केवळ 'संस्कृत भाषेविषयीचं प्रेम' ह्या कारणामुळे पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे काही माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि ठरवतात की 'काही तरी करायचंच' ! मग एक कल्पना समोर येते की सगळ्यांनी मिळून फर्ग्युसन महाविद्यालयाद्वारे आयोजित केल्या जाणार्या 'संस्कृत एकांकिका स्पर्धे'त भाग घ्यायचा. अर्थात्, स्पर्धा म्हणून नव्हे, तर केवळ आपल्यातलं संस्कृत 'जिवंत' रहावं म्हणून. ही कल्पना सगळ्यांनाच आवडते आणि स्पर्धेच्या आयोजकांकडूनही त्यांना संमती मिळते. मग काय, अशा संस्कृतवेड्या ७-८ जणांचा 'मनस्वी' नावाचा एक संघ तयार होतो.
२०१२ मधल्या स्पर्धेत 'चूक-भूल द्यावी घ्यावी' या नाटकाचं संस्कृत रूपांतरण करून नाटक प्रस्तुत केल्यानंतर ह्या वर्षीच्या स्पर्धेत अजून छान, वेगळं असं काही तरी आपण करू शकू हा आत्मविश्वास सगळ्याच 'मनस्वीं'च्या मनात होता. त्यामुळेच मराठीतल्या भाषिक विनोदांना संस्कृतात आणण्याचं अवघड काम करायचं ठरवून, श्रीनिवास भणगे लिखित 'शांतेचं कार्टं चालू आहे' या धमाल विनोदी नाटकाचं संस्कृत रूपांतरण 'मनस्वी'च्या सदस्यांनी केलं. काल (११ तारखेला) भरत नाट्य मंदिर इथे ही संस्कृत एकांकिका स्पर्धा झाली आणि तिथे 'मनस्वी' संघाने सादर केलेली 'विचक्षणोऽयं शान्तासूनु:' ही एकांकिका सगळ्यांच्याच कौतुकास पात्र ठरली.
मूळ मराठी नाटकाचं संस्कृतात भाषांतर (खरं तर रूपांतर) करण्याची अवघड जबाबदारी पेलली होती 'अमोघ प्रभुदेसाई' याने. पुणे विद्यापीठातून संस्कृत विषय घेऊन एम्. ए. केल्यानंतर अमोघ सध्या पी.एच्.डी करतोय. अमोघने केलेल्या नाटकाच्या भाषांतराचं एकांकिकेत रूपांतर आणि दिग्दर्शन करण्याची जबाबदारी प्रीतम जोशीने घेतली. प्रीतम सध्या सांगलीच्या पटवर्धन हायस्कूल इथे संस्कृत शिक्षक आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नाटकाच्या तालमीला सुरुवात झाली. तेव्हा प्रीतम शनिवार-रविवार सांगलीहून पुण्यास येत असे आणि सगळ्यांकडून तालीम करवून घेत असे. नाटकातली मुख्य भूमिका- अर्थात 'शाम्या' साकारला होता 'आनंद शुक्ल'ने. आनंद सध्या जर्मन लँग्वेज स्पेशालिस्ट म्हणून एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतोय. त्याच्या पत्नीने 'रेणुकाने' कजाग शांतेचं पात्र उत्तम वठवलं. मूळ नाटकातल्या सुधीर जोशींच्या भूमिकेत होता 'अधीश गबाले' तर 'दया करमरकर'च्या भूमिकेत होती अधीशची पत्नी 'प्रिया'. हे दोघेही संस्कृत भाषा न शिकलेले असे. अधीश 'सी.डब्लू.ए.' आहे आणि ९१.१ रेडिओ सिटीचा आर्. जे. ही आहे.
प्रिया जर्मन लँग्वेज अॅनालिस्ट आहे. या दोघांनीही खूप सफाईने नाटकातले संस्कृत संवाद म्हटले. या नाटकानंतर अधीशला संस्कृत-सम्भाषण शिकायची तीव्र इच्छा झाली आहे, हे 'मनस्वी' चं यशच म्हणावे लागेल. नाटकातल्या काकासाहेबांची भूमिका केली होती 'ओंकार जोशी'ने. ओंकार जोशी सध्या 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप' मिळवून पुणे विद्यापीठातून पी. एच्. डी. करतोय.
