समीप रंगमंच - प्रयोग - २
ह्ल्ली अनेकदा मला आपण पुण्यात रहात असल्याचा भास होतो. पुणेकर कलेच्या बाबतीत जरा 'elitist' असतात, तसेच बे एरियातही आता आढळुन येतं. निव्व्ळ मनोरंजना पेक्षा विचारंना चालना देणार्या कलाकृती इथल्या रसिकांना जास्त प्रीय असतात. 'कला' च्या 'समीप रंगमंच' चा दुसरा प्रयोग त्याच पठडीतला.
समीप रंगमंच म्हणजे 'theater-in-a-room'. कमीतकमी props/नेपथ्य वापरुन नाटके सादर करायची. त्यामुळे यात मोठे सेट्स, मेकप वगैरे फार काही
नसतं. थोड्क्यात, मैफिल का अंदाज आणि नाटकाचा बाज. अशा वातावरणात गेल्या शनिवारी, 'छुनेसे प्यार बढता है' आणि 'स्वामी', समीप रंगमंच च्या उपक्रामात 'कला' ने सादर केल्या.