फॅशनची झगमगती दुनिया डोळे दिपवणारी एक जादूमयी सृष्टी असते. पण या सुंदर, नेत्रदीपक आविष्कारामागे व झगमगाटामागे असते अपार मेहनत, कष्ट, चिकाटी आणि अशक्य वाटणार्या कल्पनांना वास्तवात आणण्याचे कसब. आपल्या स्वप्नांना व्यवहाराची जोड देत जवळपास गेली तीस वर्षे फॅशन डिझायनिंग करणार्या व व्ही. बी. बानावळकर बूटिकच्या संचालिका शीतल बानावळकर कोलवाळकर यांच्याशी संवाद साधताना जाणवतात ते त्यांनी आपल्या व्यवसायासाठी घेतलेले उदंड कष्ट, जिद्द, मेहनत आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची त्यांची आकांक्षा. मायबोलीच्या वाचकांसाठी घेतलेली ही त्यांची खास मुलाखत.
वेरूळ आणि दौलताबादच्या मध्यावर, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या 'हिरण्य रिसॉर्ट'च्या सहचालिका आणि संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांच्याशी गप्पा मारताना मुख्यत्वे जाणवतं ते त्यांचं आपल्या कामाविषयी असलेलं प्रेम आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद! कलाक्षेत्रातल्या व्यावसायिक सुरुवातीनंतर अगदी अनपेक्षितपणे आठल्ये दांपत्याने रिसॉर्ट व्यवसायात उडी घेतली.
सध्याच्या तरुणाईत स्वतःच्या हिमतीवर शिकण्याची व स्वतःच्या पायांवर उभे राहून आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात पुढे काम करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. हे चित्र निश्चितच सुखावह आहे. याच पिढीच्या एका एकवीस वर्षांच्या तरुणीशी माझी काही दिवसांपूर्वी ओळख झाली. तेजल देशपांडे! एक हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व. पंचतारांकित हॉटेलमधील कामाचा अनुभव गाठीशी असलेली ही एक उदयोन्मुख शेफ, पर्यटन विषयातील पदवीधर आणि काही दिवसांतच एका आंतरराष्ट्रीय एअरलाईन्समध्ये रुजू होणारी हवाईसुंदरी. शिवाय हे सर्व शिक्षण तिने स्वतःच्या हिमतीवर, 'कमवा व शिका' या तत्वावर घेतले आहे हे विशेष!
अर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून आपल्या करीयरची सुरुवात करून कालांतराने नाशिक परिसरातील सेक्स वर्कर्स, समलिंगी व तृतीयपंथींच्यात एचआयव्हीसंबंधी जागृती निर्माण करताना सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्या आसावरी देशपांडेंचा प्रवास हा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारा आहे. त्यांचे काम जरी सेक्स वर्कर्स किंवा वारांगना, तृतीयपंथी लोकांच्यात एचआयव्ही जागृती संदर्भात असले तरी ह्या कामाचा संबंध संपूर्ण समाजाशी आहे.
Strength does not come from winning. Your struggles develop your strength and decide not to surrender. That is strength. हे वाक्य ज्यांचं चपखल वर्णन करतं त्या म्हणजे बिमला नेगी देऊस्कर! बिमला नागपूरातील 'नॅशनल अॅड्व्हेन्चर फाऊंडेशन'च्या संस्थापिका आहेत. जून महिन्यात केदारनाथला झालेल्या ढगफुटीच्यावेळेस बिमला त्या भागात होत्या व त्यांनी अनेक जणांचे प्राण वाचवले. त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा खास मायबोली व संयुक्ता वाचकांसाठी!
