नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळू जोशी, माहितीबद्द्ल खूप आभार!

>>पण २५ म्हणजे खुपच कमी प्रयोग होतात.

अगदी,अगदी. निदान ५० तरी करायलाच हवेत. हमिदाबाईची कोठी"अनिल बर्वे च आहे, जाहिरातीत वाचलं. मंजूडी, प्रयोग कसा वाटला पोस्टणार ना?

अरे, आता तर जास्तच उत्सुकता आहे त्या नाटकाबद्दल. बाळूंनी लिहिल्याप्रमाणे प्रसंग फार थोडे, पण व्यक्ती मात्र इरसाल. त्या तशाच सादर झाल्या पाहिजेत.

हमिदाबाईची कोठी पण परत येतेय का ?
यातले कलाकार कोण होते माहितेय ?
विजया मेहता, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी आणि अशोक सराफ.
सर्वच कलाकार त्या त्या भुमिकेत फिट्ट, भारतीने गायन पण केले होते त्यात.
याचे दूरदर्शन रुपांतर पण विजयाबाईंनीच सादर केले होते.

काल ह्यावर लिहिलं आणि संध्याकाळी लोकसत्तात ह्यावर एक लेख वाचला.

नाटक.. बदललेल्या तळकोकणाचं!

हे ना.धों.महानोर ह्यांच्या अजिंठाबद्दल - काहीतरी नक्कीच आणलंय..

दळवींच्या 'सारे प्रवासी..' चे नाटक करताना अस्सल कोकणी कलाकारांची गरज आहे.
उगाच ओढून ताणून मराठी कलाकारांना बसवलं नाही म्हणजे मिळवलं. 'मालवणी डेज' बघताना देखील बरेच कलाकार 'मालवणी' बाज माहीत नसणारे वाटले. म्हणून.. Happy

मालवणी डेज मधे कुणी संगमेश्वरी तर कुणी रत्नागिरीतली कुणबी भाषा तर कुणी रायगडातल्या आदिवासींची भाषा बोलायचे. काही अर्थ नव्हता.
मालवणी म्हणजे केवळ शिव्या असं गणित असल्यापुरती मालवणी यायची. एक एपिसोड बघून कंटाळा आला होता. पण इथे तसं होईल असं वाटत नाही.
शफाअत खान सारखं महत्वाचं नाव आहे.

'सारे प्रवासी घडीचे' पाहिलं. आवडलं.
नाटकाची सुरूवात 'प्रभुपदास नमित दास' या नांदीने होते. त्यानंतरचा शंकासूर आणि सुत्रधारामधला संवाद 'ही कथा ५०-६० वर्षांपुर्वीची आहे, कोकणातली आहे' वगैरे पार्श्वभूमी तयार करतो.
आबाशेठचा मुलगा आपू शहरातून गावात येतो आणि भूत बनून राहिलेला त्यांच्याकडचा हरकाम्या 'शंकर्‍या' त्याला गावचे एकेक संदर्भ पुरवतो. आणि आपूच्या आठवणींतून आपल्यापुढे नाटक उभं राहतं. आबाशेठ आणि बाबुलीमधलं वैर आणि नरूची दुर्दैवी कहाणी अशा दोन समांतर कथारेषांमधून नाटक पुढे सरकतं. आबाशेठ आणि बाबुलीचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रसंग आणि नरूला शाळकरी वयातच उमगलेली जगरीत प्रेक्षकांपुढे सादर करण्यात लेखक शफाअत खान बर्‍यापैकी यशस्वी झालेत.
नाटकात अनेक प्रसंग असल्यामुळे पात्रयोजना पण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच नेपथ्यही खूपच आहे, 'सुयोग'चं नाटक आहे हे इथे आपल्याला दिसून येते. Happy पहिला प्रसंग संपता संपता दुसर्‍या प्रसंगातील नेपथ्याची विंगेत चालू असलेली तयारी अगदी सहज दिसत होती त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष विचलित होत होते.
अजित परबने संगित दिलंय. नरूचं काम करणारा नितीन जाधव लक्षात राहतो.
एकूणात कादंबरीचा पसारा दोन अंकी नाटकात मांडणे अशक्य आहे. तसंही 'जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर आधारीत...' अशीच ओळख प्रेक्षकांना करून दिली जाते. त्यामुळे एक स्वतंत्र नाटक आपल्याला बघायचंय हेच डोक्यात ठेवून गेलं तर नाटक आवडेल.

दळवी असते आणि त्यांनी मनावर घेतले असते, तर फार वेगळे नाटक झाले असते. पण हि कादंबरी रंगमंचावर आली, हेही नसे थोडके.