मूळ नाटकातली 'माया साने'ची भूमिका केली होती 'तेजस्विनी'ने. तेजस्विनीही 'सी.डब्लू.ए.' आहे आणि पूर्वी संस्कृत न शिकलेली आहे. तिनेही संस्कृतात सफाईदारपणे संवाद म्हटले.
नाटकातल्या मुख्य पात्रांव्यतिरिक्त बॅक-स्टेज सांभाळलं ते मेघा, मयूरी, नेहा, भाग्यश्री, अर्चना, स्वरमुग्धा यांनी.
संगीत- सुमीत यादवने सांभाळलं आणि प्रकाशयोजना सांभाळली मिहिर कुलकर्णीने.
मूळ नाटकातले संवाद संस्कृत भाषा न शिकलेल्यांनाही समजतील अशा प्रकारे संस्कृतात आणणं हे खरंच खूप कठिण काम. पण ते करताना काही मराठी इंग्रजी शब्द जसेच्या तसे ठेवण्यात आले होते. जसे की 'धिस इज मात्र टू मच हं' ह्या मूळ संवादातलं 'टू मच' हे संस्कृत संवादातही तसंच ठेवलं होतं. असं करण्यामागे 'कुठे तरी केवळ संस्कृत शब्दांचा हट्ट धरून आपणच संस्कृत भाषेला बांध घालतो आहोत का?' हा अनुवादकाचा विचार संस्कृत शिकणार्या आणि शिकवणार्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे असं मला वाटतं.
असो, एखाद्या वर्तमानपत्रातल्या बातमीप्रमाणे वाटेल असा हा लेख इथेच आटोपता घेतो. पण लेखनोद्देश इतकाच की संस्कृत-भाषा शिकणारे कमी नाहीत, संस्कृतभाषेच्या प्रसारासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करणारेही कमी नाहीत. तेव्हा संस्कृत-भाषा शिकायची इच्छा असेल तर 'आजकाल कोण शिकतोय संस्कृत?' अशी शंका कुनालाही येऊ नये.
मी ह्या वर्षीच 'मनस्वी'चा सदस्य झालो असल्याने, ह्या वर्षी फक्त 'फोटो काढणे' इतकीच जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा नाटकातल्या काही प्रसंगांचे फोटो खाली देतो आहे.
संस्कृत शिकू इच्छिणार्या किंवा संस्कृत नाटकात काम करण्याची इच्छा असणार्या किंवा नाटकाच्या तांत्रिक बाजू सांभाळण्यात रस असणार्या मायबोलीकरांचं 'मनस्वी'त स्वागतच आहे!
१) दया आणि शाम्या-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:
२) काकासाहेब-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:
३) व्यंकू-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:
४) शांता-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:
५) माया साने-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:
६) इन्स्पेक्टर आणि नाटकाचा अनुवादक- अमोघ प्रभुदेसाई.
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:
७) सर्व पात्रे-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:
८) मनस्वी संघ
धन्यवादा: !
एक नंबर जरूर आवडेल एकदा तरी
एक नंबर जरूर आवडेल एकदा तरी अशा उपक्रमाचा भाग व्हायला
वा. वा. सुंदर उपक्रम.
वा. वा. सुंदर उपक्रम.
फारच छान!
फारच छान!
खुपच छान उपक्रम आहे
खुपच छान उपक्रम आहे
मस्त उपक्रम!
मस्त उपक्रम!
वा चैतन्या - खूपच छान.
वा चैतन्या - खूपच छान. तुझ्याकडे या एकांकिकेचे रेकॉर्डिंग केलेले आहे का ?
स्वरमुग्धा, ईश्वरी व त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी केलेल्या अशाच प्रकारच्या संस्कृत एकांकिकेची आठवण झाली ....
वा ! चांगला उपक्रम आहे.
वा ! चांगला उपक्रम आहे.
बाप रे! ग्रेटच!
बाप रे! ग्रेटच! एकदम...!
विशेषतः अमोघ प्रभुदेसाई यांना __/\__
ही एकांकिका पहायला आवडेल.
