Submitted by माधवी. on 30 July, 2012 - 00:16
फुलांच्या शेतीबद्दल येथे कुणास माहिती अथवा अनुभव आहे का?
व्यवसाय म्हणुन फुलांची शेती किती जोखमीची आहे?
शेत जमीन असल्यास सुरुवातीला किती भांडवल लागेल?
ह्या सर्व गोष्टींचे खात्रीलायक शंकानिरसन कुठे होऊ शकेल?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही वर्षांपूर्वी हा विचार
काही वर्षांपूर्वी हा विचार माझ्या डोक्यात फार् घोळत होता....
तेव्हा आणि अजुनही मागणी खूप चांगली आहे. आजकाल सजावटीच्या फुलांच मार्केट करोडो चा टर्नोव्हर करतय ...
शेत जमिन असल्यास भांडवल पेक्षा बाकी एमिनिटीज हव्यात , ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल ,ड्राय स्टोरे़ज ...
विनय, थोडे elaborate करुन
विनय, थोडे elaborate करुन सांगणार का?
ह्या बाबतीत मार्गदर्शन करणारी एखादी professional consultancy माहित आहे का?
फुलांच्या शेतीसाठी आधी
फुलांच्या शेतीसाठी आधी जमिनीचा प्रकार, हवामान, तिथले पाणी यांची माहिती घ्या.
हे सर्व कुठच्या फुलांना सूट होईल ते शोधा.
ती फुलं हंगामी आहेत का बारमाही ते जाणून घ्या.
त्या फुलांच मार्केट किती आहे ? किती उत्पादन केलं तर विकलं जाऊ शकतं ?
काय भाव मिळतो ?
मार्केट नक्की कुठे आहे ?
तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे का ? काय दराने ?
उपलब्ध सोयींमध्ये आणखी काय भर टाकावी लागेल ?
सगळं स्वतः करण्याएव्हढा वेळ, शक्ती, अनुभव आहे का ?
माहिती असलेली माणसं नोकरीवर ठेवता येणं शक्य आहे का ?
आजुबाजूला कोणी हा उद्योग केला आहे का ? त्यांचा अनुभव काय आहे ?
एकंदरीत तुमची प्रॉडक्शन कॉस्ट + ट्रान्स्पोर्टेशन कॉस्ट + ऑव्हहेडस् + प्रॉफिट यांचे गणित जमते का ते पहा.
शिवाय हा माल नाशिवंत असतो, त्यामुळे स्टोरेज अथवा ट्रान्स्पोर्ट / मार्केट यांच्या उपलब्धतेसाठी बॅकप प्लान असू द्यात.
ऑल द ब्येष्ट.
बापरे!!!! धन्यवाद बागुलबुवा!
बापरे!!!!
धन्यवाद बागुलबुवा! मला वाटले कोणीही प्रतिसाद देणार नाही बहुतेक!
माझ्याकडे काही साईटस् असतील
माझ्याकडे काही साईटस् असतील तर लिंका टाकतो.
मायबोलीवर सल्ला मागितला आणि मिळाला नाही असे सहसा होत नाही. फक्त नको असलेले सल्लेच फार येतात मात्र
ईमूंमध्ये पैसे उडवताना हाही पर्याय तपासला होता.
तुम्ही स्वतः शेतीत काम करणार
तुम्ही स्वतः शेतीत काम करणार असाल तरच विचार करा
होय माझे हात, पाय, डोक सगळ
होय माझे हात, पाय, डोक सगळ सगळ पोळुन झालय फुल शेती ने .......पण निर्मल आनद मिळतो हे नक्कि ......:प
कुमार फ्लोरि कल्चर ही कम्पनी सम्पुर्ण मार्गदर्शन देते ..पुण्यात हडप्सर ला आहे ....
अजुन महिती साठी एमैल करा.......
शुभेच्छा ....
http://cari.res.in/ http://ww
http://cari.res.in/
http://www.cgiar.org/
http://indiaagronet.com/indiaagronet/agronet_home/agrinethome.htm
http://www.icar.org.in/
http://www.iari.res.in/
http://nabard.org/modelbankprojects/animal_piggery.asp#
http://www.msamb.com/english/export/eurepgap.htm
http://agmarknet.nic.in/
चेक करा. फुलांच्या शेतीपेक्षा, औषधी वनस्पतींचे उत्पादन चांगले फायदेशीर ठरु शकेल असे माझे मत आहे.
बागुलबुवा, लिंका
बागुलबुवा, लिंका तपासते!
सुहास्य, तुमचा प्रतिसाद बघुन जरा घाबरायला झालं!
माधवी, सुहास्य यांच म्हणणं
माधवी, सुहास्य यांच म्हणणं खोटं नाहीये. शेती हा हात पोळून घ्यायचाच प्रकार आहे. हे फक्त तुम्हाला सावध करण्यासाठी लिहितोय. नाउमेद करण्यासाठी नाही.
If you are still interested
If you are still interested in this.Please mail me your no.Me and one of my friend is interested. Any one else want to be part of it.Please mail me.We can create group so no big investment will required. and risk will be less.My Mail id - vsuvarna.bhandari@gmail.com we can also think of vegetable farming.