"विंडमिल्स ऑफ गॉड्स" (देवतांच्या पवनचक्क्या) ही एक गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय राजकीय कथा आहे ज्यामध्ये अनेक पात्रे आहेत. यात सिडनी शेल्डनच्या इतर कादंबरीप्रमाणेच सस्पेन्स, थरार, ट्विस्ट आणि टर्न आहेत. मूळ इंग्रजीतील कादंबरी वाचून 1 जून 2021 रोजी मी या पुस्तकाचे परीक्षण इंग्रजीतून लिहिले होते. त्याचा मराठीत अनुवाद आता चोखंदळ वाचकांसाठी प्रस्तुत करत आहे. ही कादंबरी सिडनी शेल्डन यांनी 1987 साली लिहिली. या पुस्तकावर नंतर अमेरिकेत टीव्ही सिरियल बनली. भारतात "मिशन भारत" नावाचे प्रदीप पंड्या या लेखकाचे हिन्दी पुस्तक आहे ज्याचा अनुवाद डायमंड पब्लिकेशनद्वारे सुषमा लेले यांनी मराठीत केला आहे.
गोष्ट असेल दहा बारा वर्षांपूर्वीची. मी नवी गाडी घेतली त्यावेळची. आधीच्या हॉंडा अकॉर्ड वर दीडशे हजार मैल झालेलेच होते. आता रोजच्या शंभर मैल ऑफिसच्या जा ये साठी ती वापरणं मला थोडं रिस्की वाटायला लागलं होतं. तशा अकॉर्ड अगदी भरवशाच्या गाड्या; दोनशे हजारांपर्यंत सहज जातात. माझ्या मनातली रिस्कची भावना कशामुळे बळावली सांगितलं, तर हसाल तुम्ही! नसतो खरा बऱ्याच जणांचा विश्वास असल्या गोष्टींवर. माझाही नव्हता.
“आत खूप उकडत आहे कुलसुम, ये आपण व्हरांड्यात बसू या”, असे म्हणत लुंगीवर फॉर्मल शर्ट घातलेले रहिमन काका येऊन खुर्चीवर बसले. एका हातात धरलेली वही फिरवत दुसऱ्या हाताने कपाळावरचा घाम पुसत होते. कुलसुम काकू ही बाहेर येऊन बसल्या. मांडीवर असलेल्या सुपात ठेवलेले लसूण निस्ता त्यांचा संताप व्यक्त केला, “काय ओ ह्या लाईट वाल्यांना बोलायचे, एवढ्या गरम्यागदीत लाईट घालवतात."
“चालायचंच गं."
‘मदाम एच-आर-सी-००१, "डिअर अँसेस्टर्स" मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सांगण्याची गरजच नाही, की ह्या एच-३ म्युझिअममध्ये येऊन प्रत्यक्ष तुमच्याबरोबर संवाद साधणे ही माझ्यासाठी केवढी अभिमानाची गोष्ट आहे!'
'धन्यवाद, मला ह्या सिरीजमध्ये आमंत्रित केल्याबद्दल! तू आत्ताच करून दिलेला परिचय, आणि सध्या विचारले जात असणारे प्रश्न, दोन्ही मी ऐकलं. मात्र सर्वप्रथम एक प्रश्न मीच विचारते. मी मराठी-इंग्लिश असं मिक्स बोलले तर चालेल ना?'
नेहमीच्या शांत स्तब्ध एच-३ (होलोग्राफिक हुमनॉईड हब) च्या परिसरात आज बरीच वर्दळ दिसते आहे. एखाद्या म्युझिअमसारख्या दिसणाऱ्या एच-३ च्या मुख्य इमारतीमध्ये पंचवीस आद्य ह्युमनॉईड्स होलोग्राफिक स्वरूपात, त्यांच्या मूळ मानवी अवतारामध्ये, जतन करून ठेवलेले आहेत. प्राचीन काळचे तंत्रज्ञान वापरले असल्यामुळे तेथील हवेचे तापमान, बाष्पाचे प्रमाण, ऑक्सिजन कन्टेन्ट इत्यादींवर काटेकोर नियंत्रण ठेवावे लागते. आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये, ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिल (GAC) हीच एक विश्वव्यापी अधिकार असलेली संस्था. तिचे प्रमुख, आजच्या संपूर्ण जगाचे सर्वेसर्वा, प्रत्यक्ष एच-आर-१०२४, आज इथे भेट देणार आहेत.
