शेती

तडका - यंदा कांदा

Submitted by vishal maske on 10 August, 2016 - 20:48

यंदा कांदा

मनाला वाटलं
हा फेडील पांग
म्हणून लावली
कांद्याची रांग

पण यंदा कांदा
कवडीमोल गेला
भावासाठी ठेवला
तो सुध्दा सडला

सुखासाठी खुप
धडपड केली
पण कांद्याने फक्त
रडा रड केली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

हरवलेले दिवस ...

Submitted by अजातशत्रू on 6 July, 2016 - 02:25

बालपणीच्या अनेक आठवणी असतात… काही सुखद तरी काही दुखद… आठवणींचा हा अमोल ठेवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनामिक प्रेरणा देत राहतो.……

लहान असताना शेतातली मोठी जनावरे फिरायला घेऊन जाण्याचा वसा थोरांकडे असायचा. "तुम्ही अजुक नेणते हायसा, थोडं थोरलं व्हायचं मग जित्राबाला हात लावायचा." हे वाक्य ठरलेले.

गायी म्हशी जवळ तासंतास उभे राहिले तरी कंटाळा येत नसे. गोठा ही शेतातल्या आवडत्या जागांपैकी एक असायची.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ८: इस्राएलचे जल- संवर्धन

Submitted by मार्गी on 6 June, 2016 - 12:55

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ७: काही अज्ञात पर्यावरणप्रेमी!

Submitted by मार्गी on 31 May, 2016 - 02:47

तडका - चला कांदा खरेदीला

Submitted by vishal maske on 29 May, 2016 - 10:59

चला कांदा खरेदीला

या रडवणार्या कांद्याचीही
हसवणारी ख्याती व्हावी
माती कसणार्या शेतकर्याची
कांद्यामुळे ना माती व्हावी

म्हणूनच आता निर्धार करू
देऊ बळ त्याच्या ऊमेदीला
आरोग्य ऊत्तम राखण्यासाठी
सुरूवात करू कांदा खरेदीला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

----------------

* सदरील वात्रटिका ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर - 9730573783

* इडीट न करता शेअर करून सहकार्य करावे

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादव पायेंग

Submitted by मार्गी on 26 May, 2016 - 13:47

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा

Submitted by मार्गी on 21 May, 2016 - 07:48

लय जोरात पिकल्यात आंबं

Submitted by जव्हेरगंज on 19 May, 2016 - 02:26

लय जोरात पिकल्यात आंबं
मी चाखुन बघतोय थांबं
या पावसाच्या रानात
सखे तु होशील चिंब

या केळीचा उनाड बांबू
पपईला देतोय टेकू
या पपईचा मधाळ रस
सखे तु दे मला चाखू

हा डाळींबाचा दाणा
लालभडक आणि छान
पाहुन या डोळ्यांनी
झालोय मी बेभान

या राना शिवारात
लय जोपासल्याती झाडं
या कसलेल्या बाहुंनी
त्यांचा केलाय लाडं

ही झाडं फुलं पानं
ही हवाही झालीय धुंद
या हिरव्या झाडखाली
सखे तु होशील चिंब

शब्दखुणा: 

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न

Submitted by मार्गी on 18 May, 2016 - 14:04

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ

Submitted by मार्गी on 14 May, 2016 - 02:40

Pages

Subscribe to RSS - शेती