शेती

अळूची कंद कशी लावावीत?

Submitted by सान्वी on 29 March, 2021 - 04:50

मी मोठ्या प्रेमाने अळूची कंद मोठ्या कुंडीत पेरली होती, तब्बल एक महिन्यानंतर त्यातून छोटीशी कोंब बाहेर आले होते. मी प्रचंड खुश! अळू लावण्याची खूप दिवसांपासून ची इच्छा होती आणि आमच्या वॉचमन ने खात्रीचे म्हणून त्याच्या गावाहून कंद आणून दिले होते. एकदा कोंब फुटल्यावर मात्र भराभर पाने येऊन मोठी होऊ लागली. काल होळीच्या मुहूर्तावर भजी करण्यासाठी म्हणून काढली. परंतु अत्यंत खाजरी अळू आहे. माझा खूप भ्रमनिरास झाला. एवढ्या प्रेमाने लावलेल्या झाडाने दगा दिला. आता परत लावायची आहेत, तर कोणी सांगेल का चांगली अळू कशी लावता येईल?

किसान आंदोलन, मीडिया आणि सरकार

Submitted by ashokkabade67@g... on 6 December, 2020 - 11:49

शेतकरी कायद्या विरोधात दिल्लीत आंदोलन पेटले आहे आणि तेही शांततापूर्ण मार्गाने सुरुच आहे .सरकारने साम दाम दंड भेद ही सारी हत्यारे वापरूनही शेतकरी आपल्या मागण्यांवरठाम आहेत आणि विकला गेलेला मीडिया शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवायला निघाला आहे सरकारने चर्चेचे नाटक सुरु ठेवून प्रश्न लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर ज्यांच्या बापाने कधी शेती केली नाही ते सरकारी चम्मच आंदोलनावर टीका करत आहेत तर काही सरकारला विकल्या गेलैल्या मीडियावर देशाच्या ईज्जतीचा प्रश्न उभा केला जात आहे .या साऱ्या आंदोलनात सरकारची चाटुगीरी करणाऱ्या मीडियाचाखरा चेहरा मात्र जनते समोर आला आहे।लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणवून घ

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 23 November, 2020 - 02:18

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

सुख-समृद्धीच्या देतो शुभेच्छा
की तू करतो मस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

सायबीन सवंगाचं काम
बिलकुल नाही पडलं
चकरभुंग्यापायी पीक
खुमसूखुमसू रडलं
घरी धन आणासाठी
करु का रे गांजा-तस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

औंदाच्या पावसापायी
भलतंच ईपरीत घडलं
कापसाचं अख्खं बोंड
बुडापासून सडलं
आता काय तुह्याच घरी
म्या करावी का चोरी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-३

Submitted by अनया on 14 October, 2020 - 03:52

एकेकाळी शेतकऱ्याच्या गरजा त्याच्या परिसरातच भागायच्या. बियाणं , अवजारं , खत आणि बाजारपेठही. आलेल्या पिकातील सर्वोत्तम भाग पुढच्या मोसमाच्या बियाण्यासाठी राखून ठेवला जायचा. शेताच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था मोट, बैल ह्यांच्या साहाय्याने होत असे. बैलाचं खाणं म्हणजे इंधन शेतावर तयार होत असे आणि बैलांचं शेण खत म्हणून वापरलं जायचं. मोटेची दुरुस्ती गावातला कारागीर करू शकत होता. एकूण काय की पंचक्रोशीच्या बाहेर जावं लागेल, असं काही नसायचं. पर्यावरणपूरक म्हणता येईल अशी व्यवस्था होती.

विषय: 

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-२

Submitted by अनया on 14 October, 2020 - 03:26

प्राथमिक शाळेतल्या बालभारती मराठीच्या पुस्तकात एक भैरूचा धडा होता. ‘पहाट झाली, भैरू उठला. बैल सोडले. औत घेतले. शेतात जाऊन औत धरले’ असं काही शेताचं आणि शेतीतल्या कामांचं वर्णन त्यात होतं. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या ‘ सकाळी उठोनि चहाकॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज-गाडी’ ह्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शेतीकामाची इतकीच तोंडओळख असे.

विषय: 

आंबा बागायतदार आणि बाजारसमित्यांची मक्तेदारी

Submitted by उडन खटोला on 3 October, 2020 - 10:45

आमची कोकणात देवगड हापूसची बाग आहे. परंपरागत कोकणातील बागायतदार वाशी मार्केटला आंबे विक्री करतात. ही सगळी साखळीत आंबा बागायतदार हा उतरंडीत सगळ्यात खाली आहे. हापूस आंबा हे अगदी नाजूक पीक. सो कॉल्ड कृषी विद्यापीठात अजूनही चांगले संशोधन होऊन हापूसची उत्तम जात निर्माण झालेली नाही. त्याला कित्येक रोग लागतात,त्यातून जे आंबे वाचतील ते विकत घ्यायला कोकणात डिसेंबर च्या सुमारास मुंबईतले दलाल फिरू लागतात. मोहोर पाहून, कणी किती आहे ते पाहून बागा कंत्राटाने घेतल्या जातात. जे लोक स्वतः आंबा वाशी मार्केटला पाठवतात त्यांचे हाल कुत्रे खात नाहीत.

विषय: 

पांडुबाबाची लावणी

Submitted by सुमेधा आदवडे on 30 September, 2020 - 13:15

पांडुबाबाची लावणी

भिलजी गावच्या पांडुबाबाच्या दोन बायका. पहिली दम्यानं लगीन होऊन चार वर्षातच गेली त्याच्या पदरी तीन पोरी टाकून. मग पोरींची नि घराची देखभाल करणार कोण म्हणून दुसरी केली. तिला मुलंच होईना. झालं तरी जगंना. मंग पोरासाठी वाटल त्या नि दिसल त्या देवास नवस बोललं गेलं. अन पाच वर्षांनी एकदाची कुठल्यातरी देवाला त्याची दया आली आणि दारी छोटा किसना खेळू लागला. त्याचं नाव किसनच ठेवलं पांडुबाबानी. किसन शाळेत जाऊ लागला. हळूहळू मोठा होऊ लागला. आभ्यासात लय हुशार! दर वर्षी पहिल्या पाचात यायचा. काहीच नाही तर पहिल्या दहात तर नक्कीच!
पांडुबाबाला त्याचं कोण कवतिक!

नवे शेती विषयक कायदे शाप की वरदान?

Submitted by अश्विनीमामी on 28 September, 2020 - 10:13

नव्या ने मंजूर करवुन घेतलेल्या शेती विषयक कायद्यां बद्दल चर्चे साठी धागा.

कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द केल्या गेल्या आहेत. कायदा लागू झाला की त्यांचे काम थांबेल. तिथे काम करणार्‍या मजुरांचे रोजगार जातील व तिथे माल विकायला आणणार्‍या अल्प भूधारक शेतकर्‍यांचे सेफ्टी नेट निघून जाईल. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ह्या बाबतीत आमूलाग्र बदल घडवणा रे व नव्या पद्धती लागू करणारे हे कायदे आहेत. पण ह्यात नक्की भले कोणाचे होणार आहे हे उमजत नाही आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

जीवनज्योती कृषी उद्योग

Submitted by अनया on 26 August, 2020 - 09:26

जीवनज्योती कृषी उद्योग

IMG_20200622_103856936[1].jpg

पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो.

Pages

Subscribe to RSS - शेती