सही !!
सही !!
संस्कृत भाषा तळागाळापर्यंत
संस्कृत भाषा तळागाळापर्यंत पोचो आणि तिला पुन्हा तिचे अग्रगण्य स्थान मिळो.
या उपक्रमासाठी हातभार लावणार्या सार्यांना अभिवादन!
उपक्रम छान. संस्कृत भाषांतर
उपक्रम छान. संस्कृत भाषांतर वाचायला आवडेल. जमलं तर इथे एखाद्या प्रसंगाचे भाषांतर देऊ शकाल का? पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा.
छानच, पुढील उपक्रमांसाठी
छानच, पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा !
प्रचंड आवडला. दहावीपर्यंत
प्रचंड आवडला. दहावीपर्यंत पूर्ण संस्कृत होतं आणि संस्कृत भाषणे उतारे ई.च्या खूप स्पर्धा व्हायच्या, मजा यायची.
आता आमची मुले धडपणे मराठी बोलू - वाचू शकतील की नाही ही भीती आहे, संस्कृत शिकतील हे स्वप्नवतच वाटते. अशा परिस्थितीत तुम्ही करीत असलेले उपक्रम मस्तच, आणि मुळातून आवड म्हणून करीत असल्याने किती 'एन्जॉय' करीत असाल याचीही कल्पना येते. खूप शुभेच्छा.
मस्त.
मस्त.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
ह्या नाटकाचा अजून एखादा प्रयोग होण्याची शक्यता असेल तर नक्की कळवेन.
प्रयोगाआधीच इथे कळवायचे होते, पण तालमीच्या गडबडीत राहून गेले.
ह्याचे व्हीडिओ रेकॉर्डिंग अजून तरी उपलब्ध झालं नाहिये.
नंदिनी- एखाद्या दृश्याचा संस्कृत उतारा उद्यापर्यंत देईन इथे.
छानच ऊपक्रम संपूर्ण टीमच
छानच ऊपक्रम
संपूर्ण टीमच अभिनंदन
मला बारावीपर्यत संस्कृत होत
नंतर संबंध तुटला
या ऊपक्रमाच्या निमित्ताने जर मला संस्कृतशी परत जोडून घेता आल तर फार आनंद होईल
या नाटकाची झलक तरी आम्हाला
या नाटकाची झलक तरी आम्हाला दाखवा यार. यू ट्यूब वर टाकल नसेल टाका अन लिंक द्या.
धन्य आहात तुम्ही लोक!
धन्य आहात तुम्ही लोक!
mastch! Group che hardik
mastch! Group che hardik abhinandan! Wa pudhil upakramas shubhechchha!
महान...!! अभिनंदन आणि
महान...!! अभिनंदन आणि शुभेच्छा!!
प्रयोग बघायला नक्कीच आवडेल.. ह्या अश्या प्रयत्नांना अधिक मोठे व्यासपिठ मिळायला हवे असे नेहेमी वाटते.
भविष्यात 'मनस्वी' संप्रदायात सामिल होता आले तर आनंद होईल.
श्रीकांत, भरत नाट्य मंदिरात
श्रीकांत,
भरत नाट्य मंदिरात एक्स एल आर कॉर्ड न मिळाल्याने, व्हीडिओ रेकॉर्डिंग करता आलेले नाही.
ती कॉर्ड नसल्याने, ऑडिओ इनपुट देता आलेला नाही.तरीही एका मैत्रिणीने हँडिकॅमवर रेकॉर्ड केलंय. ते अपलोड करता येतंय का ते बघतो.
नंदिनी, मूळ नाटकाचा मराठी संवाद आणि त्याचा संस्कृतानुवाद खाली देतो आहे.
व्यंकू- आता इतक्या शिव्या खाल्ल्यावर कोणाला भूक आहे? तुम्हीच खा, आणि वाढा. झाडाच्या खोडासारख्या चहूबाजूंनी.
संस्कृत- एतावन्तान् अपशब्दान् भुक्त्वा कस्यास्ति बुभुक्षा? भवती एव भुञ्जतु! वर्धतु चतुर्भि: दिग्भि:, वृक्षप्रकाण्डमिव |
काकासाहेब- ती काय म्हणाली काय रे?
