साहित्य
अस्तित्व...!
अस्तित्व ..!!
तिलोत्तमाने आईच्या फोटोला फुलांचा हार घातला. बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला. फोटोतल्या आपल्या आईच्या हसऱ्या चेहर्याकडे एकटक बघणाऱ्या तिलोत्तमा वाटलं, आईने आपल्या जीवनात आई आणि वडीलांची दोहोंची भूमिका एकाचवेळी पार पाडली. ... आपल्या दुःखाचा, एकाकीपणाचा कुठलाही ऊहापोह न करता... अगदी निखळ आनंदाने..!
मात्र ह्या हसऱ्या चेहर्यामागे अफाट दुःख असावं, इतरांना न जाणवणारी वेदना लपलेली असावी.. जी कधीच कुणापुढेही उघड झालेली नाही आणि आता आईचं ह्या दुनियेतून अस्तित्वचं लोप पावल्याने ती उघड होण्याची काडीमात्र शक्यताच उरलीसुरली नव्हती..
'कोकण मीडिया' दिवाळी अंकात माझे 'कोकणा'वरील *शब्दकोडे*
'कोकण मीडिया' या रत्नागिरी येथून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात माझे 'कोकणा'वरील *शब्दकोडे* समाविष्ट झाले आहे.
अंकासाठी संपर्क :
श्री प्रमोद कोनकर,
kokanmedia@kokanmedia.in
9422382621
आमचे धोत्रे गुरुजी (भाग ५)
तरी मला घरी पोहोचायला जिथे दहा मिनिटे लागत तिथे वीस मिनिटे लागली. मनाला एक प्रकारचं रिकामपण आलं होतं. एरव्ही जोरजोरात होणारे मनातले संवाद आता पूर्णपणे थांबले होते. पावणे आठच्या सुमारास मी घरात पोहोचलो.लिफ्टने जाण्यापेक्षा मला उडत जावं असं वाटतं होतं. दिशा आणि मुलांची काय अवस्था असेल याची काळजी मला वाटू लागली. आता संवाद परत आले. फ्लॅटचा दरवाजा सताड उघडा असून सगळे लाईट लावलेले होते. आत मधे आमचे सेक्रेटरी विधाते , शेजारचे शिंदे आणि पो.इन्स्पेक्टर वाघ आणि त्यांचे सहकारी यांचं निरीक्षण चालू होतं. मी आल्याबरोबर विधातेंनी माझी इन्स्पेक्टरना ओळख करून दिली.
खुन झाला पोशिंद्याचा
ज्याचा गेलंसाली हिरवा मळा होता,
त्याचा आज फासावर लटकून गळा होता..
कोणी दिली त्याच्या खुनाची सुपारी,
हे निकामी सरकार का बिटातले व्यापारी..
कोरडं पडलं ओंदा तो करील तरी काय,
मागच्या साली रानात घुसत होते पाय.
ओलं कोरडं करीत गेले उपासी दोन साल,
गोंडस त्याच्या पोरीचे यंदा बसलेत गाल..
निघलं कधी चांगल पिक तर पडल्या कधी गारा,
कुणबी रं गड्या तो त्याला नाही कसला थारा..
एकदा काळे माई हिरवा शालु नेसावा,
तुच आता या जगाचा पोशिंदा पोसावा..
लेखक - जगदीश ढोरे पाटील
रा. आसेगाव मो. 9370346450
आमचे धोत्रे गुरुजी ( भाग ४)
मी कपाटा मागे लपलो,ते कपाट किती जुनं होतं माहित नाही. पण वर्षानुवर्षाचा कुबट वास त्याला येत होता. अजून मला त्या स्त्रीचं नाव माहीत नव्हतं. तिला विचारायची संधीच मिळाली नाही. दरवाज्या उघडल्याचा आवाज झाला. नंतर लाथेने दरवाज्या ढकलून दोघेजण आत शिरले. त्याबरोबर ती स्त्री जमिनीवर भेलकांडली आणि पुढील शब्द ऐकू आले. " काय ग ए भवाने,कोनाला आनलंस घरात? कुटं हाय त्यो ?
'पासबुक आनंदाचे' बँकिंग दिवाळी अंक
या वर्षीच्या 'पासबुक आनंदाचे' या बँकिंग विषयक दिवाळी अंकात माझे 'बँकिंग शब्दकोडे' समाविष्ट झाले आहे.
रस असणाऱ्यांनी जरूर वाचा.
अंकासाठी संपर्क - vyascreations@gmail.com / ०२२-2544 7038
आमचे धोत्रे गुरुजी (भाग ३)
आजकाल मी गुरुजींना मॉर्निंग वॉकला घेऊन जायला सुरुवात केली. ते बरोबर आले तरी फारसे बोलत नसंत. किंबहुना बोलतच नसंत, असं म्हंटलं तरी हरकत नाही. पण एकतर्फी संवाद झाला,तरी मी तो चालू ठेवीत असे. कधी कधी ते रडवेला चेहरा करीत.कधी किंचित हसत.पण खळाळून हसत नसंत. अजूनही त्यांना आणल्याचा पश्चात्ताप होत नव्हता. कदाचित तो दिशाला होत असावा. पण ती माझ्या भीतीने बोलत नसावी. आता गुरुजींना येऊन महिना होत आला. माझी मुलं सुद्धा त्यांना आजोबा म्हणून हाक मारीत असंत. ते माझ्याकडे अनोळखी माणसाकडे पाहावं तसं पाहात.
आमचे धोत्रे गुरुजी (भाग २)
माझे विचार थांबेनात.ज्याअर्थी गुरुजींना इथे नसलेला सदाशिव दिसला आणि ते त्याच्याशी बोलत होते. याचा अर्थ त्यांना भास होत होते. खरंच दिशाचं म्हणणं ठीकच आहे.पण मानसोपचार तज्ज्ञ माहिती असणं आणि डॉक्टर माहिती असणं यात फरक आहे.तरीही मी चवकशी करायचं ठरवलं.ऑफिसला गेलो.जाताना गुरुजींना प्रेमाने झापून गेलो आणि वेळेवर जेवण्याचं वचन घेऊन गेलो.कामात दिवस कसा गेला कळलं नाही.संध्याकाळ झाली.काम चालूच होतं.आज तरी मी नऊच्या आत घरी जाणार नसल्याचं जाणवलं.एका मिटिंगसाठी बसलो होतो.चर्चा रंगात आली होती.अचानक दिशाचा फोन आला.मी बाजूला जाऊन वैतागून घेतला." काय आहे ? मला उशीर होणार आहे.तुम्ही जेऊन घ्या.
भेट -भाग ७ (अंतिम)
बाहेर पडताच त्यांना जाणवलं की, घरी सगळे काळजी करत असतील. एक-दोन मेसेजेसही येऊन गेले होते. मित्रांबरोबर आहे, उशीर होईल, झोपून जा, असे मेसेजेस करून टाकले. तेव्हा कुठे थोडं हायसं वाटलं. एव्हाना छान गार वारा सुटला होता. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. एकमेकांशी काहीही न बोलता ते पुन्हा पाषाणच्या दिशेने चालू लागले. एव्हाना तिकडची गर्दी अगदीच तुरळक झाली होती. वाऱ्याने तिची ओढणी पुन्हा-पुन्हा त्याच्या दिशेनी झेपावत होती. तरीही ना ती ओढणी सावरत होती, ना तो... त्याच्या बाईकच्या जवळ पोचताच इशारा मिळाल्यासारखा अचानक पाऊस सुरु झाला. पाऊस येताच तो आडोशाला झाडाखाली धावत गेला.