आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
नमस्कार सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि कर्जमुक्ती वरून बरीच चर्चा चालू आहे. प्रत्येक जण आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत हे दाखवत आहेत. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत हे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला माहित नाहीत किंवा माहित करून घ्यायचे नाहीत किंवा माहित असून ते माहित नाही असे भासवायचे आहे. शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहेत त्यात मुख्य म्हणजे पाणी, वीज, शेतमालाला भाव हे आहेत. त्याच बरोबर वाढत्या महागाईमुळे त्याला घर कसे चालवायचे हेच कळत नाही आहे.
आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा अभिमान अहंकार नसतो.
कोणाला चांगले हापुस, पायरी वगैरे आंबे विक्रेते माहीती आहेत का?
ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मित्र/परीवारांनी अनुभव घेतला आहे.
मला मुंबईत कोणाला तरी भेट पाठवून द्यायचीय. ऑनलाईन पैसे भरायचे असतील तर उत्तम.
नसली तरी पैसे पोस्ट करेन पण खात्रीशीर ठिकाण माहीती हवे आहे. ( काळेबंधू आंबेवाले नको आहेत, खूपच वाईट अनुभव आहे दोन वर्षाचा.
जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.
मोठ्या शहरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण व बिकट होत चालला आहे. औद्योगिक क्षेत्रे एकसारखी वाढत चालली असून त्यामुळे शहरे अयोग्य प्रकारे वाढत आहेत. शहरी लोकसंख्या सर्व बाजूंनी वाढत असून ही वाढ रोखणे अथवा टाळणे अवघड आहे. तसेच लोकसंख्या वाढीचे अंदाजही पुष्कळदा चुकतात. यामुळे शहरांना होणारा पाण्याचा पुरवठा हा नेहमी कमीच पडत राहतो. पुढील तीस वर्षांचा हिशोब करून दिलेले पाणी पाच-दहा वर्षांत कमी पडु लागते.
निसर्गात मिळणार्या पाण्याचे मुख्यतः दोन वर्ग करण्यात येतात : (१) भूमिगत पाणी व (२) पृष्ठभागावरील पाणी.
नमस्कार!
"सक्षम एंटरप्रायजेस" या नावाने आयात-निर्यात परवाना प्राप्त करुन, अपेडा ची नोंदणी करुन आता व्यवसाय सुरु करण्यास सज्ज झालो आहे!
पहिला प्रयत्न हा फळे व भाजीपाला निर्यातीचा आहे. आखाती देश - प्रामुख्याने दुबई ला ताज्या फळांची (डाळींब व द्राक्ष) निर्यात करण्याचे ठरवले आहे.
मायबोलीकरांकडुन, विशेषतः दुबई व आखाती देशात राहणार्यांकडुन तेथील मार्केट चे ट्रेंड, बाजारभाव (होलसेल व रिटेल ),व मार्केट मधील ठळक व्यावसायीक यांची महिती, संपर्क मिळविण्या च्या दृष्टीने मदतीची अपेक्षा आहे.
सक्षम एंटरप्राएजेस,
कांद्याचा भाव
लोकांना कांदा चारणाराही
आज कांद्यानेच खचला आहे
राब-राब राबुनही शेतकर्याला
कष्टाचा घास ना पचला आहे
विक्रमी ऊत्पादन करूनही
मार्केटींगमध्ये तो हरू लागला
कारण घसरता कांद्याचा भाव
डोळ्यात पाणी भरू लागला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३