नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सासू माझी ढासू' हे प्रशांत दामले आणि रिमाचं नवं करकरीत नाटक पहाण्याचा काल योग आला. बालगंधर्व दुपारी साडे बारा वाजता हाऊसफूल झालं होतं त्यामूळे नाटककडून अपेक्षा फारच वाढल्या.

प्रशांत दामले यांची 'श्री तशी सौ', 'ओळख ना पाळख' 'बहुरुपी' ही नाटकं आधी पाहिली असल्यानं तशाही अपेक्षा होत्याच. त्यानुसार विनोदी नाटकाच्या किमान अपेक्षा पुर्ण करण्यात नाटक यशस्वी होतं. रिमाचा रंगभूमीवरचा प्रसन्न वावर आणि प्रशांतचा नेहमीचाच विश्वासपूर्ण वावर यामुळे नाटक कंटाळवाणं होत नसलं तरी खळखळून हसवण्यात कुठंतरी कमी पडल्याची जाणीव नाटक पाहून बाहेर पडताना होत होती.

बरेचसे विनोद हे बर्‍यापैकी 'प्रेडीक्ट्बल' या सदरात मोडणारे होते. प्रशांतचं 'कॅलीबर' माहीत असल्यानं तो जरा हातचंच राखून वावरतोय की असं वाटत होतं. सहसा प्रशांतची नाटकं ही 'वन मॅन शो' असतात आणि या नाटकात इतर कलाकारांना वाव देण्याच्या नादात प्रशांतनं 'अंडरप्ले' केला असावा असं वाटत रहातं. बरं रिमा सोडून इतर कलाकार नुसतेच चित्रविचीत्र अंगविक्षेपालाच विनोदाचं साधन समजून 'विनोद' निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत रहातात. (बर्‍याचदा ते सहनशक्तीच्या पलीकडे जातं.)

रिमा बर्‍याच वर्षांनी रंगभूमीवर पुनःप्रवेशकर्ती झाली असली तरी एकंदरीत वावर पाहून तसे कुठेच जाणवत नाही.

एकूणात प्रशांत आणि रिमासाठी म्हणून फार अपेक्षा न ठेवता एकदा हे नाटक पहायला काही हरकत नाही.

प्रेमा तुझा रंग कसा पाहिलं. अशोक सराफ आणि जयंत सावरकर दोघांनी छान काम केलं आहे. चारुशीला साबळेंची आई अगदी खरी वाटली. बच्चू आणि सुशीलचं काम करणार्‍या कलाकारांचा अभिनयही सुरेख वाटला.

फक्त एमए च्या प्रोफेसरच्या घरात पुस्तकांच्या शेल्फवर Visual Basic चं पुस्तक का होतं काही कळलं नाही Uhoh

कोण म्हणतं टक्का दिला?

शनिवारी रात्री बालगंधर्व ला पाहिले.
उपेंद्र लिमये ह्या नाटकात आहे, हाच एक महत्वाचा फॅक्टर आहे, अन्यथा ३०० रु. चे तिकीट काढुन जाण्याएवढे खास नाही.
सरकारने केलेल्या कायद्यामुळे, प्रत्येक उच्चवर्णीयाने एका मागास जातीतील व्यक्तीला घरात ठेवायचे ठरते.
त्या अनुषंगाने घरात होणारे वादविवाद, काही माणसे बाजूने, काही विरोधात्.....आणि ब्राम्हण मुलीने, दलिताच्या प्रेमात पडणे वगैरे अपेक्षित गोष्टी आहेत.
उपेंद्र लिमये अर्थातच, दलिताच्या रोलमधे आहे. सुकन्या चा रोल करणारी मुलगी छान काम करते. बाकीचे कलाकार काही ठिकाणी हौशी वाटतात.
थीम चांगली आहे, पण अजुनही लेखन चांगले होऊ शकले असते. काही काही वाक्ये डोक्यावरुन जातात.

.

"सारे प्रवासी घडीचे " मोठ्या उत्सुक्ततेने पहायला गेलो पण जयवंत दळवींच्या पुस्तकाला न्याय मिळाल्यासारखं अजिबात नाही वाटलं. कथेचा कार्यकाळ जुना आहे एवढंच सांगायला सुरवातीला उगीचच १०-१५ मिनीटांचा अनावश्यक प्रकार ! नेपथ्य मात्र दाद देण्यासारखं.

"नवा गडी नवं राज्य" पाहिलं. अगदीच टुकार आहे. उथळ व अतार्तिक कथा, सुमार अभिनय, उथळ व अश्लील संवाद अशा अनेक गोष्टींमुळे नाटक वाईट झाले आहे. त्यातल्या त्यात प्रिया बापटचे काम बरे आहे. उमेश कामत, ज्ञानदा चेंबुरकर व समीर खांडेकर यांचे काम अगदीच सुमार आहे. जेव्हा नाटक गंभीर अंगाने जाईल असं वाटायला लागतं, त्याचवेळी एखादा कलाकार फालतू पीजे मारून गांभीर्याची वाट लावतो. आणि जेव्हा नाटक विनोदी अंगाने जायला लागतं, तेव्हा अचानक गंभीर प्रसंग सुरू होतो.

