Submitted by तिलकधारी on 1 May, 2013 - 07:55
तिनिसांजेला माबोवरती एक टोळके वावरते
गझलांवरती दंगल होते, मन माझे अन् गांगरते!!
डू ऐड्यांचे मुडदे पडती, कत्तल होते ऐड्यांची
बिळात लपुनी घाबरलेली मदत समीती हंबरते
हवा वादळी बघून पळती दुसर्या पानावर सारे ;
कधी नव्हे ते जनसंख्येने दुसरे पानहि गुदमरते
मुख्य फरक पडतो गप्पांच्या पानांवरच्या पडिकांना
गझलांवरच्या गप्पांखाली त्यांची चिवचिव चेंगरते
तुला कशाला हवे निमंत्रण? दारे उघडी तुजसाठी!
आत्मघातकी पथक बाँबच्या पायघड्याही अंथरते
थिजलेल्या काळास कुणाची नजर न लागो म्हणून बघ....
कर्दनकाळाची पापे माबो पदराने पांघरते
स्मोकर मुलगी, ई मेज्वानी, श्रावण घेव्ड्याची भाजी
लोक पसारे अपुले अपुले घेती सारे आवरते!!
मूर्तिमंत सौजन्य जणू ते! कुठे कारवाई करते
गझलत्सुनामीपुढे प्रशासन कापत कापत थरथरते
(तिलकधारी)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मुख्य फरक पडतो गप्पांच्या
मुख्य फरक पडतो गप्पांच्या पानांवरच्या पडिकांना >>
कुणाची आवडती मतं आहेत बरं ही 
स्मोकर मुलगी, ई मेज्वानी, श्रावण घेव्ड्याची भाजी >>> च्यायला, काय निरीक्षण आहे !!!!
बेस्ट हझल !
तिलकधारी या हझलेसाठी तोंड गोड
तिलकधारी या हझलेसाठी तोंड गोड करा.
आधीची चुकून मिस्टेक झाली होती. यावरच गोड माना
(खट्टू होऊ नका).
गझलत्सुनामीपुढे प्रशासन
गझलत्सुनामीपुढे प्रशासन थरथरते की नाही ते माहिती नाही पण सामान्य वाचक म्हणजे माझ्यासारखे मात्र संध्याकाळी नक्कीच थरथरतात. ह्यालाच बहुदा साहित्यिकवाद म्हणत असावेत
स्मोकर मुलगी, ई मेज्वानी,
स्मोकर मुलगी, ई मेज्वानी, श्रावण घेव्ड्याची भाजी
लोक पसारे अपुले अपुले घेती सारे आवरते!!<<<
तिलकधारी, तुम्हि कोणाचे अवतार
तिलकधारी, तुम्हि कोणाचे अवतार आहात ?
आधी आधी जरा गम्मत वाटलेली या
आधी आधी जरा गम्मत वाटलेली या सवाल जवाबांची..
आता बोअर व्हायला लागलय.
मायबोलीची Bandwidth वैयक्तीक वादासाठी वाया जात आहे असे वाटते.
मी अॅडमिन असतो तर या सगळ्यांच्या आयडीज ब्लॉक केल्या असत्या.
(आयडीज बदलले तरी IP address वरुन या आयडीजचे मायबोलीवर फिरकणे बंद होउ शकते याची कदाचित याना जाणीव करुन द्यायची गरज आहे).
स्मोकर मुलगी, ई मेज्वानी,
स्मोकर मुलगी, ई मेज्वानी, श्रावण घेव्ड्याची भाजी>>>>
या तिनही धाग्याना मी प्रत्यक्ष भेटी दिलेल्या असल्याने या ओळीची मजा हुबेहुब अनुभवता आली
बाकी हझल एकदम मस्त आहेच !!
हशा...
हशा...
चांगली हझल! फक्त कर्दनकाळाची
चांगली हझल!
फक्त कर्दनकाळाची पापे .................समजले नाही!
कोणती पापे कर्दनकाळांनी केली आहेत? यादी द्याल काय?
आम्ही तर म्हणतो..............
करतो प्रयास साधा मी पाप टाळण्याचा!
दिसतो वरून तितका मी पुण्यवान नाही!!.......................इति कर्दनकाळ!
पाप टाळण्याचा झाला असा फायदा...........
