‘मदाम एच-आर-सी-००१, "डिअर अँसेस्टर्स" मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सांगण्याची गरजच नाही, की ह्या एच-३ म्युझिअममध्ये येऊन प्रत्यक्ष तुमच्याबरोबर संवाद साधणे ही माझ्यासाठी केवढी अभिमानाची गोष्ट आहे!'
'धन्यवाद, मला ह्या सिरीजमध्ये आमंत्रित केल्याबद्दल! तू आत्ताच करून दिलेला परिचय, आणि सध्या विचारले जात असणारे प्रश्न, दोन्ही मी ऐकलं. मात्र सर्वप्रथम एक प्रश्न मीच विचारते. मी मराठी-इंग्लिश असं मिक्स बोलले तर चालेल ना?'
नेहमीच्या शांत स्तब्ध एच-३ (होलोग्राफिक हुमनॉईड हब) च्या परिसरात आज बरीच वर्दळ दिसते आहे. एखाद्या म्युझिअमसारख्या दिसणाऱ्या एच-३ च्या मुख्य इमारतीमध्ये पंचवीस आद्य ह्युमनॉईड्स होलोग्राफिक स्वरूपात, त्यांच्या मूळ मानवी अवतारामध्ये, जतन करून ठेवलेले आहेत. प्राचीन काळचे तंत्रज्ञान वापरले असल्यामुळे तेथील हवेचे तापमान, बाष्पाचे प्रमाण, ऑक्सिजन कन्टेन्ट इत्यादींवर काटेकोर नियंत्रण ठेवावे लागते. आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये, ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिल (GAC) हीच एक विश्वव्यापी अधिकार असलेली संस्था. तिचे प्रमुख, आजच्या संपूर्ण जगाचे सर्वेसर्वा, प्रत्यक्ष एच-आर-१०२४, आज इथे भेट देणार आहेत.
सानियाला जाणवत होतं, की आता कुठल्याही क्षणी पॅनिक अटॅक सुरु होणार आहे. गाईडने सांगितलं होतं, उद्याच्या आत थिसीसचा विषय फायनलाईझ करायलाच हवा; आजकालच्या दिवसात फंडींग मिळणं सोपं नाहीय! त्यासाठी वेळेत अप्लाय करायलाच हवा. आणि तिचा निर्णय अजून पक्का होत नव्हता. गेले दोन दिवस गाईडने सुचवलेल्या तीनचार आणि तिच्या स्वतःच्या डोक्यातल्या काही कल्पनांचा विचार करकरून डोकं फुटायची पाळी आली होती. कल्पना सगळ्याच छान होत्या. काहींवर तिने थोडंफार काम केलेलंही होतं; गाईड त्यावर खुश होता. पण तिला स्वतःला त्यात काही जान दिसत नव्हती; काही स्पेक्टॅक्युलर वाटत नव्हतं.
हा खरं तर नेहमीचा रस्ता! बाहेर पडलं, की पहिली राईट आणि नंतर लगेच लेफ्ट. लाखो वेळा ड्राइव्ह केलं असेल इथून. आज मी लेफ्ट घेतली आणि गुगल मॅप्सची बाई लागली कोकाटायला 'री-राऊंटिंग' म्हणून. म्हटलं हे असं का? बघतो तर मी पहिल्याच टर्नपाशी होतो; तिला मी राईट घेणं अपेक्षित होतं. मला चांगली आठवतेय मी आधी राईट टर्न घेतलेली. मग आलं लक्षात; डाऊनलोड डिलेज! म्हणजे, माझी गाडी जातेय तसा बाजूचा प्रत्यक्ष परिसर बदलायला हवा ना, त्याला डिले झाला. स्लो डाऊनलोड किंवा स्लो रीफ्रेश... आजकाल हे फार होत चाललंय. मी लगेच बग रजिस्टर केला; कामात आपुन चोख!
साय फाय फिक्शन वरती एकही धागा शोधुनही सापडला नाही. म्हणुन हा उपद्व्याप! आपल्याला आवडलेले असे मुव्हीज जर इथे दिले तर चांगली यादी होईल.
मी माझी यादी देतोय!
१. इन्टरस्टेलार
फादर ऑफ साय्फाय असं मला वाटतो. इतका अभ्यासपुर्ण सायफाय पुर्वी कधीच आला. सायन्सलाच एक वेगळा ग्लॅमर या चित्रपटाने आणले यात वादच नाही! रेटिंगवर जाऊ नका. ज्याना मुव्ही समजला नाही त्यानी रेटिंग कमी दिले!
२. ज्युरॅसिक पार्क