प्रिया बापटचे काम बरे आहे. >>> खूपच बालिश वाटते. तिकडे सारेगमप मध्ये निवेदन करतानाही तेच करायची! थोडा वेळ करमणुक म्हणून बरे वाटले नाटक मला तरी.

शेवटचा गच्चीचे दार आतून उघडले जाते तो प्रसंग परीणामकारक वाटला. थोडक्यात कुठलाही गुंता सोडवताना बाहेरून (नुसतेच परीघावर बसून) सोडवण्यापेक्षा आतून सोडवला तर लवकर व यशस्वीरीत्या आणि हलकेच सुटतो (तुझे आहे तुजपाशी) असे काहीसे दाखविण्याचा प्रयत्न वाटला. आणि तो बर्‍यापैकी जमलाय असं मलातरी वाटलं.

मी नथुराम गोडसे बोलतोय यु त्युबवर पाहिलं.... फालतू नाटक आहे.... ५५ कोटींच्या घटनेनंतर नथुराम खून करायचा ठरवतो, इथुन नाटक सुरु होते.... मग त्याआधी नथुरामानं गांधीना मारायचे २-३ प्रयत्न का केले होते हे मात्र नाटकात कुठेही येत नाही..... तद्दन प्रचारकी नाटक. हल्ली याचे प्रयोग होतात का?

यु त्युबवरच डॉ. आंबेडकर आणि गांधीजी हेही मराठी नाटक आहे. चांगले वाटले.

Documentary Theater हा प्रकार आज पाहिला. साधारण पथनाट्यछाप विथ चकाचक मल्टिमिडीया aids असे स्वरुप होते.
http://en.wikipedia.org/wiki/Documentary_theatre

http://seventheplay.com/home.html
छान प्रयोग होता. कुठे मिळाले तर चुकवू नका. उलट आपल्या कार्यालयात हे कसे करवता येईल ते पहा.
A collaboration by seven award-winning female playwrights, the play is based on personal interviews with seven women in the Vital Voices Global Leadership Network who have triumphed over enormous obstacles to bring about major changes in their home countries of Russia, Pakistan, Nigeria, Northern Ireland, Afghanistan, Guatemala, and Cambodia

दुव्यावर बरीच माहिती आहे, तेच पुन्हा लिहीत नाही. प्रयोग खूप छान झाला. संहिता, दिग्दर्शन, नटीसंच सगळेच चांगले होते. सात खुर्च्यांचे नेपथ्थ्य, थोडे साउंडइफेक्टस आणि थोडेसे पार्श्वसंगीत बास. दुसर्‍या एका कार्यालयात होता. पहायला गेले होते.

प्रेक्षक म्हणुन आपल्याला अस्वस्थ करतो प्रयोग. दुसरे, जात, धर्म, देशाच्या पलिकडे स्त्रियांच्या लढ्याकडे पहायला मजबुर करतो. काळीज चिरत जातात काही संवाद. संहिता सुद्धा मस्तय. तुकड्यातुकड्यात प्रत्येक बाईच्या कहाणीकडे लक्ष वेधते, पण सलग नाही, हं चला एकीची गोष्ट, मग दुसरीची असे सरधोपट आणि सोपेही नाही. भाषा इंग्रजी पण प्रत्येक पात्राच्या संस्कृतीतील इंग्रजी. प्रत्येकीचा लहेजा वेगळा.

त्यानंतर एक परिसंवादही होता. बरा होता तोही.

'सुखांशी भांडतो आम्ही' पाहिलं. मस्त वाटलं. डॉ. गिरिश ओक आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. प्रख्यात मानसशास्त्र डॉक्टर, (ओक) आपल्या नव्या हॉस्पिटलच्या उभारणीत व्यस्त असताना खुनाचा आरोप असणारा सदू (चिन्मय) त्यांच्याकडे उपचाराला येतो.
या वेड्या दिसणार्‍या , वागणार्‍या सदूचे विचार मात्र शहाण्या माणसासारखे असतात किंबहुना जास्त स्पष्ट असतात. त्याच्यावर उपचार करता करता डॉक्टरांना स्वत: कोण होतो आणि या स्पर्धेच्या जगात काय बनलो आहोत याचा शोध लागत जातो.

गिरिश ओक आणि चिन्मय मांडलेकर यांच काम मस्तच. चिन्मयने वापरलेली देहबोली नाटकात परिमाणकारक वाटली. संवाद पण मस्तच. नक्की पहावे असे वाटले हे नाटक.

