गोष्ट असेल दहा बारा वर्षांपूर्वीची. मी नवी गाडी घेतली त्यावेळची. आधीच्या हॉंडा अकॉर्ड वर दीडशे हजार मैल झालेलेच होते. आता रोजच्या शंभर मैल ऑफिसच्या जा ये साठी ती वापरणं मला थोडं रिस्की वाटायला लागलं होतं. तशा अकॉर्ड अगदी भरवशाच्या गाड्या; दोनशे हजारांपर्यंत सहज जातात. माझ्या मनातली रिस्कची भावना कशामुळे बळावली सांगितलं, तर हसाल तुम्ही! नसतो खरा बऱ्याच जणांचा विश्वास असल्या गोष्टींवर. माझाही नव्हता.
दुसऱ्या दिवशी साडेचारच्या ठोक्याला हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचा फोन, 'मिस्टार अँड मीसेश गूहो टू शी यू'. 'पाठव त्यांना वर', मोठं ऐटीत सांगितलं मी. बेल वाजल्यावर दार उघडलं. वयाच्या मानाने वजन भलतंच आटोक्यात, किंबहुना कमीच झालेलं असावं असं वाटलं; थकल्यासारखीही दिसत होती. पण चेहऱ्यावरचा मिश्किल भाव आणि चैतन्य मात्र तेच होतं. तेच खट्याळ डोळे, तशाच दोन्ही गालांवरच्या खळ्या! पूर्वीं केसांचं पोनीटेल असे, आता चांगला अस्सल बंगाली बौदी सारखा केसांचा चापूनचोपून घातलेला खोपा होता. अजूनही एवढे भरगच्च केस बघून माझा हात नकळत माझ्या डोक्याकडे जाणार होता - झाकून घ्यायला. 'ओरी बाब्बा!
बरोबर तीस वर्षांनी पुन्हा कलकत्याला आलो होतो - आठ दिवसांच्या बिझनेस ट्रीपसाठी. आयुष्यात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा वाटलंही नव्हतं ह्या शहरात कधी पाऊल पडेल. आठवडाभर राहिल्यावर वाटलं होतं पुन्हा कद्धी इथे पाऊल टाकणार नाही... आणि दोनच वर्षात परत आलो, पुढची दोन वर्ष राहिलो, प्रेमात पडलो - कलकत्त्याच्या, बंगाली भाषेच्या, संस्कृतीच्या... तेव्हा सोडतांना वाटलं होतं, आता मात्र शंभर टक्के खात्रीने परत काही येत नाही मी! म्हणतात ना, पुरुषस्य भाग्यं!