिकाणं स्टेजवर वठवणं जमलं नाहीए. पण एकूण जे लोक या पुस्तकाच्या प्रेमात आहेत, त्यांना याचा काहीही फरक पडणार नाही... ते या नाटकाच्या प्रेमात पण निशंक पडतीलच. Happy

'बेड के नीचे' चं परीक्षण मीही सकाळमध्ये वाचलं; त्यावरून त्याबद्दल कुतूहल वाटतंय.
'संगीत नवा बकरा' कोणी पाहिलं का? 'इ-सकाळ'मध्ये मी त्याबद्दल माहिती आणि त्याची संक्षिप्त व्हिडिओ क्लिपदेखील पाहिली. कोणी ते नाटक पाहिलं तर परीक्षण लिहा.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

'संगीत नवा बकरा' ,MIT ने (बाहेरच्या लोकाना पैसे देउन)पुरुषोत्तमला बसवलेले नाटक आहे.(आणि हे म्हणे विद्यार्थ्यान्चे गुण दर्शन!!!) दुसरा क्रमान्क मिळाला होता त्याना.आता कलाकार वेगळे असतील कदाचीत.
तेव्हा पाहिले होते.बरे वाटले होते.पण खुप महान असे काही नाही आहे.
ठकास महाठक भेटल्यावर काय घडते ते गाणी ऐकत बघायला मिळते.
सगळे नाटक पद्यात आहे.नाटकाचे सादरीकरण छान आहे. म्हणजे सर्व पात्रान्च्या अभिनयाबरोबर , लयबध्द आणि वेगवान हालचाली आणि सगळ्यान्चे co-ordination बघायला मजा येते.
वेगळा प्रयोग म्हणुन बघायला हरकत नाही.
सन्गीत नाटक अशी जाहिरात अशी असली तरी जुन्या काळच्या सन्गीत नाटकासारखे नाही.

रमणी
जर त्या कलाकारांशी अजून संपर्क असेल तर त्याना आमची पसंती अवश्य कळवा.
तसेच हि मूले, याच वयाची असताना या नाटकाचे चित्रीकरण व्हायला हवे हे पण सांगा.
दक्षिणा, शिरोडकर ला यापुढेही चांगल्या भुमिका मिळायला हव्यात, नाही ?
ती त्या भुमिकेपेक्षा वेगळी कुणी वाटतच नाही. आणि पुस्तकातल्या शिरोडकरशी खुपच मिळतीजुळती आहे ती.

दिनेश, एकदम मनातलं बोललात. पण ती मुलगी शिरोडकर म्हणून मनात इतकी फिट्ट बसलीए, की
तिला इतर भूमिकांत पाहणं कदाचित आपल्याला आवडणारंच नाही.
त्याचबरोबर सुर्‍याला ही अधिकाधिक भूमिका मिळायला हव्यात. Happy

प्रशान्त दामले चे नविन नाटक "ओळख ना पाळख" बददल काहि प्रतिक्रिया आहेत का ?

नमस्कार
मी विनय ! नवीन मायबोलिकर
"ओळख ना पाळख"मी पाहिल, मला प्रशान्त दामले फार आवडतो, त्याच timing भन्नाट आहे.पण मला शेवट नाही आवडला.त्यामुळे कदाचित काहिच नाही आवडल.कदाचीत मी फार अपेक्शा ठेवून होतो ! प्र.दा.कडून

कृपया...मला कोणितरी पु.लंच्या 'ती फुलराणी' मधील मंजुचे ते सुप्रसिद्ध स्वगतचे स्क्रिप्ट ( "तुला शिकविन चांगला धडा") द्याल का? किंवा लिंक माहीत असेल तर ती द्या प्लिज....!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

असेही एक नाटक

NYC मधील एका german माणसाने एक नाटकाचा नविन प्रकार सुरु केला आहे.

Theater over the phone

तुम्ही तिकीट घेवुन रुम मधे जाता, गेल्या गेल्या एक फोन येईल, ज्यावरुन फोन च्या दुसर्‍या बाजुवरील माणूस तुमची करमणूक करेल.

http://video.nytimes.com/video/2009/01/14/arts/1231545238054/urbaneye-th...

लोगोको पैसा दो...

हा बाफ इतके दिवस ओस का पडलेला Sad
.
तीच ती विनोदी नाटक पाहुन कंटाळा येतोय. बहुदा आता ' संतोष पवार ' ह्या नावाची ऍलर्जी होणार अस दिसतय. Sad

चेहरा मोहरा पाहील. नाही आवडल.
.
त्या एका वळणावर पाहील. पण ते नाटक आधी आलेल्या गिरीश जोशी लिखीत ' फायनल ड्राफ्ट' नाटकाची कॉपी वाटली Sad

येत्या रविवारी 'व्हाइट लिली आणि नाइट रायडर' चा प्रयोग आहे. बहुतेक तरी बघणारे!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नी तु ह्या वरच्या फोन नाटकातल्या पात्रांवर एक full to emotional नाटक काढु शकतेस...