मंजूडी, पोस्टीबद्दल खूप धन्यवाद. ह्या नाटकांचे प्रयोग विकडेजला दुपारी का असतात? नोकरदार लोकांना कसं जमणार बघायला? Sad

‘हमिदाबाई..’ एक स्थित्यंतर!

"बॅरिस्टर" नंतर "मोरूची मावशी" येणार आहे.

खरे तर 'जयवंत दळवी " यानी कायमच स्वताच्या कादंबरीवर आधारीतच नाटक लिहीली. त्याना ते तन्त्र मस्त जमुन गेल होत. दळवी हयात नसल्याने शफायत खान ने हे नाटक लिहिले.पण त्यान्ची 'सारे प्रवासी घडीचे' कादंबरी तुफान गाजल्यामुळे त्यावरचे नाटक नक्की चालणार हा निर्मात्याचा होरा. आणि तस तर सुयोग च्या सुधिर भटानी अत्रे ची जुनी गाजलेली नाटक रंगमंचावर आणुनच त्यान्च्या नाट्यनिर्मीतीचा " श्री गणेशा" केला. अत्रे यान्च " ब्रम्हचारी" नाटक सुयोग च पहिल नाटक.

"हमिदाबाई" ओरीजनल नाटकातल " विजयाबाई च काम नीना करणार अस दिसतय. आणि "नीना" च काम "मनवा नाईक" मीना नाईक ची मुलगी अस पोस्टर वरुन तरी वाटतय. अशोक सराफ च " जितेन्द्र जोशी", नानाच "सन्जय नार्वेकर" आणि भारती आचरेकरच " स्मिता ताम्बे" हा आपला माझा अन्दाज.

विजयाबाईंची पात्रयोजना इतकी चपखल असायची, कि नव्या कलाकारांना तो ठसा पुसण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल. अर्थात वरच्या लेखात लिहिल्याप्रमाणे, ते विश्व आता आपल्यासाठी अपरिचित राहिले नाही. त्यामूळे नाटक पुर्वीसारखे अंगावर यायचे नाही, असे वाटते.
मला आठवतय, त्या काळात हिट अँड हॉट नाटकांची लाट होती. ज्यावेळी या नाटकाच्या जाहिराती यायला लागल्या, त्यावेळी "बाईंनीपण असे नाटक करावे का ?" असा सूर निघाला होता.

" Many Happy Returns " हे नाटक कुणी बघितलंय का ? त्याबद्दल लवकरात लवकर माहिती हवीये.

हमिदाबाईची कोठीचा प्रयोग पुण्यात कधी आहे माहित्ये काय? आणि वाहतो हि दुर्वांची जुडी जुन्या संचात कुणाकडे आहे का?

नवा गडी नवं राज्य -- एक खुसखुशीत नाट्क

काल "नवा गडी नवं राज्य" हे नाटक बघितलं. त्याच हे परी़क्षण......

कलाकारः- उमेश कामत, प्रिया बापट, हेमन्त ढोमे आणी गिरिजा दातार.

पडदा वर जातो आणी नउवारी वर rain coat नेसलेली अम्रुता (प्रिया बापट) रंगमंचावर येते. तिच्याकडे पाहता पाहता आपलं लक्ष जातं ते SET कडे. अतिशय सुरेख असणारा सेट आणी त्याहुन सुरेख दिसणारी अमु.

अमु: लहानपणीचं बालपण हरवल्यामुळे लग्नानंतर पण अगदी बालीश वागणारी, लहान लहान गोष्टींनी आनंदुन जाणारी एक तुफान मुलगी.

हॄषी :- अम्रुता पेक्षा ८ वर्ष मोठा असलेला आणी या जगात एक मावशी सोडली तर सोबत कुणीच नसलेला हुशार व यशस्वी तरुण.

हिम्मतरावः अम्रुताचा BEST मित्र. एक खुप हुशार आणी दिलखुलास व्यक्तिमत्त्व.

केतकी: हॄषीची ex. नातं तुटल्यावर हॄषीपासुन खुप दुर गेलेली पण नंतर परत त्याच्याच कंपनीत कामाला लागलेली एक mature वाटणारी मुलगी.

कथानकः- या नाटकाचं कथानक अगदी साधं आणी सरळ आहे. दोन भिन्न वातावरणातुन आलेले दोन जीव...... त्यांच लग्न....नवी नवलाई.....मुलाची मैत्रीण...... मुलीचा मित्र.....गैरसमज्....नात्यातला ताण...... तुटेपर्यंत ताणल्या गेलेली नाती......एकमेकांचा समजलेला भुतकाळ्........या प्रवासात एकमेकाना उलगडलेले ते दोघे......बालीशपणातुन प्रगल्भतेकडे प्रवास्........त्या दोघाना जवळ आणणारी एक घटना...... आणी सुखांत.