बिमला नेगी
'स्वयंपाकघर'! औरंगाबाद, किंबहुना संपूर्ण मराठवाड्यातले हे पहिले पोळी-भाजी केंद्र विविध प्रकारच्या चविष्ट, दर्जेदार घरगुती खाद्यपदार्थांकरता लोकप्रिय आहे. खरं तर जगरहाटीच्या मानाने जरा उशीराच, म्हणजे वयाच्या चाळिशीनंतर, दोन अतिशय कर्तबगार महिलांनी सुरू केलेले आणि महिला पुरवठादार असलेले ’स्वयंपाकघर’ गेली १५ वर्षं औरंगाबादकरांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. कित्येक महिलांना ’स्वयंपाकघरा’ने रोजगार मिळवून दिलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्था, बचतगट व महिला मंडळे या व्यवसायाची माहिती घेण्याकरता, शिकण्याकरता ’स्वयंपाकघरा’ला भेटी देत असतात.
शोभेच्या रोपांना एखाद्या कलाकृतीचे रूप देण्याचे कौशल्य हाती असलेल्या मुंबईस्थित व्यावसायिका अलका बजोरिया यांची 'पॅशन ग्रीन' कंपनी आणि त्यांच्या कंपनीद्वारे दिल्या जाणार्या समग्र सुविधा त्यांच्या झाडा-पानांवरच्या प्रेमाची साक्षच देतात. आपल्या छंदाला व्यवसायाचे रूप देणार्या, नोकरीतून ब्रेक घेतल्यावर आपल्या सेकंड इनिंगमध्ये बागकामाच्या छंदाला कॉर्पोरेट स्तरावर नेणार्या व त्यात यश मिळवणार्या अलका यांचा हा खास परिचय मायबोली व संयुक्ताच्या वाचकांसाठी!
'पॅशन ग्रीन' सुरू करण्याअगोदरच्या तुमच्या वाटचालीविषयी सांगाल का?
प्रसंग १ - स्थळ : कार्यालय नटलेली सजलेली बाल तरुण वृद्ध स्त्री पुरुष लग्न समारंभ आटपून मुख्य समारंभ अर्थात जेवणाच्या प्रतीक्षेत बसलेली... बॅकलेस ब्लॉऊज, शिफॉनची झिरझिरीत साडी, नखशिखान्त मॅचिंग अक्सेसरीजने सजलेली गार हवेची झुळूक यावी तशी आली अन नुसत्या तरुणांच्याच नाहीतर बाल, वृद्धांच्या नजरा तिच्याकडे वळल्या..खिळल्या. ती वधू-वरांपर्यंत पोचेस्तोव एक मिनिट हॉल स्तब्ध, निःशब्द! ती येतेऽऽऽऽ आणिक जातेऽऽऽऽ ती गेल्यावर कुजबूज... ही आत्ता तरंगत आली ती कोण? हे घडल्याला झाली दहा वर्ष! अन घडलंय ते एका तरुणीच्या बाबतीत अर्थातच नवल नाही पण... ह्या प्रसंगाची आठवण आली ती ह्या दुसऱ्या प्रसंगामुळे ...
महानगरांमध्ये आपल्या घरात, बाल्कनीत, परसदारी किंवा टेरेसवर हौसेने बाग फुलविणार्यांची संख्या कमी नाही. ग्लोबल वॉर्मिंग, अन्न सुरक्षेसंबंधीच्या प्रश्नांच्या वातावरणात मुंबईसारख्या महानगराच्या मध्यवर्ती भागांमध्ये अर्बन फार्मिंग (नागरी शेती) सामुदायिक स्वरूपात (कम्युनिटी फार्मिंग) यशस्वीपणे अंमलात आणणार्या प्रीती पाटील यांचा प्रवास स्फूर्तिदायक आहे. शाश्वत शेतीचे धडे देणारे त्यांचे कार्य व त्यांची संस्था अर्बन लीव्हज् (Urban Leaves) यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा योग आला. त्यांची ही मुलाखत खास मायबोलीकरांसाठी!
आपल्या आजूबाजूला एक असा वर्गही आहे जो परिस्थितीने, शिक्षणाने गरीब आहे - मागास आहे. त्या वर्गातील लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव बाळगून त्या दिशेने सदोदित कार्यशील असणारे, एक वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या संचालिका श्रीमती अश्विनी कुलकर्णी.