Submitted by vaiddya on 6 April, 2010 - 05:35
ठिकाण/पत्ता:
प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, २५१, मनोदय, सहकारी गृहकूल संस्था, सहकार नगर क्र १, पुणे ४११००९
पी डी ए या पुण्यातील आद्य प्रायोगिक नाट्य-संस्थेचं दरवर्षी मे - जून महिन्यांमधे नाट्य-प्रशिक्षण शिबिर आयोजित होत असतं .
या वर्षी हे शिबिर १५ मे २०१० ते ६ जून २०१० या कालावधीत पुणे येथेच घेतलं जाणार आहे.
अत्यंत शिस्तबद्ध रितीने अत्यंत मह्त्वाचा नाट्य-विषयक संस्कार या शिबिरातून गेली १९ वर्षं सातत्याने पी डी ए इच्छुकांना देत आली आहे.
प्रदीप वैद्य, रुपाली भावे, आनंद चाबुकस्वार, अनिरुद्ध खुटवड अश्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन शिबिरार्थींना मिळतं.
शिबिरात वैयक्तिक मुलाखतीतूनच प्रवेश दिला जातो आणि निवड झाल्यानंतर शिबिरात १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असते.
अधिक माहितीसाठी प्रदीप वैद्य ९८२२०५९४२९ किंवा शशिकांत कुलकर्णी (०२०) २४२२७३५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
माहितीचा स्रोत:
पी डी ए कार्यालय
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद !
धन्यवाद !