अतिशय साधं वाटत असलं तरी खुप प्रभावी मांडणी , अप्रतीम संवाद आणी सर्व कलाकारांचा जोरदार अभिनय या नाटकाच्या जमेच्या बाजु.

पोटभरुन हसवणारं, थोडसं रडवणार आणी खुपसं शिकवणारं हे नाटक...... कमीत कमी एकदा तरी बघायलाचं हवं.

नाटकातलं मला सर्वात जास्त आवडलेलं वाक्यः

" समोरच्याचे दोष त्याला न दाखवता त्या मागची कारणं शोधुन ते दोष सुधारणं यालाच तर समजुतदारपणा म्हणतात "

मुल्यांकनः ३.५ / ५

झी गौरव मधे ४ पुरस्कार विजेतं आणी मटा सन्मान मधे सर्वाधिक ८ नामांकन मिळवलेलं आणी सर्वोत्तम अभिनेत्री चा पुरस्कार आणी ५० प्रयोग पुर्ण केलेलं एक व्यावसायिक नाटक...............नवा गडी नवं राज्य.

खुप वर्षांपुर्वी, पुलंनी स्वतः दूरदर्शनवर वार्‍यावरची वरात सादर केले होते (ते त्यावेळी बघितलेल्या लोकांपैकी फारच थोडे इथे असतील.) ते परत कधी दाखवले होते का ते आठवत नाही.
त्याच भागावर एक नाटक आले होते आणि त्याची सिडी मी नुकतीच बघितली.
मूळ भागात, सव्तः पुलं, श्रीकांत मोघे, नीलम प्रभू, आशालता, सुनिला प्रधान, मीरा दाभोळकर होते. स्वतः पुलंबद्दल काय लिहायचे ? पण आशालता ने सादर केलेली, कडवेकर मामी, इतक्या वर्षानंतरही विसरलेलो नाही.
या सिडीत चंद्रकांत काळे आणि अरुण नलावडे आहेत. पुलंची भुमिका त्या दोघांनी वाटून घेतलीय. छान निखळ करमणूक आहे. या सिडीतला, दिल देके देखो, नाच मस्त आहे. अरुण आणि चंद्रकांत दोघांच्याही भुमिका मस्त वठल्यात. पण स्त्री कलाकारांचा खास प्रभाव नाही.

आशालता ची भुमिका बघितली नसेल, तर जास्त आनंद घेता येईल.

वार्‍यावरची वरात/रविवार सकाळची व्हिडीयो सिडी माझ्याकडे आहे. प्रत तितकीशी चांगली नाही पण बघायला छान वाटते. माझ्याकडे पुलंच्या 'वटवट' या कार्यम्रमाची ऑडीयो सिडी आहे. ऐकताना सारखी वार्‍यावरची वरात ची आठवण होते पण तोही कार्यक्रम छान आहे.

त्या काळात चित्रीकरणाचा दर्जा वाईट असे (त्या काळात तसे वाटत नसे) पण उत्तम नाटके सादर होत असत. ते चित्रीकरण जपले असते तर महत्वाचा दस्ताऐवज झाला असता तो.

बरीच जुनी नाटकं मुंबई दूरदर्शनाने चित्रीत केली होती. पण नंतर चित्रफितींचा तुटवडा निर्माण झाला, इंदिरा गांधींनी पैसा देणं बंद केला, आणि या नाटकांच्या चित्रफितींवर इतर कार्यक्रम चित्रीत केले गेले.

हो, त्यात अनेक संगीत नाटके पण होती. शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होते.
सई परांजपे, दया डोंगरे, दिलीप प्रभावळकर, आत्माराम भेंडे यांनी सादर केलेले "गजरा" होते.

दिनेशदा- पुलंचे वार्‍यावरची वरात युट्युब वर आहे.

चंद्रकांत काळे मला तु फा न आवडतात पण 'वार्‍यावरची वरात' मध्ये थोडेसे कमी वाटतात. पुलंच्या बॉडी लँग्वेज मध्ये एक प्रकारचा अंतर्बाह्य सरळ मिश्कील भाबडेपणा दिसायचा. तसेच त्यांचे गाण्यावरील प्रेम- 'उगीच का कांता' तील हरकती.. सगळेच अफलातून आहे.
काळ्यांच्या घार्‍या डोळ्यात तो भाबडेपणा शोभतही नाही, आणि ते पुरेसा आणुही शकत नाहीत (वै.मत).
'उगीच का' मध्येही तितकी मज्जा आली नाही, त्यामुळे मेरा दिल तो टुट गया.
मी तरी connect नाही होऊ शकले. पण तो उंच मुलगा (कडवेकर मामा ?..) चांगला आहे नवीन संचातला. गातोही छान.
ती सुचित्रा भागवत बरीये की मामी म्हणून नवीन संचात. Happy

Pages