कणाकणाने पुण्याई कमवत गेलो!....................इति कर्दनकाळ
आयुष्य जगायास हवी पुण्याई!
मातीत रुजायास हवी पुण्याई!
सत्संग मिळो वा न मिळो कोणाचा;
नि:संग बनायास हवी पुण्याई!!.................इति कर्दनकाळ
थिजलेल्या काळास कुणाची नजर न लागो म्हणून बघ...यावरून आमचे काही शेर आठवले............
जीवाश्म मी! जणू मी, तो काळ, लोटलेला!
क्षण एक एक माझ्या हृदयात गोठलेला!!
काही पुढून, काही मागून वार झाले;
प्रत्येक घाव माझ्या प्राणांत पोचलेला!
त्यांनी जरी पुरावे वेचून नष्ट केले;
त्यांच्या मनात त्यांचा अपराध नोंदलेला!
**************इति कर्दनकाळ
गंभीर समीक्षक रचित इसवीसन
गंभीर समीक्षक रचित इसवीसन २०१३ व पुढे गझलपुराण खंड पहिला अध्याय तिसरा यात भाविकांचे स्वागत आहे.
त्या काळात कवी तिलकधारी नावाची एक भ्रामक संकल्पना होऊन गेली. या संकल्पनेच्या माध्यमातून अनेकांनी अनेकांवर चौफेर तोंडसुख घेतले. मल्टिलेव्हल कम्युनिकेशनची ही पहिली पायरी मानली जाते. कवी तिलकधारी या भ्रामक संकल्पनेतून निर्माण झालेल्या व्यासपीठावर कोणासही नंगानाच करण्याची परवानगी असे. तसेच, विषयाला सोडून बोलण्यासाठी या व्यासपीठाचा विशेष वापर होत असे. कवी तिलकधारी यांची दहशत इतकी होती की अनेक कवी दीनवाणेपणाने आंतरजालावर नुसतेच पडून असायचे. कवी तिलकधारी व कवी कर्दनकाळ यांचे एकमेकांशी जमत नसे. पुढेपुढे हे वैर इतके वाढले की त्यांची काव्यनिर्मीती ही निव्वळ मुलुखगिरी करण्यापुरतीच होऊ लागली. कवी तिलकधारींकडे त्या काळच्या भारतातील गोवा व दक्षिण महाराष्ट्र हा प्रदेश असे. कवी कर्दनकाळ हे मुळचे धुळ्याचे व राहण्यास पुण्यात असल्याने उर्वरीत महाराष्ट्रावर त्यांची सत्ता होती. एका प्रदेशातील कवीला दुसर्या प्रदेशात जाण्यास व्हिसा लागे. मुंबईस्थित एक सुस्वभावी वैद्य कवी कैलास गायकवाड हा इसम पुढे मोठाच द्वाड असल्याचे लक्षात आले. या इसमाने या दोन धुरिणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा व मारामारीचा एक अभूतपूर्व सोहळा उपस्थितांना दाखवण्याचा कुटील डाव रचलेला होता. तो कवी कर्दनकाळांनी हाणून पाडल्याचे दाखले आहेत.
तात्पर्य - दोघांमधील खड्डा बुजवणारा स्वतःच खड्ड्यात पडतो
गंभीर समीक्षक रचित इसवीसन २०१३ व पुढे गझलपुराण खंड पहिला अध्याय तिसरा समाप्त!
कळावे
गं स
जे काय लिहीलेय ते आपल्याला
जे काय लिहीलेय ते आपल्याला आवडले बॉ
तिलकधारी आवडली
तिलकधारी
आवडली
किती कुरबूरती शायर! तिलकधारी
किती कुरबूरती शायर!
तिलकधारी करा वंगण!!................इति कर्दनकाळ
गं.स,
कर्दनकाळांचे तिलकधारींवरील प्रेम पहा! वरील शेर साक्षीला आहे!
टीप: आमचे नाव फक्त देवपूरकर आहे! धुळ्यातील देवपूर गावाशी आमचा काही संबंध नाही!
तेथील देवपूरकर हे बहुतेक सर्व सोनार आहेत!
आम्ही पुणेकर आहोत!(४थी पिढी) आम्ही देशस्थ येजुर्वेदी ब्राम्हण आहोत!
