माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस
नमस्कार मित्रहो,
आज २७ फेब्रुवारी, कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्मदिवस. हाच दिवस "जागतीक मराठी भाषा दिवस" म्हणून पाळला जातो. योगायोगाने आज माझ्याही आंतरजालावर वावरण्याला १२०० दिवस पूर्ण होत आहे.
नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. आंतरजालावर १-२ लेख लिहिल्या नंतर इंटरनेटसुद्धा शेतकर्यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही.
मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी वांगेमय/वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.
मागील १२०० दिवसांचा लेखाजोखा :-
माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या.
०१) gangadharmute.wordpress.com - माझी वाङ्मयशेती - (६३,९६५) - सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.
०२) www.baliraja.com - बळीराजा डॉट कॉम - ( ५७,३९० )
०३) www.sharadjoshi.in - योद्धा शेतकरी - ( ३१,०७०)
०४) baliraja.wordpress.com - बळीराजा - ( २५,८०६ )
०५) gangadharmute.blogspot.com - शेतकरी विहार - ( १२,५०३ )
०६) gangadharmutespoem.blogspot.in - माझी कविता - (१४,५७२)
०७) marathigazal.wordpress.com - माझी मराठी गझल - ( ५,९०४ )
०८) shetkari-sanghatana.blogspot.com - शेतकरी संघटना - (३,२२५)
०९) ranmewa.blogspot.in - रानमेवा - ( २८०४ )
खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकून संख्या उपलब्ध नाही.
मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे स्पष्ट आहे.
०१) www.facebook.com/gangadharmute
०२) www.youtube.com/gangadharmute
०४) www.shetkari.in
०५) sharad-anant-joshi.blogspot.in
०६) www.twitter.com/gangadharmute
०७) www.facebook.com/groups/kawita
०८) www.facebook.com/groups/baliraja
०९) www.maayboli.com/user/26450/created
१०) www.misalpav.com/user/8199/track
११) www.mimarathi.net/user/382/mytrack
१२) www.sureshbhat.in/user/1099/track
एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.
Thank you Mr Internet!
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझी वाङ्मयशेती - फ़ेसबूक पेज
-----------------------------------------------------------------------------------------------------------
मुटेजी, शेतकर्यांची प्रश्न,
मुटेजी,
शेतकर्यांची प्रश्न, दु:खे अनेक आहेत हे सगळं मांडणारे शेतकरी किंवा इतर माध्यमे खुप कमी आहेत किंवा त्यात ते या पुर्वी कमी पडले, अशात तुमच्या सारख्यांच तुमच्या प्रयत्नांच महत्व खुप आहे.
तुमच्या या शेती विषयक माहिती मांडणाबद्दल, अन्यायाबद्दल वाचा फोडल्याबद्दल, समस्त शेतकरी तरुणांना या आंतरजालाच्या माध्यमातुन एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना दाद द्यावी ती थोडीच आहे
शेतीसाहित्य वाचनाबाबत तुमच्या अनेक वेब साईटनां असाच पाठींबा मिळो हि सदिच्छा !
धन्यवाद अनिलजी. या धाग्यावर
धन्यवाद अनिलजी.
या धाग्यावर प्रतिसादाची बोहणी केल्याबद्द्ल लाख-लाख आभार्स.