लागेल थोडे तेल धगास आता
वाटे मला हा देश भकास आता
शांती कधी लाभेल जगास आता
पेटेल क्रांती देश नवा कराया
लागेल थोडे तेल धगास आता
ॠतू अवेळी रंग नवाच फेकी
आणू नव्या शोधून ढगास आता
मौनी असे राजा ललनेस दारी
सोडायची ना त्यास मिजास आता
गेली कशी गूरे बघ छावणीला
लागेल मोठ्ठ टाळ घरास आता
चेकाळली श्वाने लत वासनेची
जाईल कोण्या देश थरास आता
(मार्गदर्शन अपेक्षीत)