'मनस्वी'
'मनस्वी' की तपस्वी
अंक असेल वेगळा
रंगबिरंगी अन् सुगंधी
सर्वां लाविल लळा
मनमोहक मोरपिसावर
पडे प्राजक्ताचा सडा
मुखपृष्ठ पाहुनि याचे
कुणीही होईल वेडा
अंक नव्हे गमतो मजला
हा काव्य फुलांचा मळा
सुगंध घेण्या मन आतुरले
मी झालो खरोखर खुळा
मनस्वीच्या अंकाला
करू मानाचा मुजरा
काव्यरसे रंगून गुंगून
होई दिवाळसण साजरा
केवळ 'संस्कृत भाषेविषयीचं प्रेम' ह्या कारणामुळे पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे काही माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि ठरवतात की 'काही तरी करायचंच' ! मग एक कल्पना समोर येते की सगळ्यांनी मिळून फर्ग्युसन महाविद्यालयाद्वारे आयोजित केल्या जाणार्या 'संस्कृत एकांकिका स्पर्धे'त भाग घ्यायचा. अर्थात्, स्पर्धा म्हणून नव्हे, तर केवळ आपल्यातलं संस्कृत 'जिवंत' रहावं म्हणून. ही कल्पना सगळ्यांनाच आवडते आणि स्पर्धेच्या आयोजकांकडूनही त्यांना संमती मिळते. मग काय, अशा संस्कृतवेड्या ७-८ जणांचा 'मनस्वी' नावाचा एक संघ तयार होतो.