हो सामी तेच ते, आणि मूळात तेही, व्हेरोनिकाज रुम वर आधारीत आहे. सस्पेन्स पेक्षा, थ्रिलर आहे, पण हा रहस्यभेद आपल्याकडे जरा विचित्र वाटेल, असा आहे.

अरेच्च्या! हा धागा चक्क चक्क मला आजपर्यंत माहितीच नव्हता !!
असो.

'गांधी आडवा येतो' पाहिलं. शफाअत खान यांची लेखनशैली कशी आहे याची थोडीफार कल्पना असल्यामुळे नाटक आवडलं. संवादांमधे आणि कथानकात सूचकता खूप आहे. त्यामुळे संवाद अगदी लक्षपूर्वक ऐकावे लागतात. नाटकाच्या शीर्षकावरून बर्‍याच मंडळींच्या निराळ्या अपेक्षा होत असाव्यात. त्यामुळे पहिला अंक संपल्यावर 'काय चाललंय काही कळतच नाहीये' अशी सामूहिक प्रतिक्रिया कानावर पडली. (खानपानासाठी बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांची वाक्यं ओझरती कानावर पडत होती, त्यावरून) 'चल, घरी जाऊ या' असंही एक वाक्य त्यात होतं.
उमेश कामत त्याच्या चिकण्या-चुपड्या रुपामुळे गुंड म्हणून फारसा शोभत नाही. पण त्यानं काम छान केलंय. इतरांचाही अभिनय चांगला आहे.

थँक्स ललिता या अपडेटसाठी. सध्या पुण्यातही बरेच प्रयोग लागत आहेत या नाटकाचे, पण वेळ जमत नाहीये Sad पण नाटक बघायचेच आहे.

अरेरे हा बाफ उगाच मिसला!
हा बाफ आता पाहुन वाटतय केवळ या बाफासाठी माबो अनेक वर्ष आधी जॉईन करायला हवी होती...
पहिल्या पानावर गमभनची चर्चा आहे...
कोणाला त्यातले कलाकार आठवतायेत का?
त्याकाळच्या गमभनची कॉपी आहे का कोणाकडे?
मला स्वतःला "शाळा" अजिबात आवडला नाही. मी कुठल्याश्या कॉलेजच्या स्पर्धेत सादर केलेलं हे नाटक पाहिलं होतं... ते ऑसम होतं.... त्यापुढे मला सिनेमा खरच फार बोअर वाटलेला...

खरच... गमभन बद्दल बरच ऐकलय.... शूट झालय का हे नाटक?
लिंक द्या ना कुणाकडे असल्यास!

स्वरुप मी पुन्हा बघितलं..........चालतेय व्यवस्थित.
तू सुद्धा पुन्हा बघ.

काल फेबुवर 'एका लग्नाची गोष्ट' परत येतय असं कुणीतरी शेयर केलं होतं. प्रशांत दामले आणि कविता मेढेकर (लाड? फोटोत तरी तशीच दिसते आहे) यांचा फोटो होता. 'शिळ्या कढीला ऊत' असाच विचार मनात आला ते बघितल्यावर..... प्रशांत दामलेचे तेच तेच बघुन कंटाळा नाही का येत त्याच्या 'या वयात'?

काट्कोन त्रिकोण हे नाटक (मोहन आगशे) पाहिले. श्री आगशे जरि व्रुध्ध झले असले तरि अभिनयाचा दर्जा जणवत रहातो.
विषय खूप चर्चिलेला आहे. सादरिकरण अजून चन्गले हवे होते असे वाटले.

"व्हाईट लिली आणि नाईट रायडर"- सोनाली कुलकर्णी चे काल पाहिले. आवडले. सोनालीने मस्त काम केले आहे. तिच्या नेहमीच्या गंभीर, शांत भुमिकांपेक्षा वेगळी भुमिका!
पहिला अंक संपला, तेव्हा मनात आले, मिलिंद फाटकना रसिका जोशीची आठवण येत असणार काम करताना....:-(

लागोपाठ नाटके पहाण्याचा योग आला.
"गेट वेल सून" पाहिले. काहीना आवडेल, काहीना नाही, असे आहे. थोडे वैचारिक आहे. मला आवडले.
पहिल्या अंकात थोडे रटाळ होतेय असे वाटले, पण नंतर गती पकडली. अजून नवीनच आहे, तेव्हा अधिक लोकानी पाहिले कि बोलता येईल!
स्व. जो. नी चांगले काम केलेय. पहिलाच प्रयोग असल्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी वेगवेगळ्या दारांशी उभे राहून प्रेक्षकांचा आणि एकंदरीत प्रयोगाचा अंदाज घेत होते. Happy

Pages