शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत
शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत
नमस्कार श्रोतेहो.
आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.
मी: नमस्कार भरत कुलकर्णी साहेब.
भरत कुलकर्णी : नमस्कार.