साहित्य

लेखन उपक्रम २ - सखी - आर्च

Submitted by आर्च on 22 September, 2023 - 18:04

लेखन उपक्रम २ - सखी - आर्च

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.

विषय: 

"थोडेसे धर्मांध असलेले बरे"

Submitted by VaicharikKatta ... on 18 September, 2023 - 00:17

"अविश्वासाची नभ-भ्रमंती करून "तू
नैराश्याचे आभाळ व्यापण्यापेक्षा...."
"थोडेसे...."

आधुनिक पुढारलेले म्हणत म्हणत
सुसंस्कृत मानवतेच्या चिंधड्या उडवण्यापेक्षा,
झाकलेल्या अंगाला कालबाह्य संबोधून
नग्नतेचं प्रदर्शन मंडण्यापेक्षा,
जरासे धर्मांध असलेले बरे.

सूत्रधार भाग:४

Submitted by शब्दब्रम्ह on 10 September, 2023 - 13:45

"आमदार धनंजय देसाई यांची त्यांच्याच फार्म हाऊस मध्ये झालेली हत्या, त्यानंतर राज्याचे पर्यावरण व विकास मंत्री विलासराव सावंत यांच्यावर भर प्रचार सभेत झालेला जीवघेणा हल्ला, आणि या हल्ल्यानंतरच्या अवघ्या काहीच तासांमध्ये  ' जनशक्ति पक्षकार ' आप्पासाहेब गडकरी यांच्या नाट्यमय हत्येने राज्य हादरून गेलंय,

सूत्रधार भाग:३

Submitted by शब्दब्रम्ह on 27 August, 2023 - 16:21

"नाही फार कही सीरियस नाहीये,फक्त थोडा मूका मार लागलाय आणि थोडं खरचटलंय त्यांना..." डॉक्टरांचा आवाज त्याच्या कानावर पडत होता.
शिव ने हळूवार डोळे उघडले.पहिल्याच क्षणी ठणकणारं शरीर आणि मऊ हाताचा स्पर्श त्याला जाणवला.
"अहो..."
वैदही त्याचा हात अजूनच घट्ट पकडत म्हणाली.
तिच्या लाल झालेल्या डोळ्यातून गालावरून ओघळणारे तिचे अश्रू नजाणो किती वेळापासून बेडवर पडत होते.
शिव मात्र अजून भानावर आलाच न्हवता पुन्हा तेच दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळलं , बाईकखाली निपचित पडलेला रक्ताने माखलेला अनिश....
एखादा विजेचा झटका बसावा त्या प्रमाणे शिव भानावर आला.

सूत्रधार भाग:२

Submitted by शब्दब्रम्ह on 26 August, 2023 - 16:01

टेबलवर दोन्ही बाजूला असलेल्या फाईल्स च्या ढिगांमध्ये इन्स्पेक्टर सरनाईक त्रासिक चेहऱ्याने समोरची फाईल चाळत होते,मध्येच घड्याळाकडे कटाक्ष टाकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा वैताग सहज दिसून येत होता.टेबलवर बाजूलाच अर्धा झालेला ग्लास होता आणि बऱ्याच पेपर्स ची दाटीवाटीही झाली होती.इतक्यात त्यांना कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली.
"या मिस्टर पटवर्धन तुमचीच वाट बघत होतो मी, या बसा."समोरची फाईल मिटवत शिव आणि अनिशला त्यांनी बसायला सांगितलं.

विषय: 

ती...

Submitted by शब्दब्रम्ह on 26 August, 2023 - 09:46

आठवतंय...,शेवटच्या भेटीत बुजली होती ती,
स्वतः च्याच अश्रुंमध्ये भिजली होती ती.

आभाळभर दुःखांनी रडली होती ती,
उष्टी हळद लागूनही फिकी पडली होती ती.

कित्येक यातनांशी एकटीच ,जुंपली होती ती,
नियतीला पुरून उरूनसुद्धा जणू आज संपली होती ती.

"ही शेवटचीच भेट आपली." म्हणल्यावर झुरली होती ती,
कंठात अडकलेल्या हुंदक्यात, नकळत विरली होती ती.

हजारो वादळं उरात दाबून चालली होती ती,
निःशब्द राहून सुद्धा, बरंच काही बोलली होती ती.

शब्दखुणा: 

वाचलेले ऐकलेले : ओरहानचा कालप्रवास आणि संस्कृतिसंघर्ष !!! (My Name is Red) १

Submitted by अनिह on 7 August, 2023 - 04:56
My Name is Red चे मुखपृष्ठ

तुर्कस्थान हा तसा एका मोक्याच्या जागचा देश. त्याच्या आधीच्या राजधानी इस्तंबूलचा एक भाग युरोपमध्ये तर दुसरा आशियामध्ये एवढं सांगितलं तरी बस आहे. त्यामुळे तिथे इस्लामी/आशियायी आणि युरोप या दोन्ही संस्कृतीचं अस्तित्व जाणवत. तुर्कस्थान मुस्लिम बहुल देश आहे त्यामुळे त्याची मुस्लिम/आशियायी प्रकृती त्यातील धर्म समाजकारण राजकारण कला यांनी स्थापित केलेली जगण्यातली आणि कलात्मक मूल्ये आणि जवळीकीमुळे युरोपातून येऊन आदळणार्या वैचारिक, कलात्मक, आणि सांस्कृतिक लाटा याच्या घुसळणीत हा देश विशेषतः इस्तंबूल सतत गोंधळलेल्या अवस्थेत असते .

विषय: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य