अवांतर: आमचा प्रेमविवाह वयाच्या २२व्या वर्षी कोकणस्थ चित्पावन कन्येशी झाला, तेव्हा आमच्या जातकुळाची चौकशी करायला सासुरवाडीची मंडळी (मेव्हणी) धुळ्यास देवपूर गावी जाऊन धडकली! शेवटी आम्हाला याज्ञवल्क्य आश्रमास मध्यस्ती घालावे लागले, तेव्हाआमची सोयरीक जुळली! सासुरवाडीचे नाव भिडे........पक्के रत्नागिरीतील चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण!
धुळ्यावरून स्मृती जागृत झाल्या म्हणून हा लिखाणाचा प्रपंच!
देवपूर गावात आम्ही खूप वर्षांपूर्वी मुशय-यास गेल्याचे स्मरते!
*************इति कर्दनकाळ
कविते ! करीन मी तुला ठार, ही
कविते ! करीन मी तुला ठार, ही ज के उपाध्ये यांची कविता आठवली.
रॉबीनहूड | 3 May, 2013 -
रॉबीनहूड | 3 May, 2013 - 09:09 नवीन
कविते ! करीन मी तुला ठार, ही ज के उपाध्ये यांची कविता आठवली.
<<<
तिलकधारी आला आहे.
रॉबीनहुडा, तुझा प्रतिसाद वाचून तिलकधारीला काहीही आठवले नाही. हा कोण ज के उपाध्ये काढला?
टीप: आमचे नाव फक्त देवपूरकर आहे! धुळ्यातील देवपूर गावाशी आमचा काही संबंध नाही!
तेथील देवपूरकर हे बहुतेक सर्व सोनार आहेत!
आम्ही पुणेकर आहोत!(४थी पिढी) आम्ही देशस्थ येजुर्वेदी ब्राम्हण आहोत!<<<
कर्दनकाळा, हे तिलकधारीला ठाऊक आहे. तो गं स तारे तोडत आहे.
अवांतर: आमचा प्रेमविवाह वयाच्या २२व्या वर्षी कोकणस्थ चित्पावन कन्येशी झाला, तेव्हा आमच्या जातकुळाची चौकशी करायला सासुरवाडीची मंडळी (मेव्हणी) धुळ्यास देवपूर गावी जाऊन धडकली! शेवटी आम्हाला याज्ञवल्क्य आश्रमास मध्यस्ती घालावे लागले, तेव्हाआमची सोयरीक जुळली! सासुरवाडीचे नाव भिडे........पक्के रत्नागिरीतील चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण!<<<
कर्दनकाळा, वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रेमविवाह करण्याची हिम्मत कशी झाली तुझी?
तिलकधारी निघत आहे.
गझलत्सुनामी
गझलत्सुनामी
कर्दनकाळा, वयाच्या बाविसाव्या
कर्दनकाळा, वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रेमविवाह करण्याची हिम्मत कशी झाली तुझी?
तिलकधारीजी, यालाच तर कर्दनकाळ म्हणतात! आमचे पिताश्री आम्हाला चांगलेच ओळखत होते!/ओळखतात!
कर्दनकाळ, तिलकधारी , ठार
कर्दनकाळ, तिलकधारी , ठार करणे, खड्ड्यात जाणे
भयंकर आहे हे. मला कशाला लिंक दिलीय याची ?
कोणी लिन्क दिली.
जाऊ द्या नाव सांगितले की नको
जाऊ द्या नाव सांगितले की नको ते लोक येऊन गोंधळ घालतील.
गुरुदेवांचा जयजयकार असो
गुरुदेवांचा जयजयकार असो !!
लिंक देणार्याचे शतशः आभार
बाळू महोदयांचेही आभार लिंक मिळाल्यावर निष्क्रिय न बसता त्यांनी हा धागा सक्रीय केला = वर काढला म्हणून
काळजी नसावी. आपण विश्रांती
काळजी नसावी. आपण विश्रांती घ्यावी. दिवस फिरलेले आहेत. संचिताचा आव आणता येत नाही. डागडुजीसारखे काही उरलेले नाही गडावर. सारेच बुरूज ढासळत आहेत. नुकताच एक ढासळला. आम्ही मात्रअसेच सक्रीय राहू.
- हुकूमावरून