आजच्या घडीला मराठवाड्यात आणि विदर्भच्या काही भागात दुष्काळ पडलेला आहे....... याच्या बातम्या रोजच टि.व्ही. वर दाखविल्या जातात.........आपल्याला त्या बातम्या पाहुनही मन खिन्न होतं.... तेव्हाच त्या वातावरणात जगत असतील त्यांची काय अवस्था असेल?.... खरं तर खेड्यातला दुष्काळ हा फारच भयान असतो.... पण दुष्काळ हा यावर्षीच पडला असही नाही..... तो चार-पाच वर्षात महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला भेट देतो....... मग अशा दुष्काळात कसं जगायचं हे गरिब जगतेला माहिती असतं.....
- गावात सगळ्यात आधी पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते, त्यासाठी लांबुन डोक्यावर घागरीने पाणी आणावं लागतं, किंवा गावात ज्या विहिरी आटायला आल्या आहेत.... त्याच आणखी खोल खोदाव्या लागतात. गावात घरातलं पाणी भरण्याचं काम सहसा स्त्रीयांनाच करावं लागतं.
- माणसापेक्षाही वाईट परिस्थीती जनावरांची होते, कारण गोठ्यातले मुके प्राणी तहान लागली, खायाला चारा नसला तरी बोलुही शकत नाहीत....जनावरांचा चारा खुपच महाग झालेला असतो.... झाडाचा हिरवा पाला खावु घालायला...... झाडाला पालाही राहत नाही.... मग ती रोड दिसु लागली की शेतकरी त्यांना बाजाराचा रस्ता दाखवतात. ज्या जनावरांना बाजारात कोणी विकत घेत नाही ते उपाशीच मरतात.
- शिवारात कुठेच हिरवळ दिसत नाही, त्यामूळे तापमानात वाढ झालेली असते. आता पाणीच नाही म्हटल्या सगळीकडे फुफाटा उडत असतो, पाण्याअभावी झाडांची पानझड होते.
- हाताता काम नाही, खिशात दाम नाही, मग अशा लोकांना बाजारातही कोणी विचारत नाही, गावातल्या मजुरीवर जगणाऱ्या लोकांचे चेहरे उदासवाने होतात, मग ते सतत दुष्काळाची चर्चा करतात, तसेच शेतात काहीच काम नसल्याने ते सावली मिळेल तिथे जुगार (पत्ते) खेळत बसतात.
- पिक काहीच झालं नाही तरी गावातले सावकारी करणारे ज्यांच्यावर कर्ज आहे, त्याच्याकडे लगदा लावतात, अशा परिस्थीतीत अनेक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडतात, तसेच अशा परिस्थीतीचा फायदा घेऊन सावकार जमिन हडपण्याच्या प्रयत्नात असतात.
- कोणत्याही गावात पाण्याचं एवढं संकट निर्माण होण्याचं कारण एवढच की शेती बागायतीची करण्यासाठी खोदलेल्या विहीरी, त्यातुन झालेला पाण्याचा भरमसाट उपसा. या उपस्यामुळे जमीनीतली पाण्याची पातळी एवढी खाली गेली की ती कधीच पुन्हा भरुन निघणार नाही, अशीच काहीतरी परिस्थीती आहे. जी गावे विहरीच्या पाण्यावरच वसवलेली गेली आहेत.... आता विहरीचे पाणी आटल्याने त्यांना दुसर्या ठिकाणाहुन पाणी आणंल्याशिवाय पर्याय नाही.....
- शहरा प्रमाणे गावातली लोकसंख्या भरमसाट वाढल्यामुळे जंगलं नष्ट झाली आहेत, पडीत जमीनी लागवडी खाली आल्या आहेत. मोठ्या शेत जमीनीची विभागणी होऊन लहान-लहान तुकडे पडलेले आहेत, अशा एका कोरडवाहु तुकड्यावर एक संसार चालवणं जिगरीचं झालेलं आहे.
- राज्यच्या या भागात शेतीला कोणताही पुरक व्यवसाय नाही, नद्या आहेत पण त्यावर धरणं बाधलेली नाहीत, एखादा व्यवसाय करायला कर्ज दिल्या गेलं तर त्याची परत फेड होईलच याची कोणतीही श्वावती नाही, कारण कर्जाची परतफेड होयाला तो व्यवसाय फायद्यात चालायला हवा.
अशा पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही लाखो लोक अशा परिस्थीतीत जगत आहेत की त्यांना दोन वेळचं जेवण मिळण्याची भ्रांत आहे. कारण स्वार्थी राजकारणी वुत्तीने महाराष्टाच्या सगळ्या भागात सारखी विकासाची गंगा वाहली नाही त्याचेच हे फळ आहे.
............ तेव्हा त्यातुन या दुष्काळ ग्रस्त लोंकाना शासनाकडुन मदतीचा हात देण्यात यावा अशाही बातम्या येतात......... परंतु दुष्काळ पडुच नाही....... हे तर शक्य नाही, पण पडला तर त्याची तिव्रता कमी करण्यासाठी आपण त्यासाठी काय-काय करु शकतो?
................................................................