१९७२/७३ साल असेल. मी चिंचवडला एका कंपनीत कामाला होतो. तेव्हा मी एकवीस वर्षांचा होतो.ही नोकरी स्वीकारल्यावर वडील म्हणाले होते. " अरे लोकं लांबून लांबून नोकरी साठी मुंबईला येतात. तूच एक वेगळा आहेस. मुंबई सोडून पुण्याला चालंलायस". मला त्यांचं बोलणं आवडलं नाही.पण जुना जमाना. वडलांपुढे बोलणार कोण? मी चुपचाप कंपनीत जॉईन झालो. सुरवातीला मी पुण्याला लॉजमधे राहायचो. महिना चाळीस रुपये. दोघांची रुम. चिंचवडला जायला इंजिन लोकल होती. संध्याकाळी काहीच काम नसल्याने भटकंती हाच टाइमपास. असेच एकदा आम्ही चोघेपाच जण हनुमान हिल (ज्यांना पुण्याची माहिती आहे त्यांनाच कळेल)खाली असलेल्या दीपाली हॉटेल मधे जेवत होतो.
सानियाला जाणवत होतं, की आता कुठल्याही क्षणी पॅनिक अटॅक सुरु होणार आहे. गाईडने सांगितलं होतं, उद्याच्या आत थिसीसचा विषय फायनलाईझ करायलाच हवा; आजकालच्या दिवसात फंडींग मिळणं सोपं नाहीय! त्यासाठी वेळेत अप्लाय करायलाच हवा. आणि तिचा निर्णय अजून पक्का होत नव्हता. गेले दोन दिवस गाईडने सुचवलेल्या तीनचार आणि तिच्या स्वतःच्या डोक्यातल्या काही कल्पनांचा विचार करकरून डोकं फुटायची पाळी आली होती. कल्पना सगळ्याच छान होत्या. काहींवर तिने थोडंफार काम केलेलंही होतं; गाईड त्यावर खुश होता. पण तिला स्वतःला त्यात काही जान दिसत नव्हती; काही स्पेक्टॅक्युलर वाटत नव्हतं.
दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया
हमें आप से भी जुदा कर चले
उतराई..!
अंगणात पारिजातकांच्या फुलांचा सडा पडला होता. केशरी देठाची अन् पांढऱ्या पाकळ्यांची मनमोहक फुलं. पाहणाऱ्याला वाटावं, जणू काही ती स्वर्गीय फुलंच असावीत..! त्या फुलांचा जीव मुग्धावणारा सुवास अंगणात दरवळत होता.
सकाळच्या आल्हाददायी वातावरणाची धुंदी मनावर चढलेल्या अलकाबाई पारिजातकांच्या सड्यातून पूजेसाठी फुलं वेचण्यात मग्न झालेल्या. तेवढ्यात कुंपणाचे फाटक उघडल्याचा आवाज झाला आणि त्या भानावर आल्या.
फाटक उघडून नाना आत आले. त्यांच्या सोबतीला एक चार-पाच वर्षाची गोड चिमुकली होती. नानांसोबत तिला पाहुन अलकाबाईंना आश्चर्य वाटले.
जय रायरेश्वर
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळची प्रसन्न वेळ. रायरेश्वराचं अफाट पठार. पठारावरून ऊन हळूहळू खाली दरीत उतरत होतं. तर शिवाजीराजे किल्ल्यावर जात होते.
सारीकडे पिवळं पडलेलं गवत. त्यामुळे पठार सोनेरी भासत होतं. आणि तो सोन्याचाच दिवस नव्हता काय ?
आज राजे आणि त्यांचे सहकारी किल्ल्यावर चालले होते, ते रायरेश्वराच्या देवळात शपथ घ्यायला. साधीसुधी शपथ नाही, तर स्वराज्य स्थापनेची ! तो दिवस होता - २७ एप्रिल १६४५.