ह्या ईथे थे ऑपरेटर लोक आपला exp post karataat http://call-cutta-in.blogspot.com/

आज बर्‍याच दिवसांनी एक चांगल नाटक बघीतल संगीत सन्यस्थ ज्वालामुखी.
.
आवडलेले प्रसंग
१) शिकागो मधील सर्व धर्मपरीषदेतील स्वामीजींच भाषण (मागे बर्‍याच वर्षांपूर्वी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर ह्यांनी त्यांच्या रसाळ वाणीने हा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला होता त्याची आठवण झाली )
२) छोट्या नरेंद्र मोठा झालेल दाखवण. आपल्या बाल्याला निरोप देण
३) नाटकाची सुरूवात : बर्फ वॄष्टीला ' आभाळ जमिनीवर आलय' अस म्हणण आणि त्याच वेळी स्वामीजी पाठमोरे दाखवण
४) स्वामीजींनी आपल्या वडिलांच्या मृत्युकडे त्रयस्थ पणे पहाण
५) रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पत्नीची (शारदादेवी ) ह्यांची 'देवी' म्हणून घातलेली पूजा
.
खटकणार्‍या जागा :
१) छोटे छोटे प्रसंग आणि संवाद असल्यामूळे वारंवार रंगभूमीवर होणारा अंधार
२) स्वामीजी आणि लोकमान्य टिळकांच्या भेटीचा प्रसंग तितकासा जमला नाहीये.
.
पण बर्‍याच दिवसांनी / वर्षांनी एक सुंदर नाटक बघीतल्याचा अनूभव प्राप्त झाला. आवर्जून बघाव अस नाटक.
Happy
(समीक्षा करण्याची माझी कुवत नाही. चु भू द्या घ्या )

शनिवारी 'व्हाईट लिली अँड नाईट राईडर' बघितलं. मस्त आहे.
लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अतिशय उत्कृष्ट. रसिका जोशी यांचा अभिनय तर दीर्घकाळ लक्षात राहील असा..

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

या वीकान्त ला मी 'अधांतर' हे नाटक पाहिले...

खूपच अप्रतिम आहे हे नाटक.... सगळ्यान्ची कामे अफलातून झाली आहेत..
त्यातल्या त्यात, भरत जाधव, आणि ज्योती सुभाष ह्यान्ची कामे खूपच सुरेख!!..

फक्त त्यामधे नाटकाचा शेवट फारसा रुचला नाही...कुठेतरी अर्धवट असल्या सारखे वाटते..कुणी पाहिले आहे का??

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

शनिवारी 'व्हाईट लिली अँड नाईट राईडर' बघितलं. सुरेख नाटक. खुपच आवडल.
लेखन, दिग्द, नेपथ्य आणि अभिनय - रसिका जोशी, मिलींद फाटक.

केदार, अधांतर नाटकाबद्दल मी पुर्वी लिहिले होते. मी बघितलेल्या प्रयोगात, संजय जाधव, राजन भिसे, लिना भागवत आणि सविता मालपेकर पण होत्या.
शेवट योग्यच आहे की !!!

आपली मराठी वर "विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन" हे अगाथा ख्रिस्ती च्या कथे वर आधारीत नाटक पाहिले. ठीक ठीक आहे. रहस्य नाटकांच्या चाहत्यांसाठी चांगले आहे.

'व्हाईट लिली अँड नाईट राईडर' / "विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन" >>> हि दोन नाटकं मराठी आहेत का इंग्रजी??

दिनेश, मला हे नाटक लाइव्ह बघता नाही आले Sad ....पण आपली मराठी साइट वर पाहिले...त्यात तुम्ही सांगितलेलेच सर्व कलाकार आहेत...याच्या बद्दल आधी चर्चा झाली असेल तर..मला काही कल्पना नाही...पण नाटक खूप छान आहे..

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

मी पाह्यलेय अधांतर फार्फार पूर्वी..
प्रचंड आवडलं होतं तेव्हा.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

केदार,
१९८२ मधला जो गिरण्यांचा संप झाला, त्यावर आधारीत हे नाटक होते. या संपाने संपुर्ण गिरणगाव भरडले गेले होते. त्या काळात तिथे मराठी संस्कृती शिखरावर होती. पण या संपामुळे प्रचंड बेकारी आली आणि तिथला मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. तरुण पिढी गुन्हेगारीच्या मार्गाने गेली. हा काळ ( आणि त्यापुर्वीचा वैभवाचा काळ ) दोन्ही मी बघितले आहेत. त्यामुळे मला हे नाटक फारच आवडले होते.
ज्योति सुभाष, यांची प्रमुख भुमिका. इतर कलाकार त्याही काळात नावाजलेले होते, तरीही या नाटकात त्यानी दुय्यम भुमिका केल्या होत्या.

Pages