शेती

तडका - बाजारात

Submitted by vishal maske on 21 November, 2015 - 01:24

बाजारात

मनसोक्त बाजार करण्याचं
धाडस कमी होऊ लागलं
तांदूळ,डाळ,वाटाण्यासह
टमाटंही भाव खाऊ लागलं

बाजार करणारांपेक्षा हल्ली
बाजार फिरणारे जास्त आहेत
घेणारांची वाट पाहून-पाहून
पालेभाज्या मात्र त्रस्त आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शेतकर्‍याचं नशिब

Submitted by vishal maske on 15 November, 2015 - 08:53

शेतकर्‍याचं नशिब

शेतकर्‍याचा कांदा
बाजारात उतरला
तसा कांद्याचा भाव
पटकन घसरला

हे गणित जुनंच
पण पुन्हा घडलं
शेतकर्‍याचं नशिब
वारंवार मोडलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बळीराजा

Submitted by vishal maske on 12 November, 2015 - 01:03

बळीराजा

कधी येणार बळीचं राज्य
सुखही सारं गोठलं आहे
दुष्काळ आणि महागाईनं
वामन होऊन लुटलं आहे

फास घेतोय,विष पेतोय
बळ का गळतंय बळीचं
मरू नको रे बळीराजा
सांगणं हे तळमळीचं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - उरा-उरात

Submitted by vishal maske on 10 November, 2015 - 20:27

उरा-उरात

नभी निर्गमता नारायण
प्रसन्न होऊन जातं मनं
सुख शांती समृध्दीने
ओथंबुन हे येतं मनं

दरवळतो हा आनंद सारा
मना-मनात अन् घरा-घरात
प्रेम वाढते,वाढते आपुलकी
उरा-उरातुन,उरा-उरात,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कर्जाळू जीणं

Submitted by vishal maske on 26 October, 2015 - 23:34

कर्जाळू जीणं

करपतंय पीक
रानही वाळतंय
दूष्काळानं सारं
काळीज पोळतंय

काळ्या मातीमधी
कसं पिकंल सोनं
ठरतंय जीवघेणं
हे कर्जाळू जीणं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - किंमत

Submitted by vishal maske on 23 October, 2015 - 00:15

किंमत

यश प्राप्ती करण्यासाठी
ते सर्वमान्य लुटता आलं
पण ज्याला सोनं म्हटलं
तेच आज आपटा झालं

प्रत्येकाला संधी मिळणे ही
ज्या-त्या वेळची गंमत असते
ज्याची-त्याची,ज्याला-त्याला
त्या-त्या वेळीच किंमत असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चौकशी

Submitted by vishal maske on 22 October, 2015 - 03:16

चौकशी

विहिरी पासुन शेतापर्यंत
योजना सुध्दा झिरपतात
लाट आली तरी देखील
टिपके-टिपके टिपकतात

नक्की पाणी कुठं मुरतं,.?
कळून देखील दिसत नाही
जिथं मुरतं पाणी तिथे
चौकशी आत घूसत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - योजना कागदोपत्री

Submitted by vishal maske on 12 October, 2015 - 22:44

योजना कागदोपत्री

ज्यांनी करायला हवे होते
ते कर्तव्य विसरले जणू
इतके कसे मूर्दाड झाले
अहंकारात घसरले जणू

ज्यांच्यावरती दुष्काळ आहे
ते अजुनही गांजत आहेत
दुष्काळ्यांच्या योजना मात्र
कागदोपत्रीच नांदत आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

म्हसरावर ध्यान ठिवा

Submitted by जव्हेरगंज on 7 October, 2015 - 12:21

तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच.
व्हय, बांधावरच घडलं आसं.
मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात.
रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार.

तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू.
जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं. सरळ माझ्याकडचं येत चालली.
"कारं राजाभाव हीरीवर चालला व्हय?" हातातलं खुरपं डोक्यावर धरत तिनं ईचारलं.

तडका - त़ुर डाळ

Submitted by vishal maske on 6 October, 2015 - 11:59

तुर डाळ

पिकवणारे ठकलेत जणू
विकणारांचे फावले आहे
घरच्या मुर्गी पेक्षा जास्त
डाळीचे भाव धावले आहे

जुने अंदाज घेऊन-घेऊन
कुणी आता फसू लागेल
अन् रोजच्या जेवनात म्हणे
तुरडाळ तुरळक दिसु लागेल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - शेती