संस्कृत- किमुक्तं तया इदानीम् ?
व्यंकू- ती तिकडे भावगीत म्हणतीये आणि मी इकडे डॅन्स करतोय.
संस्कृत- सा तत्र भावगीतं गायति, अहं च अत्र नृत्यामि |
या प्रसंगानंतर शांतेची एण्ट्री -
शांता- गिळायला चला, गिळायला चला म्हणून ओरडतेय. कान फुटले की काय तुमचे?
संस्कृत- भोजनं सिद्धं, भोजनं सिद्धं इति वदन्ती आसम्. अपि भग्नौ वा कर्णौ?
काकासाहेब- सूनबाई, तुझं नांव शांता कुणी ठेवलं गं?
संस्कृत- स्नुषे, केन अभिहितं त्वां 'शान्ता' इति नाम?
व्यंकू- भलत्या वेळी भलते विनोद करू नका हो.
संस्कृत- काकासाहेब, कः समयः, कश्च विनोदः?
सुंदर उपक्रम.. पुढच्या
सुंदर उपक्रम.. पुढच्या कार्यक्रमास शुभेच्छा...
लग्नाच्या अटींचा सीन जबरी वाटेल.. आणि
घ्या चहा ढोसा आता..
वा आज चहा बरोबर डोसा पण का? हा संवाद कसा होईल..
हिम्सकूल, सगळेच संवाद/सीन
हिम्सकूल,
सगळेच संवाद/सीन नाही केले आम्ही. एकांकिकेला ४५-५० मिनिटांचाच अवधी होता त्यामुळे.
पण अनुवाद करायचा म्हणून तुम्ही म्हणता ते सीन संस्कृतात करून पहायला हवेत.
छानच उपक्रम,खूप शुभेच्छा..
छानच उपक्रम,खूप शुभेच्छा.. संस्कृत नाटकांचं अभिवाचनही करता येईल..
चैतन्य, तुमच्या टीमचं
चैतन्य, तुमच्या टीमचं अभिनंदन! भारी वाटलं वाचून.
याची व्हिडिओ सीडी काढावी अशी माझी सूचना. सोबत मराठी सब-टायटल्स द्यावेत. (मराठी प्रक्षकांकरता.. मुख्यतः टार्गेट प्रेक्षकवर्ग मूळ मराठी नाटक पाहिलेला मराठी प्रेक्षक असणार असे मानून..)
मस्त उपक्रम आणि शुभेच्छा
मस्त उपक्रम आणि शुभेच्छा !
संस्कॄत भाषेत सुद्धा कजागपणा करता येतो ?
खुशखबर :) फर्ग्युसन
खुशखबर
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्पर्धेच्यावेळी आधीच सगळ्यांना सांगता आलं नव्हतं त्यामुळे काहींना इच्छा असूनही संस्कृत एकांकिका पाहता आली नव्हती.
पण आता मनस्वी आणि रुईया महाविद्यालय मुंबई एकत्रितपणे एक नव्हे तर दोन संस्कृत एकांकिकांचा प्रयोग करतो आहोत.
दिनांक- २१ जुलै २०१३ (रविवार)
स्थळ- भरत नाट्यमंदिर पुणे
वेळ- दुपारी १
१) माधवीयम् (रुईया महाविद्यालय मुंबई)
२) विचक्षणोऽयं शान्तासूनु: ('मनस्वी' पुणे)
तिकिटांसाठी संपर्क- आनंद शुक्ल- ९१-९८९०६५५४९५
(तिकिट दर- रु. ५०/-)
अभिनंदन ... (इच्छा असुनही
अभिनंदन ...
(इच्छा असुनही पहायला येता येणार नाही ....बरेच काही मिस्स होत आहे )
पुणेकर नसल्याने या संधीचा
पुणेकर नसल्याने या संधीचा फायदा घेता येत नसल्याचा खेद आहे. प्रयोग ठेवल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद आणी शुभेच्छा!
चैतन्य दीक्षित, अभिनन्दन आणि
चैतन्य दीक्षित,
अभिनन्दन आणि शुभेच्छा.
Pages