हिरवे शिवार
नभ दाटता आभाळी
पावसाची आली सर
काळ्या आईस पेराया
हाती घेतले पांभर
ओढ थेंबाची तृणांशी
जशी मखमली शाल
बाप राबतो शेतात
हाती जगाची मशाल
पायी नसतो आधार
चिखलाची त्याची वाट
झोपे चांदण्या रात्रीत
जगा वेगळाच थाट
पोंर आपली हुशार
बाप मायशी भांडतो
जिव ठेवून गहान
दिस उपाशी काढतो
शेतकरी आमचा बाप
कधी राहिल टिपटाप ?
आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||
असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?
' साथीच्या रोगाने विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेची, पोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती.
मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..
हा पाऊस तरी कधी येईल?
धरा कधी एकदा पुन्हा तृप्त होईल?
धरतीने अनेक आ वासले आहेत..
शुष्क तडे आता तहानले आहेत!
हा विषय राजकारणाशी संबंधित नाही.
हे आपल्यामुळे घडत आहे.
आपण कधी हयाचा गंभीरपणे विचार केला नाही, त्यामुळे पाणी आणि पावसाचा प्रश्न आज एवढा मोठा झाला आहे.
पाण्याच दुर्भिक्ष आज सगळीकडे पहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण हया भागातही हे चित्र आता पहायला मिळत आहे , तीव्रता थोडी कमी आहे हाच एक दिलासा आहे, पण हे सगळं वाढत चाललय एवढ मात्र नक्की.
हा पाणी प्रश्न कसा सोडवावा, काय उपाययोजना कराव्या म्हणून हा धागा.
माबोकरांनी त्यांचे विचार मांडावेत.
Spnf पद्धतीने जी शेती केली जाते त्या शेतांवर जवळ जवळ दर महिन्याला शिवारफेऱ्या आयोजित केल्या जातात. शेती करू इच्छिणाऱ्या नव्या शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होतो.
एप्रिल 27-28 ला सोलापूर भागात एक शिवारफेरी आयोजित केली आहे. शनिवारी 2 शेतांना भेटी द्यायच्या आहेत, रविवार पूर्ण दिवस एक शेत पहायचे आहे. बहुतेक शिवारफेऱ्यांना गुरुजी स्वतःही हजर राहून मार्गदर्शन करतात. यामुळे ज्याचे शेत आहे त्याला तो जे करतोय ते गुरुजींच्या नजरेखालून घालून घ्यायची संधी मिळते व इच्छुकांना spnf शेती कशी होते, कशी दिसते याचे जिवंत प्रात्यक्षिक घडते.
धोक्याची घंटा..
sorry
तसं काही खास नाही...
चुंचाळे येथे मधमाशा दिसत नाहीत.
पण तरी हे वाचा...
दुष्काळाने हिरावला बाप
आणि आसवांचा बांध फुटला,
पण सावरला संसार माउलीने,
जेव्हा तान्हा पोरका झाला
का टाकले रे विठ्ठला,
असे दुर्भाग्य तिच्या माथी,
ना वारी चुकविली तिने कधी,
केला अट्टाहास तुझ्यासाठी
रमली भक्तीत तुझ्या ती,
आंधळा विश्वास ठेवला,
जपला फाटका संसारही पण
धनी तू चोरून नेला,
धगधगत्या उन्हात तिच्या,
डोईचा आधार हरपला,
जशी साथ सोडली सावलीने,
जेव्हा नभी सूर्य आला